Newsworld marathi : Pune पुण्यात नॅशनल बुक ट्रस्टच्या पुस्तक महोत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित ‘शांतता! पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी आपापल्या ठिकाणी थांबून आवडीची पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला. विशेषतः गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकातील तांबडी जोगेश्वरी परिसरात या उपक्रमाची रंगत अधिक वाढली.
आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी या उपक्रमात सहभागी होत आपला वेळ पुस्तक वाचनासाठी दिला. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सागर देशपांडे लिखित ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हा चरित्रग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्यांनी काही पाने वाचून झाल्यावर प्रेरणादायी मानून संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी तो सोबत घेतला. शांतता पुणेकर वाचत आहेत या उपक्रमाचे चंद्रकांत दादांनी कौतुक केले.