Newsworldmarathi Pune : सुखसागर नगर येथील आंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवरात्रोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी मंदिर परिसरात आवश्यक नियोजन केले जात आहे. नवरात्रातील नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन उत्सवाची आखणी केली जाते.
नवरात्रोत्सव हा शक्तीची उपासना करणारा आणि धार्मिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा सण आहे. सुखसागर नगरमधील आंबा माता मंदिराला परिसरातील भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
उत्सवाच्या तयारीअंतर्गत मंदिर परिसराची स्वच्छता, सजावट, पूजाविधी आणि भाविकांच्या सोयीसुविधांबाबत नियोजन केले जात आहे. नवरात्रातील धार्मिक कार्यक्रम आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
धार्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमांवरही भर
आंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात येतात. सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असतो. धार्मिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये एकोपा, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचा संदेश दिला जातो. त्यामुळे नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक सहभागाचेही व्यासपीठ ठरत आहे.
नवरात्रोत्सवाच्या तयारीला अंतिम स्वरूप दिले जात असून, उत्सवाच्या प्रारंभाची भाविकांना उत्सुकता लागली आहे. नऊ दिवसांच्या या उत्सवात आई आंबा मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे ट्रस्ट चे पदाधिकारी मगराज राठी यांनी सांगितले.


Recent Comments