Homeभारतबंदी बांधवांच्या हातातून साकारतोय बाप्पा

बंदी बांधवांच्या हातातून साकारतोय बाप्पा

Newsworldmaratgi Pune: रागाच्या भरात नकळत त्यांच्या हातून झालेल्या चुकीची शिक्षा भोगत असताना त्यांच्यामध्ये प्रायश्चित्ताची भावना जागृत होऊन बंदी बांधवांच्या हातून साक्षात विघ्नहर्ता गणेश साकारला आहे ही या अत्यंत वेगळी आणि स्तुत्य गोष्ट आहे.

Advertisements

या बंदी बांधवांमधील चांगला माणूस जागवण्यासाठी महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या प्रेरणापपथ या प्रकल्पा अंतर्गत या बांधवांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना गणपती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. व्यावसायिक कलाकाराला लाजवतील अशा कलाकृती या हातातून घडल्या आहेत.

Advertisements

जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर, विराज खटावकर, पुंडलिक खलोलकर आणि त्यांच्या सहकार्यांनी या मंडळींना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी तयार केलेले बाप्पा आता समाजाने भक्तीभावाने घेऊन आपल्या घरी त्यांची प्रतिष्ठापना करून पूजा करावी म्हणजे या मंडळींना प्रोत्साहन मिळेल असे आवाहन डॉ. सुहास वारके – अपर पोलीस महासंचालक कारागृह सुधार सेवा, योगेश देसाई महानिरीक्षक, कारागृह सुधार सेवा, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम यांनी केले आहे.

या गणेश मूर्ती गायत्री क्लिनिक, खडक माळ, राष्ट्र भूषण चौक, शिवाजी रोड या ठिकाणी स्टॉलवर विक्रीसाठी असून. हे बाप्पा पर्यावरण पूरक शाडू मातीपासून बनवल्या आहेत. समाजातील मान्यवरांनी पुढे येऊन या प्रकल्पाला शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांनी यानिमित्ताने केले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments