Homeपुणेकारागृहात घुमले देशभक्ती चे सूर....

कारागृहात घुमले देशभक्ती चे सूर….

Newsworldmarathi Pune : ए मेरे वतन के लोगो.., कर चले हम फीदा.., मेरे देश की धरती.. पासून अगदी तेरी मिट्टी मे मर जावा…, हर करम अपना करेंगे… अश्या देशप्रेमाने भरलेल्या स्वरांनी आणि सुरांनी कारागृहातील भिंती अक्षरश: जिवंत झाल्या. निमित्त होते बंदी बांधवांचा सहभाग असलेल्या “ए मेरे प्यारे वतन”या संगीतमय मैफिलीचे.महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बंदी बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या “प्रेरणापथ” या प्रकल्पांतर्गत या बांधवांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळवून त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

बंदी बांधवांनी सादर केलेल्या कार्यक्रमात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जगप्रसिद्ध संगीतकार आनंदजी ( कल्याणजी आनंदजी) यांचे चिरंजीव दीपक आनंदजी शहा यांच्यासोबत अनेक नामवंत कलाकार सहभागी झाले होते.
त्यांच्यातील लपलेल्या कलागुणांना समाजासमोर आणण्यासाठी आनंदी वीरजी शाह फाउंडेशन, मुंबई हे सुद्धा यामध्ये सहभागी झाले होते.

उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या मैफिलीत बंदी बांधवांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कारागृहातील खाकी वर्दीतील अधिकारी आणि प्रत्यक्ष अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांना सुद्धा गाण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी माईक हातात घेताच बंदी जणांनी अक्षरशः टाळ्यांच्या कडकडात सर्व सभागृह डोक्यावर घेतले.

या कार्यक्रमाचे संयोजक अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांनी या कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका व्यक्त करताना कारागृहे ही फक्त कारागृह न राहता सुधारगृहे व्हावी या विचारातून महाराष्ट्र कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला समाजाच्या सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे ही समाधानाची गोष्ट असल्याचे सांगून राज्यातील इतर कारागृज्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम हा प्रकल्प व्यापक स्वरूपात राबवण्यात येईल असे प्रतिपादन केले.

भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी या कार्यक्रमाच्या संयोजनात महाराष्ट्र कारागृह प्रशासन, आदर्श मित्र मंडळ, स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या सहकार्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विचारवंत कृष्णन श्रीनिवासन, सामाजिक कार्यकर्ते कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्ता गायकवाड, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, नामदेव शिंदे गुरुजी,सामाजिक कार्यकर्ते शुभम मेदनकर, चंद्रकांत दोमा,आशिष गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहम्मद रफी आर्ट्स फाउंडेशनचे श्री जहीर दरबार यांच्या संगीत संयोजनात बबलू रमजानी, आवेज दरबार, शाकीर शेख ,जाकीर शेख, देबजानी चक्रबोर्ती,ललिता जगदाळे, अवधूत काशीद, रशीद शेख, सागर घोडके, सोमनाथ फाटके देवेंद्र नागटिळक या कलाकारांनी या मैफिलीत आपली कला सादर केली.

या कार्यक्रमाच्या आयोजनात तुरुंग अधिकारी श्री आर इ गायकवाड, श्री डी जी दुबे श्री एस आर पाटील, शिक्षक नामदेव शिंदे, सतीश कदम सुभेदार यांनी सहभाग घेतला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments