Newsworldmarathi Pune: बोगस दस्ताच्या आधारे मुळ जमिनीच्या कागदपत्रांमध्ये बदल करुन जमिन लाटण्या संदर्भात सुनील कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे. सदर प्रकरणामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे वारंवार तक्रार दिल्यानंतरही पोलीसांकडून फसवणूक करणाऱ्यांवर पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप देखील कुलकर्णी यांनी यावेळी केला आहे.
कोथरुड येथील सर्व्हे नं. ११३ या जागेच्या संदर्भात १९६५ साली नोंदणीकृत असलेला दस्त २०२० मध्ये म्हणजेच साधारण ५५ वर्षा नंतर समोर आला त्या अगोदर सदर मिळकती वर कुलकर्णी यांचेच नाव होते संदर्भातील जागा ही सुनील कुलकर्णी यांचे वडील गजानन कुलकर्णी यांच्या मालकीची होती. वारसाहक्काने ही जागा सुनील कुलकर्णी व त्यांचे सख्खे बंधू शैलेश कुलकर्णी यांना पूर्वीच हस्तांतरीत झाली होती. २०२० साली सदर जमिनी बाबत पुन्हा नोंदणी झाल्याची माहिती सुनील कुलकर्णी यांना मिळाली. त्यानंतर सुनील कुलकर्णी यांनी शासनाकडे असलेल्या संबंधित १९६५ सालच्या दस्ताच्या मुळ प्रतीची मागणी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली.
विभागाच्या वतीने मुळ प्रतीची साक्षांकित प्रत उपलब्ध करुन दिल्यानंतर सुनील कुलकर्णी यांना मुळ दस्तातील अनेक पाने रिटाईप केली असल्याचे व दस्तावर जमीन विकणाऱ्याचे व विकत घेणाऱ्या व्यक्तींची स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे त्यांनी पुन्हा उपलब्ध करुन देण्यात आलेली साक्षांकित प्रत पाहिली असता, त्यामध्ये स्वाक्षऱ्या नसल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी पुन्हा एकदा सुनील कुलकर्णी यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे गहाळ असलेल्या त्या दस्ताच्या रेकॉर्ड बाबत संदर्भात व स्वाक्षऱ्या संदर्भात विचारणा करताना, अधिकृत तक्रार दाखल करुन या दस्ताची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली. यावेळी नोंदणी व शुल्क विभागाने तक्रारीची नोंद करताना, चौकशीला सुरुवात केली आसता, सुनील कुलकर्णी यांनी दाखल केलेली तक्रार योग्य असल्याचे उघडकीस आल्यानंतर विभागाकडून स्वतंत्र चौकशी समिती नेमन्यात आली.
चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये देखील सुनील कुलकर्णींची तक्रार योग्य असल्याचे मान्य केले. चौकशी समितीच्या अहवालानूसार, या प्रकरणातील मुळ दस्तातील काही पाने गहाळ असल्याचे, त्रुटी असल्याचे ,चुका असल्याचे ,दस्ताच्या संबंधित उक्त नमूद सर्व कार्यालयीन अभिलेख गहाळ असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करावा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावेत, याचे पत्र देखील वेळोवेळी पोलीसांना जारी केले होते. मात्र या संदर्भात पोलीसांकडून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सुनील कुलकर्णी यांना प्रशासकिय यंत्रणेसोबत सातत्याने झगडावे लागत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
नक्की कायदा कुणासाठी?
एका बाजूला सुनील कुलकर्णी व शैलेश कुलकर्णी प्रशासकिय यंत्रणेशी झगडत असताना, फेरफार केलेल्या दस्ताच्या सहाय्याने जमीन दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतर करण्यासाठी महसूल विभागातील काही उच्च अधिकारी, राजकिय दबावाने काम करत असल्याचे आरोप देखील सुनील कुलकर्णी यांच्याकडून करण्यात येत आहे. या संदर्भात सुनील कुलकर्णी यांनी अधिकची चौकशी केली असता, पुण्यातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे नाव पुढे आले आहे. त्याबरोबरीने अजून एका व्यक्तीचे नाव सदर प्रकरणात आले असून, त्यावर या आधीही जमीन लाटल्याचे आरोप झालेले आहेत. या प्रकरणामध्ये सुनील कुलकर्णी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, सदर प्रकरणामध्ये लक्ष देवून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे व कारवाईचे आदेश दिल्यानंतरही अजूनही सुनील कुलकर्णी यांना न्याय मिळवण्यासाठी झगडावे लागत असल्याने नक्की कायदा कुणासाठी आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे गैरप्रकार झालेल्या दस्ताबाबत मुद्रांक शुल्क विभागाने अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना कळविले असताना सदर बाबत गेल्या तीन वर्षांत गुन्हा दाखल होऊन पुढील तपास होणे गरजेचे असताना गुन्हा दाखल करणे व तपास करणे तर दूरच असताना महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी सदर मिळकत मुद्रांक शुल्क विभागाने त्रुटी असलेल्या गैर दस्त असल्याचे नमूद केलेल्या दस्ताच्या आधारे जमीन हस्तांतर करण्याचे आदेश देत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल होऊन संबंधित व्यवहारातील १९६५ सालच्या दस्ताची , संबंधित इसमाची ,त्यांच्या फर्म, दस्तात नमूद केलेले पत्ते , आर्थिक बाबी बाबत पोलिस चौकशी करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.


Recent Comments