Newsworldmarathi pune : आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने लक्ष्मी रोड येथे पादचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आणि त्यांना वाहतूक व्यवस्थेत अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे हा होता.
कार्यक्रमात महापालिकेच्या अधिकारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच विविध संस्था आणि संघटनांनी सहभाग घेतला.
यावेळी लक्ष्मी रोडवरील काही ठिकाणी विशेष पादचारी मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच, रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन आणि सिग्नल व्यवस्थेची माहिती देण्यासाठी स्टॉल्स लावण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी, पादचाऱ्यांच्या अधिकारांविषयी जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.