Nilesh Ghayval: “टोळी युद्ध, गोळीबार, खंडणी… ‘बॉस’ निलेश घायवळचं कस विस्तारलं गुन्हेगारी साम्राज्य! वाचा स्पेशल रिपोर्ट”
Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारा कुख्यात गुंड निलेश घायवळ याला शुक्रवारी रात्री सोलापूर जिल्ह्याच्या सीमेजवळील आंदरूड गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेदरम्यान मारहाण झाली. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमादरम्यान निलेश घायवळ एका पैलवानाची भेट घेण्यासाठी कुस्ती अखाड्यात गेला. यावेळी उपस्थित असलेला सागर मोहोळकर नावाचा पैलवान अचानक घायवळवर धावून गेला आणि त्याला मारहाण केली. सागर हा अहमदनगर जिल्ह्यातील नानज गावचा रहिवासी असून तो पेशाने पैलवान आहे.
घटनेनंतर सागर मोहोळकरने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे यात्रास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नियंत्रण मिळवलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कोण आहे निलेश घायवळ?
“बॉस” या टोपणनावाने ओळखला जाणारा निलेश बन्सीलाल घायवळ हा पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगारांपैकी एक मानला जातो. २००० ते २००३ या कालावधीत पुण्यात त्याचा गुन्हेगारीत दबदबा होता. निलेश घायवळ हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव गावचा रहिवासी असून शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर त्याचा गुन्हेगारीकडे ओढा वाढला.
पुण्यात आल्यावर त्याने कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्या टोळीत सक्रिय सहभाग घेतला. त्याच काळात एका खून प्रकरणात त्याचा सहभाग सिद्ध झाला आणि त्याला सात वर्षांची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून परत आल्यावरही त्याची गुन्हेगारी कारकीर्द थांबली नाही. त्याच्यावर खून, जबरदस्ती वसुली, दहशत निर्माण करणे, धमक्या देणे अशा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सध्या निलेश घायवळ स्वतःची टोळी चालवत असल्याची माहिती असून पुण्यात त्याच्या नावाची दहशत अजूनही काही भागांत जाणवते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील आंदरूड गावातील कुस्ती स्पर्धेदरम्यान त्याला सागर मोहोळकर या पैलवानाने भर कार्यक्रमात मारहाण केल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पुण्याचा अंडरवर्ल्ड संघर्ष: मारणे विरुद्ध घायवळ टोळीयुद्ध
पुणे शहराने गेल्या काही दशकांत अनेक गुन्हेगारी टोळ्यांचा उदय आणि अस्त पाहिला आहे, पण त्यात सर्वाधिक गाजलेला संघर्ष म्हणजे गजानन मारणे आणि निलेश घायवळ या दोन कुख्यात गुंडांमधील रक्तरंजित टोळीयुद्ध.
निलेश घायवळने शिक्षेवरून सुटल्यानंतर गजानन मारणेची साथ सोडून स्वतःची टोळी स्थापन केली. त्यानंतर पुण्यात या दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्वासाठी थेट संघर्ष सुरु झाला. या वादाला भीषण वळण तेव्हा मिळालं, जेव्हा घायवळ टोळीतील सदस्य पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केल्याचं समोर आलं.
या घटनेनंतर, २०१० मध्ये दत्तवाडी परिसरात निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी मारणे टोळीवर गोळीबार केला, ज्यात सचिन कुडलेचा जागीच मृत्यू झाला. या खुनानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये तुफान संघर्ष पेटला आणि शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं.
या टोळीयुद्धामुळे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. दोन्ही गट एकमेकांच्या सदस्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करत होते. या संघर्षाचा काळ पुण्यातील गुन्हेगारी इतिहासात ‘रक्तरंजित पर्व’ म्हणून ओळखला जातो.
गुन्हेगारी विश्वातील मोठं नाव – निलेश घायवळवर तब्बल 10+ गंभीर गुन्हे
पुणे शहरासह आसपासच्या भागात दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड निलेश बन्सीलाल घायवळ हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली असून खालीलप्रमाणे त्याच्या विरोधातील गुन्ह्यांचा इतिहास समोर आला आहे:
– खून
– जीवे मारण्याचा प्रयत्न
– खंडणी वसुली
– दरोडा
– गर्दी जमवून दंगा करणे
– गंभीर दुखापत करणे
– मारहाण
– अपहरण व खंडणी
– भिगवण पोलीस स्टेशन येथे दाखल प्रकरण
या सर्व गुन्ह्यांमुळे निलेश घायवळ हा पुणे पोलिसांच्या “वॉच लिस्ट”मध्ये असून त्याच्या हालचालींवर सातत्यानं नजर ठेवली जाते. त्याचे अनेक साथीदार पुणे, सोलापूर आणि अहमदनगर परिसरात सक्रिय असल्याचं समजतं. मध्यंतरी त्याच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण व खंडणीच्या गुन्ह्यामुळे तो पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता.
सुदर्शन कंपनीसह कर्मचाऱ्यांचे सामाजिक भान कौतुकास्पद : मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन
Newsworldmarathi Pune : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाऊंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन कंपनीसह येथील कर्मचाऱ्यांनी जपलेले सामाजिक भान कौतुकास्पद आहे. हा उपक्रम आता केवळ ‘सुधा सितारा’ राहिला नाही, तर खऱ्या अर्थाने ‘सुधा सितारे’ झाला आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले. हुशार व गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी सुधा सितारा शिष्यवृत्ती संजीवनी ठरत असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या.
सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील २३५ विद्यार्थ्यांना ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यामध्ये १८५ मुली, ४९ मुले व १२ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राठी स्कुलमध्ये आयोजित शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यावेळी सुदर्शन केमिकल्सच्या पीपल्स प्रॅक्टिस हेड शिवालिका पाटील, सुदर्शन रोहा साईट हेड विवेक गर्ग, सीएसआर हेड माधुरी सणस आदी उपस्थित होते.
राजेश राठी म्हणाले, “संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टयांना अनुसरून सुधा सीएसआर महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. या सीएसआर कार्यक्रमातून आजवर लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे काम झाले आहे. ‘सुधा सितारा’ शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन, आत्मविश्वास वृद्धी आणि भविष्यातील येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली जात आहे.”
विवेक गर्ग यांनीही उपस्थितांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात याआधी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींच्या यशोगाथा ऐकून उपस्थित भारावून गेले. विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदर्शन कंपनी आणि त्यांचे कर्मचारी समाजातील विषमतेची दरी कमी करण्यासाठी खूप चांगले काम करत आहेत, अशी भावना पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
स्वाती मोहिता आणि संजय कचरे यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. विशाल घोरपडे यांनी आभार मानले.
MPSC च्या विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेट
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील मोदी बागेतील कार्यालयात आज सकाळी ही भेट पार पडली.
काल रात्री पुण्यात विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन करत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर लगेचच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन सुमारे अर्ध्या तासाची सविस्तर चर्चा केली.
या चर्चेदरम्यान शरद पवारांनी विद्यार्थ्यांच्या समोरच थेट MPSC आयोगाचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालात उडालेला गोंधळ, तसेच या प्रक्रियेमध्ये दिसून येणारी अपारदर्शकता या गोष्टींमुळे नाराज स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शास्त्री रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा आपला उद्वेग आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. कटऑफपेक्षा अधिक गुण मिळून देखील गुणवत्तायादीत नाव न् आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप बघायला मिळत आहे. परिणामी, परीक्षा पुढे ढकलण्यात यावी तसेच पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांच्या जागांमध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.
‘प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं’
Newsworldmarathi Team : मागील काही दिवसांपासून प्रेक्षक ज्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहात होते, त्या ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज आहे.
चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी ढवळे फॅमिली म्हणजेच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांनी स्कुटरवर, तर माने फॅमिली म्हणजे ईशा डे आणि प्रसाद ओक यांनी बुलेटवर शानदार एंट्री घेतली. पुष्पवृष्टीने कलाकारांचे स्वागत करण्यात आले आणि ‘चल जाऊ डेटवर’ या धमाल गाण्यावर कलाकारांनी थिरकत रंगतदार माहोल निर्माण केला.
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि प्रसाद यांच्या एका खास सीनमुळे प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. आता ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. पण या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे.
‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ ट्रेलरमध्ये दिसून येतो. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.
चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं, आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “‘गुलकंद’ हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.”
पुण्यातील गुंड निलेश घायवळ याच्यावर कुस्तीच्या फडात जीवघेणा हल्ला
Newsworldmarathi Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील आंदरूड गावात आयोजित कुस्ती फडात पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर थेट हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घायवळ हा कुस्ती स्पर्धेसाठी उपस्थित असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर वाशी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 351(2) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती सुरू असतानाच अचानक एक कुस्तीपटू धावत आला अन् त्याने निलेश घायवळवर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा अनपेक्षित होता की, सुरुवातीचे काही क्षण नेमकं काय झालं हे कुणालाही समजलं.गर्दीचा फायदा घेत कुस्तीपटूने निलेश घायवळवर हल्ला केला. त्यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, हा हल्ला दुसऱ्या कुणाकडून नव्हे तर थेट एका पहिलवानाकडून करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
निलेश घायवळ: पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी इतिहास
निलेश बन्सीलाल घायवळ हा पुण्यातील कोथरूड परिसरातील कुख्यात गुंड असून त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, खंडणी, अपहरण यांसारखे २३ ते २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गजानन मारणे या गुंडाच्या टोळीत कार्यरत होता, परंतु नंतर दोघांमध्ये वर्चस्वाच्या वादामुळे फूट पडली आणि त्यांनी स्वतंत्र टोळ्या स्थापन केल्या. या टोळ्यांमधील संघर्षामुळे पुणे आणि परिसरात अनेक हिंसक घटना घडल्या
कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक ताणातून अशी मिळावा मुक्तता : लेखक डॉ. मिलिंद भोई
अपेक्षांचे ओझेः कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक ताण
स्त्रिया कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये अपेक्षांचे महत्त्वपूर्ण ओझे सहन करतात, ज्यामुळे तणाव व्यवस्थापन आवश्यक होते.
कौटुंबिक ताणः महिलांनी काम आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अखंडपणे संतुलित करणे अपेक्षित आहे. काळजी घेणे, घरगुती कामे आणि मुलांचे संगोपन या भावनिक श्रमामुळे, अनेकदा पुरेसा आधार नसताना, बर्नआउट आणि थकवा येतो.
सामाजिक ताणः सामाजिक नियम स्त्रियांवर देखावा, वर्तन आणि उपलब्धी यासंबंधी अवास्तव मानके लादतात. अनुरूपतेचा दबाव, सामाजिक तुलनांसह, आत्म-शंका आणि चिंता निर्माण करतो.
आर्थिक ताणः आर्थिक स्वातंत्र्य सशक्त होत आहे, तरीही आर्थिक भार जबरदस्त असू शकतो. घरगुती खर्च, शैक्षणिक खर्च किंवा कर्ज व्यवस्थापित करणाऱ्या महिलांना लक्षणीय ताण येतो, जो तीव्र थकवा आणि इतर आरोग्य समस्या म्हणून प्रकट होऊ शकतो.
तणाव-संबंधित आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय
चांगले आरोग्य राखण्यासाठी तणावाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि त्यांचे कल्याण सुधारण्यासाठी महिलांनी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.
1. स्वतः ची काळजी घेण्याच्या पद्धती तणाव संप्रेरक पातळी कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, योग किंवा ध्यानात व्यस्त रहा. पुरेशी झोप आणि विश्रांती तंत्रांना प्राधान्य द्या. मानसिक आरोग्यास समर्थन देणारे पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार ठेवा.
2. भावनिक आणि सामाजिक समर्थन ओझे सामायिक करण्यासाठी आणि एकाकीपणाची भावना कमी करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांकडून भावनिक आधार शोधा. समर्थन गटांमध्ये सामील व्हा किंवा आनंद आणि पूर्तता आणणाऱ्या सामाजिक क्रियाकलापांमध्ये सहभागी व्हा.
3. वेळ व्यवस्थापन आणि सीमा बर्नआउट टाळण्यासाठी काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील स्पष्ट सीमा सेट करा. जबाबदाऱ्या सोपवा आणि जास्त ओझे घेणे टाळा.
4. व्यावसायिक मदत जेव्हा तणाव जास्त होतो तेव्हा थेरपिस्ट किंवा समुपदेशकांचा सल्ला घ्या. तणाव-प्रेरित शारीरिक आजारांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्या.
लेखक
डॉ. मिलिंद भोई
भाग 2
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून ‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव व मार्गदर्शन
Newsworldmarathi Pune: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी (एपीएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सराव परीक्षा व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मॉक टेस्ट प्रश्नपत्रिका, तसेच ऑनलाईन लेक्चर्स घेतली जाणार आहेत, अशी माहिती ‘एपीएमए’च्या संचालिका डॉ. हिमानी तपस्वी यांनी दिली.
डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची आशा बाळगून ‘नीट’ परीक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे शहरात लक्षणीय आहे. मात्र कोचिंग क्लासची फी परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय स्व-अध्ययनावर (सेल्फ स्टडी) भर देतात. नेमका अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे अशा प्रश्नाना त्यांना तोंड द्यावे लागते. अशावेळी गुणवत्ता असूनही केवळ पैशाअभावी हे विद्यार्थी मागे पडू नयेत, या उद्देशाने मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून ‘एपीएमए’ने हा उपक्रम हाती घेतला आहे.”
‘नीट’ परीक्षेच्या प्रवासात ‘एपीएमए’ या विद्यार्थ्यांसाठी सारथी म्हणून काम करेल. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित सविस्तर उत्तरांसह पाच सराव प्रश्नपत्रिका www.apma.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील. भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांसाठी प्रत्येकी दोन, अशी एकूण सहा ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्याने होतील. ही व्याख्याने झूम, तसेच युट्युबवर लाईव्ह पाहता येतील. ‘नीट’ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे नियम काय आहेत, यावर एक मार्गदर्शनपर व्याख्यानही होणार असल्याचे डॉ. तपस्वी म्हणाल्या.
पुणे शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून त्यांचा आत्मविश्वास आणि यशाची शक्यता निश्चित वाढेल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी www.apma.co.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. १३ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना यासाठी नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.
भारतीय विद्यार्थी रोबोटिक्स टीम ह्यूस्टनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी रवाना
Newsworldmarathi Pune: मुंबईतील “टीम आर फॅक्टर 6024” ने USA मध्ये दोन प्रमुख पुरस्कार जिंकून ह्यूस्टनमधील FRC वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता प्राप्त केली आहे. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप 16 ते 19 एप्रिल दरम्यान ह्यूस्टन, USA मध्ये होणार आहे.
मुंबई स्थित “टीम आर फॅक्टर 6024” ने मार्च महिन्यात USA मध्ये झालेल्या “फर्स्ट रोबोटिक्स चॅलेंज” (FRC) मध्ये अत्यंत मान्यताप्राप्त ठरले आणि दोन प्रमुख पुरस्कार मिळवले. या टीममध्ये मुंबई, बंगलोर आणि पुणे येथील आठ शाळांतील 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रपणे रोबोट प्रोग्राम, डिझाइन आणि अॅस्सेम्बल केले आहेत, ज्यासाठी त्यांना कोणतीही बाह्य मदत घेतली नाही.
या विद्यार्थ्यांचा समूह 8वी ते 12वीच्या दरम्यान आहे. त्यांनी “माइंड फॅक्टरी” मुंबई येथे मार्गदर्शक निलेश शाह आणि पारुल शाह यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यांच्या तयार केलेल्या रोबोटचे नाव “गोल्डफिश” आहे. टीममधील काही सदस्य हे मुंबईतील ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आहेत, ज्यात समृद्धी स्वरुप, रिनेसा देधिया, प्रपटी दोशी, रिधान देधिया, सक्षम गुप्ता, रचित जैन आणि अर्जुन वशिष्ठ यांचा समावेश आहे.
तर, अन्य सदस्य हे मुंबईतील “डीएसबी इंटरनॅशनल स्कूल”, “पेस जूनियर कॉलेज”, “जामनाबाई नारसी स्कूल”, “विटी इंटरनॅशनल स्कूल”, “राजहन्स विद्यालय” आणि “सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल” येथील विद्यार्थी आहेत. पुण्यातील “विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी” आणि गोव्यातील “शारदा मंदिर स्कूल” येथील विद्यार्थ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
टीम आर फॅक्टर 6024 ने ‘2025 इमेजरी अवॉर्ड’ आणि ‘2025 इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड’ मिळवले आहेत. इमेजरी अवॉर्ड इंजिनीअरिंग आणि व्हिज्युअल डिझाइनला मान्यता देतो, तर इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अवॉर्ड समुदायात इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील उत्साही भावना वाढविण्यासाठी दिला जातो. या पुरस्कारासाठी टीमने USA, मेक्सिको आणि टर्की येथील इतर टीम्सशी स्पर्धा केली.
टीम 6024 ही FRC च्या इतिहासातील पहिली भारतीय टीम आहे, आणि त्यांचा उद्देश FIRST (For Inspiration & Recognition of Science & Technology) या नॉन-प्रॉफिट संस्थेचा भारतात आधार मजबूत करणे आहे. या टीमने आपल्या 10 वर्षांच्या कार्यकालात गरीब विद्यार्थ्यांना रोबोटिक्स शिकवले, पुण्यात FIRST टेक चॅलेंज (FTC) आयोजित केले आणि विविध सत्रांमध्ये आपल्या नवकल्पनांचे प्रदर्शन केले.
टीम आर फॅक्टर 6024 च्या या यशाने भारतीय रोबोटिक्स क्षेत्रात एक नवीन आयाम निर्माण केला आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरले आहे.
आळंदीत अवतरले हिमालयीन चैतन्य : ध्यानयोग शिबिरास उदंड प्रतिसाद
Newsworldmarathi Pune : वारकरी संप्रदायातील महान संत ज्ञानेश्वर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आळंदीच्या भूमीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराला भारतासह जगभरातून हजारो साधकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची, पुणे आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन, गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ ते २० हजार साधकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आध्यात्मिक अनुभूती घेतली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन सोहळा आमदार अशोक पवार, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, ओडिशा पोलिस दलातील आयपीएस, महासंचालक अधिकारी श्री दीक्षित, श्री संदीप पाटील, आयपीएस, पोलीस महानिरीक्षक, अति नक्षलविरोधी अभियान, महाराष्ट्र राज्य, श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशनचे संचालक अंबरीश मोडक, चंदेली महाराज, जोग महाराज शिक्षण संस्थेचे सचिव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या पवित्र सान्निध्यात हिमालयातील गूढ आणि दिव्य चैतन्याचे दर्शन देणारे हे शिबिर, उपस्थित भक्तांसाठी अध्यात्मिक शांती, आत्मानुभूती आणि अंतर्मुखतेचा एक अद्वितीय प्रवास ठरले. गेली दोन दिवस हे आध्यात्मिक शिबिर साधकांसाठी अत्यंत आगळीवेगळी पर्वणी ठरत आहे.
– स्वामीजींचे प्रवचन आणि आध्यात्मिक संदेश :
शिबिरात श्री शिवकृपानंद स्वामीजींनी आपल्या प्रभावी वाणीने श्रोत्यांच्या अंतःकरणात आध्यात्मिक प्रकाश जागवला. त्यांच्या प्रवचनातील काही मोलाचे संदेश:
“समाजातील विविध धर्म उपासना पद्धती आहेत, खरा धर्म मनुष्यधर्म आहे.”
“परमात्मा ही विश्वचेतना आहे, जी निर्मळ माध्यमातून प्रकट होते. भारतात जिवंत परमात्म्याची परिकल्पना गुरूंच्या रूपात मान्य केलेली आहे.”
“गुरु म्हणजे अंतर्मुखता देणारा दीपस्तंभ. जीवनात आध्यात्म्याचे बीज पेरले गेले तरच सकारात्मक परिवर्तन शक्य आहे.”
“ध्यान म्हणजे वर्तमानात राहणे, अपेक्षांविना जगणे. नियमित ध्यान साधनेने जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात.”
प्रवचनाच्या समाप्तीला स्वामीजींनी “मैं एक पवित्र आत्मा हूँ, मैं एक शुद्ध आत्मा हूँ” या मंत्राद्वारे सर्व साधकांकडून सामूहिक ध्यान करून घेतले.
– थेट प्रक्षेपण आणि जागतिक प्रसारण:
या दिव्य कार्यक्रमाचे “गुरुतत्त्व” यूट्यूब चॅनेलसह सुमारे ५० सॅटेलाइट व केबल टीव्ही चॅनेल्सवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले असून भारतासह ७० पेक्षा अधिक देशांतील साधक याचा लाभ घेत आहेत.
आध्यात्मिक प्रदर्शनी विशेष आकर्षण:
या शिबिरात सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सर्वांसाठी आध्यात्मिक प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून, आयोजकांच्या मते, ही प्रदर्शनी ध्यानसाधनेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक साधकासाठी प्रेरणादायी ठरते.
– संतभूमीत हिमालयाचे चैतन्य :
आळंदी सारख्या संतपरंपरेने पावन झालेल्या भूमीत हिमालयाच्या दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे हे शिबिर भक्तांच्या स्मरणात दीर्घकाळ रेखाटले जाईल, यात शंका नाही. हे शिबिर म्हणजे भक्तांसाठी एक आत्मिक पर्वणीच ठरली.
“तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन”; युवकाच्या धमकीमुळे विद्यार्थिनीचा टोकाचा निर्णय
Newsworldmarathi Pune : बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील एका तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.
संबंधित तरुणाने पीडित मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करत होतं. त्यास नकार दिल्यानंतर “तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई-वडिलांचे मुंडके उडवीन” अशी धमकी दिली. या धमकीमुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर आपल्या आयुष्याचा अंत करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १५ वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे त्याचे साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता.
मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळली होती.
दरम्यान, ७ एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने मयत मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून संबंधित तरुणाविरोधात कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

