खरसुंडी नगरीत श्री सिद्धनाथ चैत्र यात्रा मोठ्या उत्सवात

Newsworldmarathi Sangali : श्री क्षेत्र खरसुंडी येथे सासणकाठी व पालखी सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला. या सोहळ्यात संपूर्ण राज्यातून लाखो भक्तगण सहभागी झाले होते. संपूर्ण खरसुंडी नगरी गुलाबी मय वातावरणाने नटली होती. आजच्या सोहळ्यानिमित्त श्री सिद्धनाथ महाराजांच्या उत्सव मूर्तीची सदरेवरील पूजा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. उद्या, आज रथोत्सवाने यात्रेची सांगता झाली. या पवित्र स्थळी येताना मनाला एक वेगळीच ऊर्जा लाभते. लोककलांच्या गजरात, भक्तांच्या जयघोषात आणि अध्यात्मिक वातावरणात न्हालेलं हे देवस्थान हजारो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. सदियोंची परंपरा लाभलेले हे पवित्र स्थान, श्री सिद्धनाथ महाराजांचे अत्यंत जागृत व प्रभावी देवस्थान मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेने न्हालेल्या या भूमीत दरवर्षी सासनकाटी महोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये लाखो भाविक भक्तगण सहभागी होतात. या महोत्सवात देवाच्या पालखीची मिरवणूक, सासनांची पूजा, वाद्यांच्या गजरात निघणारा उत्साह आणि भक्तीमय वातावरण हे सर्व मनाला भावून जाणारं असतं. हे मंदिर ११२५ मध्ये हिमदपंथी (हेमादपंथी) वास्तुशैलीत बांधले गेले आहे. काळ्या दगडांचा वापर करून मोर्टारशिवाय टेनॉन आणि मॉर्टिस जॉइंट्सने नट-गुंठणी करण्यात आलेली ही पद्धत त्या काळातील यदुवंशी राज्यातील सर्वोत्तम कलाप्रतिभेचे उद्घाटन करते. दक्षिण दिशेने समोरासमोर उभारलेला, पाच प्रमुख विभागांत (प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गर्भगृह, प्रदक्षिणा मार्ग) विभाजलेला हा मंदीर १५० फूट उंच शिखर व सुवर्ण कलशाने सज्ज आहे.

दहशतवाद्यांनी हिंदूंना नव्हे भारतीयांना मारले : राहुल डंबाळे

0
Newsworldmarathi Pune : पहेलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचे होते , तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम धृवीकरण करणारे यांचा व दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली. पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली व या सभेत या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करावी तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर देखील कठोर निर्बंध लावावे यासाठी सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीने डॉ. सिध्दार्थ धेंडे व रशिद शेख यांचेद्वारे व्यक्त करण्यात आला. तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारने सुरक्षा संदर्भामध्ये चूक झाल्याचे मान्य केले असल्याने यातील दोषींवर देखिल कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. अंजुम इनामदार यांनी सांगितले की ” पाकिस्तानचा दहशतवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय मुसलमान खपवून घेणार नाही. देशात आम्ही एकत्रित राहतो वेळप्रसंगी मुसलमान हिंदूंना तर हिंदू मुसलमानांना मदत करतात अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाई करून पाकिस्तानचा हेतू साध्य होणार नाही. ” याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , माजी नगरसेवक मुक्तार शेख , रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , कारी इद्रीस , जाहीद शेख , मुनव्वर कुरैशी , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी, अहमद सय्यद , सलिम मौला पटेल अंजुम इनामदार, खिसाल जाफरी, लुकस केदारी , सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने , इब्राहीम यवतमाळवाला, सिध्दांत सुर्वे , राम डंबाळे , सत्यवान गायकवाड , शाकीर शेख , अश्पाक शेख , राहुल नागटिळक , स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, वसिम पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल फॉर मायनॉरिटीच्या स्नेहा माने , शहाबुद्दीन शेख , आसिफ शेख , प्रतिक डंबाळे यांनी केले होते.

शताब्दी बुद्धविहार येथे श्रामणेर शिबिराचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: रेंजहिल्स रहिवासी सभा व रेंजहिल्स रहिवासी महिला सभा, शताब्दी बुद्धविहार, रेंजहिल्स, पुणे, या संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे बौद्ध धम्मानुसार अभिप्रेत आणि अत्यावश्यक असलेले श्रामणेर शिबीर, श्रद्धावान उपासकांच्या सक्रिय सहभागा मधून आयोजित करण्यात येते. यंदाचे १५ दिवसीय निवासी श्रामणेर शिबीर ४ मे ते १८ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या वर्षीच्या शिबिरामध्ये प्रत्येक विषयांमधील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन या शिबिरार्थीना मिळणार आहे. या वर्षीच्या शिबिरामधील उत्कृष्ट श्रामणेर शिबिरार्थीना पारितोषिके देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. प्रत्येक शिबिरार्थीना भारताचे संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध वंदना पुस्तिका…. इत्यादी पुस्तके अभ्यासासाठी मिळणार आहेत. आदरणीय भन्ते नागघोष, महाथेरो, पुणे, आदरणीय भन्ते संघदुता, अरुणाचल प्रदेश, आदरणीय भन्ते धम्मानंद, तक्षशिला विहार, पुणे हा भिक्खू संघ मार्गदर्शक असणार आहे. तसेच आधी झालेल्या श्रामणेर शिबिरामध्ये अभ्यास वर्ग घेणारे तज्ञ मार्गदर्शक / शिक्षक / अभ्यासक यंदाही विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत, यंदाच्या शिबिरांची सुरुवात ४ मे रोजी सायंकाळी ५.३० वा, शताब्दी बुद्ध विहार, रेजहिल्स येथे  प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, प्रिन्सिपल नवरोसजी वाडिया कॉलेज, पुणे. प्रा. डॉ. विजय गायकवाड, व्हाईस प्रिन्सिपल मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स, पुणे.यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सहभागी होण्यासाठी  आयु. कलावंत पवार 7264862810– आयु. डि के माने 9860120462 आयु. राजाराम सोनावणे 9049039541 आयु. गौरीशंकर भोसले 9730693099 आयु. दादासाहेब थिवार 9850496459 आयु. विश्वनाथ मधाळे – 7620375119 आयुष्मती प्रभाताई सोनवणे 9881229413 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पहलगाम हल्यात दहशतवाद्यांना भिडणाऱ्या ‘सय्यद’च्या निधनाने हळहळ; एकनाथ शिंदेकडून ५ लाखांची मदत

Newsworldmarathi Mumbai : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा सय्यद आदिल हुसैन शाह या अवघ्या २० वर्षांच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सय्यदच्या कुटुंबियांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अवघ्या २० वर्षाचा असलेला सय्यद आदिल पहलगाममध्ये पर्यटकांना घोड्यावरुन फिरवण्याचं काम करायचा. त्याच्या घोड्यावरुन जो प्रवासी पहलागमची सफर करत होता त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर सय्यद याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. त्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बुधवारी दि.२३ एप्रिल रोजी रात्री उशीरा श्रीनगर येथे पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. त्यांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी सय्यद आदिलने दाखवलेली माणुसकी आणि धाडसाबाबतचा अनुभव उपमुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याची दखल घेत शिंदे यांनी सय्यद आदिलच्या कुटुबियांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सय्यद आदिलच्या कुटुंबियांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री. शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशाप्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या याचा अनुभव त्याने सांगितला.

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण व्हावे : जे. पी. नड्डा

0
Newsworldmarathi Pune: भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला. यावेळी दहशतवादाविरोधी लढण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी, याकरिता गणरायाचरणी प्रार्थनाही त्यांनी केली.
Oplus_131072
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी जे. पी. नड्डा यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली. जे. पी. नड्डा म्हणाले, आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

राज्यातील राजकारण गढूळ; केवळ कुरघोडीचे राजकारण, हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

Newsworldmarathi Mumbai: राज्यातील राजकारण गढूळ झाले असून सत्तेत असणारे तीन पक्ष श्रेय लाटण्यासाठी तीन दिशेला जात असल्यामुळे राज्याचा कारभार भरकटत चालला आहे. लाडकी बहीण योजना असो, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था यावर काहीही ठोस निर्णय न घेता केवळ कुरघोडीचे राजकारण, महापुरुषांचे अपमान, धार्मिक वाद, जाती-पातीमध्ये द्वेष पसरवत राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. २४ एप्रिल हा पंचायत राज दिवस असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हातात सत्तेची सर्व सूत्रे ठेवायची आहेत, म्हणूनच महायुतीमधील नेते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देत नाहीत. अडीच-तीन वर्षे होऊनही नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका न घेता प्रशासकीय राजवटीच्या नावाखाली सरकारी दलाल बसवले असून त्यांना आदेशावर नाचवले जात असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Oplus_131072
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्या चा आम्ही जाहीर निषेध करत असून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना करावा लागेल, असे सपकाळ म्हणाले. स्व. गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील स्विमिंग पूलमध्ये ग्रंथ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, याला प्रशासकीय गलथानपणा जबाबदार असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत हसमुख मुथा परिवाराच्या घरी सांत्वनपर भेट देऊन त्या परिवाराला धीर दिला. मच्छिमारांना नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार महाराष्ट्रात पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना शासनाच्या जाचक धोरणांमुळे विविध समस्यांना सामारे जावे लागत आहे. मासेमारीमध्ये अनेक ठेकेदार व भांडवलदार शिरल्याने कोळीबांधवांवर अन्याय होत आहे. काँग्रेस पक्ष मच्छिमार समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यास कटीबद्ध असून, नवी मुंबई विमानतळबाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

जैन सोशल ग्रुपच्या वतीने “उत्तुंग भरारी” सन्मान सोहळा

0
Newsworldmarathi Pune: समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र गो सेवा आयोग), विजय बाविस्कर (ग्रुप एडिटर, लोकमत महाराष्ट्र-गोवा), अभिजीत डुंगरवाल (एडिटर, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क व महाराष्ट्र जैन वार्ता), संदीप गादिया (सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन एक्सपर्ट), प्रकाश धोका (उद्योगपती व समाजसेवक) आणि नंदिनी वाग्यांनी (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे शहर) यांचा गौरव करण्यात आला.
Oplus_131072
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भंडारी (अध्यक्ष, जीतो अपेक्स) होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती होती. २५ एप्रिल २०२५ रोजी, शुक्रवार, संध्याकाळी ६.३० वाजता, शराव लॉन्स, तुळजा भवानी मंदिर समोर, एम.आय.टी. कॉलेज रोड, कोथरूड, पुणे येथे हा भव्य सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन रामलाल शिंगवी (संस्थापक अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम) आणि प्रकाश भंडारी (अध्यक्ष) यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पंचवटकर यांनी केले, तर अनिल लुंकड यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मंचावर दिलीप मेहता, डॉ. सुमतीलाल लोढा, सचिन लोढा, प्रदीप गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
“समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तींनी केलेल्या अथक परिश्रमांना व त्यांच्या सेवेला आदराने मान्यता देणं ही आपल्या संस्कृतीची परंपरा आहे. ‘उत्तुंग भरारी’ सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही या मान्यवरांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला आहे.”
– विजय भंडारी अध्यक्ष, जीतो अपेक्स
“समाजासाठी काहीतरी सकारात्मक करणे हीच खरी उन्नती आहे. आजच्या या सन्मान सोहळ्यात सहभागी होताना विशेष आनंद वाटतो आहे. अशा कार्यक्रमांमुळे प्रेरणा मिळते आणि नव्या पिढीसमोर आदर्श व्यक्तिमत्त्वे उभी राहतात. समाज उन्नतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.”
– कृष्णकुमार गोयल, उद्योगपती,कोहिनूर ग्रुपचे प्रमुख

नवी मुंबई हादरली…! ‘या’ प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून आत्महत्या

Newsworldmarathi Mumbai :नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुरुनाथ चिंचकर असं बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चिंचकर यांनी ९ एमएमच्या बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. चिंचकर यांची दोन्ही मुले अमली पदार्थ तस्करीत सहभागी होती. यामुळे चिंचकर यांना पोलिसांकडून सतत चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. चिंचकर यांना हा त्रास सहन झाला नाही आणि त्यामुळेच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चिंचकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली असून, त्यात त्यांनी याबाबत स्पष्ट उल्लेख केला आहे.
Oplus_131072
गुरुनाथ चिंचकर हे एनआरआय पोलीस स्टेशनच्या पाठीमागील गुरुकिरण सोससायटीत राहण्यास होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी कार्यालयात स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईत मोठं ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलं होतं. मुंबईच्या अमली पदार्थ पथकाकडून नवी मुंबईत मोठी कारवाई करत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. या प्रकरणात मयत गुरू चिचकरच्या दोन्ही मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका मुलाला अटक केली होती, तर दुसरा मुलगा फरार झाला होता. अटकेतील मुलगा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याच ड्रग्ज प्रकरणात गुरू चिचकर यांना NRI पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. याच चौकशीच्या विवंचनेतून चिचकर यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत.

साखर झोपेतच बिबट्याचा वृद्धेवर हल्ला; इनामगावात घराबाहेर झोपलेल्या वृद्धेचा अंत

Newsworldmarathi Shirur : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील कौल वस्तीत घराच्या पढवीत झोपलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला चढवित शिकार समजून ७०० फूट फरफटत नेले. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. उन्ह्यळ्यात घराबाहेर झोपलेल्या वृद्धेचा साखर झोपेतच दुर्देवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवार (दि.२५) पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. इनामगाव येथे पहाटेच्या सुमारास सुरुवातीला बिबट्याने घरासमोर असलेल्या कुत्र्यावर झडप घातली. मात्र, सावध असलेला कुत्रा हा बिबट्याच्या हल्ल्यातून निसटून पळून गेला. बिबट्याचे लक्ष लक्ष्मीबाई भोईटे यांच्याकडे गेले. त्याने त्यांना घराच्या मागील डांबरी रस्त्यापलीकडील ७०० फूट अंतरावर उसाच्या शेतात ओढून नेले. घराच्या पढवीत झोपलेल्या लक्ष्मीबाई या दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. सकाळी ही माहिती ग्रामस्थ विक्रमसिंग नलगे यांनी वनविभागाला दिली. शिरूरचे वनपाल व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभाग ॲक्शन मोडवर वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून मृतदेह न्हावरे येथे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवले. घटनेनंतर वन अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थ व सरपंच-उपसरपंचांसमवेत चर्चा केली. दरम्यान, हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन, ९ ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे, ४ अनायडर आणि २ फिरते कॅमेरे बसवले आहेत. परिसरात रात्रीची गस्त वाढवली आहे

‌‘सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार

0
Newsworldmarathi Pune: कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले धैर्य, साहस आणि बलिदान याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ ही फक्त क्रीडा स्पर्धा नसून भारतातील सर्व धर्मीयांना व संस्कृतींना एकत्र आणण्याचा मोलाचा उपक्रम करीत आहे. या स्पर्धेद्वारे शांती, एकात्मकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. झोजी ला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगील युद्ध विजय रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक, लडाख यु. टी. यांचे युनिट, सरहद, पुणे आणि अर्हम्‌‍ फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून 2025 रोजी लडाख येथील झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ 2025 स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते आज (दि. 25) व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेशपाल जवळगे, संतोष बालवडकर, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे विश्वस्त स्वराज पगारिया आदी उपस्थित होते. दिनेश कोल्हे यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. काश्मीरमध्ये सरहद संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अजित पवार पुढे म्हणाले, युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणाप्रित्यर्थ 2017 पासून ‌‘सरहद शौर्याथॉन‌’चे आयोजन करण्यात येत असून स्पर्धा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे. पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून अजित पवार म्हणाले, या घटनेचा भारतातूनच नव्हे तर जगभरातून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना आहे. सर्व जण पेटून उठले आहेत. पंतप्रधानांनी तातडीने पावले उचलली आहेत. स्पर्धेविषयी माहिती देताना सुमंत वाईकर म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्त्री व पुरुष विभागासाठी पाच, दहा आणि 21 किमी तर मुली आणि मुलांसाठी तीन किमीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोसे बक्षीस देऊन गौरविले जाते. स्पर्धेसाठी 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक्ट, लडाख यु. टी. युनिटचे मुख्य अधिकारी कर्नल राजेश बांदे यांचे सहकार्य लाभले आहे. वर्ल्ड ॲथेलेटिक आणि इंडियन ॲथेलेटिक यांच्या नियमानुसार ही स्पर्धा होत आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सरहद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देताना संजय नहार म्हणाले, काश्मीरमधील युवकांच्या सहकार्याने अडकलेल्या पर्यटकांना निवास, भोजनासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे काश्मीरमधील सामाजिक स्थितीबाबत अयोग्य माहिती पसरविली जात आहे. पण सरहदच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेऊन परतलेल्या काश्मिरी युवकांनी केलेल्या मदतीमुळे लोकभावना बदलली असून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित करण्यात आली आहे.