Homeपुणेश्री महालक्ष्मी मंदिरातर्फे २५ फूट प्रतीकात्मक रावण दहन* रामायणातील विविध कथांवर आधारित...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे २५ फूट प्रतीकात्मक रावण दहन* रामायणातील विविध कथांवर आधारित प्रसंगांचे सादरीकरण ; पुणेकरांची मोठी उपस्थिती

Newsworldmarathi Pune: महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या, बालशोषण यांसह विविध सामाजिक समस्यांच्या प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जीवंत प्रसंग व संपूर्ण रामायणाचा जीवंत देखावा सादर करण्यात आला. रावणाची भव्य हलती प्रतिकृती तसेच जिवंत देखाव्यातील हनुमान आणि जटायू हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले.

Advertisements

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे मंदिरासमोर प्रतीकात्मक रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २५ फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन यावेळी करण्यात आले. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त व उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, निलेश लद्दड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यंदाच्या उत्सवाचे आयोजन केले.

Advertisements

उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, नवरात्र उत्सवात स्त्री शक्तीचा जागर करण्यासोबतच नारी शक्तीचा सन्मान देखील करण्यात आला. यंदा आयोजित केलेल्या रावण दहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येसारख्या समस्यांच्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करुन समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील वाईट विचार, व्यसनाधीनता यांसारख्या अपप्रवृत्तीरुपी रावणाचे दहन करण्यात आले. विश्वकर्मा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच यंदा प्रथमच आरोग्य शिबीरात भक्तांनी उस्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात देखील मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments