Homeपुणेसिंहगड रोड पोलिसांची कारवाई; दोन रेकॉर्डवरील आरोपींकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई; दोन रेकॉर्डवरील आरोपींकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त

Newsworldmarathi Pune: सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दोन रेकॉर्डवरील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई १७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.

Advertisements

सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि राहुल ओलेकर यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सिंहगड रोड पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सूर्यराज निंबाळकर आणि त्याचा साथीदार एकतानगरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील पडीक इमारतीत येणार असून, त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहे.

ही माहिती तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके यांना देण्यात आली. त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांचे पथक संबंधित ठिकाणी रवाना झाले. पोलिसांनी तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे **१) सूर्यराज मनोज निंबाळकर (वय २०, रा. श्री गजानन सोसायटी, फ्लॅट क्रमांक ०३, गोकुळनगर, नऱ्हे, पुणे) आणि २) गौरव राजू घाडगे (वय २०, रा. शांती प्रेस्टीज बिल्डिंग, फ्लॅट क्रमांक ०९, शांती बारजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे)** अशी आहेत.

पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत सूर्यराज निंबाळकर याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल, तर गौरव घाडगे याच्याकडून एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत घोरपडे करीत आहेत.

कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक भुपेश साळुंके, पोलीस हवालदार उत्तम तारु, पोलीस हवालदार आण्णा केकाण, पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण, पोलीस हवालदार सतिश मोरे, पोलीस अंमलदार विकास बांदल, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, पोलीस अंमलदार विनायक मोहिते, पोलीस अंमलदार तानाजी सागर, पोलीस अंमलदार सागर शेडगे, पोलीस अंमलदार युवराज कांबळे आणि पोलीस अंमलदार शिरीष गावडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments