Homeपुणेपुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

Newsworldmarathi Pune : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांनी मतदानासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मतदान करण्याचे आवाहन केले.

Advertisements

भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुण्यात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व याबाबत मतदारांशी संवाद साधत भाजप-महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.

दरम्यान, चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारातील सक्रिय सहभागाचे मतदारांनी कौतुक केले. तसेच, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments