Newsworldmarathi Pune: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम ‘जागर संविधानाचा’ हा 13 ते 19 एप्रिल दरम्यान विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के, तानाजी तापकीर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना वाडेकर म्हणाले, ‘जागर संविधानाचा’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नागरिकांना तब्बल आठवडाभर अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनात पुणे महापालिकेच्या माजी उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. महोत्सव समितीच्या वतीने यापूर्वी गणेश कला क्रीडा रंगमंच, शनिवार वाडा अशा विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यंदाचे सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौक, बोपोडी, पुणे येथे होणार आहेत.
या उपक्रमांतर्गत दिनांक 13 रोजी रात्री बारा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा 2025 हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये धम्मवंदना, भीमस्तुती, भीमस्मरण आणि नजरबंदी करणारी फटाक्यांची भव्य आतिषबाजी यांचा समावेश आहे.
तिन्ही महापुरुषांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी दिनांक 14 रोजी सायंकाळी सहा वाजता ‘जयंती जल्लोष’ हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यामध्ये भव्य लाईट अँड साऊंड शो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
आंबेडकरी चळवळीतील शाहीर मीराताई उमप यांच्या भारुड आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 15 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे तर, संगीतकार जॉली मोरे व शाहीर सीमा पाटील यांचा ‘वुई द पीपल’ हा संगीत महानाट्य आणि आंबेडकरी जलसा चा कार्यक्रम दिनांक 16 रोजी संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांच्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचा प्रयोग दिनांक 17 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार असून उदय साटम लिखित आणि दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ हा कार्यक्रम 18 तारखेला संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय संविधान आणि महापुरुषांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा कार्यक्रम ‘होम मिनिस्टर’ याने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन परशुराम वाडेकर यांनी केले आहे.
*‘फुले’ चित्रपटाला पाठिंबा*
चित्रपट सेन्सॉर बोर्डने अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले‘ या चित्रपटात तब्बल 12 बदल सुचवले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. जात, मनू, मांग, महार वगैरे शब्द, सावित्रीबाईंच्या अंगावर मुलांनी शेण फेकण्याचा प्रसंग, पेशवाईचा उल्लेख, तुमचे हात आणि पाय वेगळे केले असते हा संवाद चित्रपटातून काढा, असे या स्वतःला विद्वान समजणाऱ्या सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले आहे. या मंडळींना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे दाम्पत्य आणि त्यांचे काम माहीतच नसणार. या सेन्सॉर बोर्डने आधी कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न एका दिग्दर्शकाला केला होता. समाज सुधारकांचे कार्य लोकांच्या पुढे येऊ नये असे सेन्सॉर बोर्डाला वाटते, परंतु आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्ष ‘फुले’ चित्रपटाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे परशुराम वाडेकर यांनी सांगितले.
Newsworldmarathi Pune : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार यांचा काल साखरपुडा अगदी थाटामाटात पार पडला. पार्थ दादा जय पवार यांच्यापेक्षा मोठे आहेत मग त्यांचं लग्न कधी असा प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला होता. अजित पवार यांनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर देत म्हणाले, की जयने त्याचं ठरवलं… पार्थने ठरवलं की त्याचाही लग्न करू… या उत्तरामुळे पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.
जय पवार यांचा काल साखरपुडा संपन्न झाला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते.
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. या सोहळ्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते. पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.
Newsworldmarathi Team: उपाशी पोटी सत्य शोधता येत नाही. बाकी सत्य शिव सुंदर आहे अशा रोमँटिक कल्पनाही लक्जरी व प्रिव्हीलेजचं काम आहे. ज्यांच्या घरी दिमतीला दास्यांची फौज होती अशा नोबेल प्राप्त कविंनी ते सत्य शोधावंही.
महात्मा ज्योतीबा फुलेंनी येथल्या बहुजनांना चला आता सत्यशोधू गड्या.. असला कोणताही व्यक्तीगत कॅथरसिस केला नव्हता. त्यांना स्पष्टपणे माहित होतं की येथील सर्वच जात-धर्म ‘इन्स्टीट्युशन’ आपल्याला केवळ ‘ज्ञान’ किंवा ‘सत्य’ अशा कोणत्या अबस्ट्रॅक गोष्टीपासून अडवून ठेवत नाहीत तर त्यांचा मुख्यहेतू तुम्हाला सत्यापासून नाहीतर ‘सत्तेपासून’ दूर ठेवणं हा आहे. सत्ता ही येथल्या रिसोर्सेसवरील. पाण्यावरील, धान्यावरील होय इथल्या संपत्तीवरील. धंदा, उद्योगावरील.
आता सत्य शोधत बसायचं की सत्ता शोधायची? काय आहे प्रॅगमॅटिक अप्रोच?
सत्य शोधण्याचा संघर्ष कदाचित मोरल पातळ्यावर ज्यांनी शोधायचा त्यांनी शोधावा. पण सत्तेवर आणि थेट इथल्या सगळ्या रिसोर्सेवर क्लेम करायचा असेल तर तुम्हाला मोरलशी चर्चा करायला वेळ नसतो , कारण तुमच्यावर थेट हल्ले होत असतात. ज्या रस्त्यावरून ब्राम्हणेत्तरांना चालयलाही परवानगी नव्हती तीथं जोतीबा घोड्यावर बसून ऐटीत टापात तेबी लाऊडली जायचे. यासाठी जिगरा लागतो.
कारखाने, कंत्राटं, स्टेटमध्ये संबंध, पैसे घालून प्रकाशन, पत्रकं, बॉडीगार्ड, हान की बडीव विषय होता डॉनचा. आता डॉन महात्मा फुलेंची इमेज मचूळ करून त्यावर नाटकं व सगळं हळहळी टाईप साक्षेपीछाप चालंलय. असो.
सत्याचा शोध सत्तेच्या शोधाशिवाय शक्य नाही.. हेच पुढे महामानव बाबासाहेबात दिसत..पाण्याचा लढा म्हणजे काय? रिसोर्सेसवरचा हक्क.. शासनकर्ती जमात म्हणजे काय? सत्तेत वाटा.. मंग कुठं सगळा धुरळा बसल्यावर सत्य म्हणजे बुद्धाच्या दिशेने वैगेरे.. हे फक्त बाबासाहेबांना राईट कळलं होतं. असो.
बहुजन पोरांनी ह्या वैचारिक,साहित्यिक, समतोली, साक्षेपी वैगेरे भंपक ग्रटीफिकेशनच्या नावाखाली भुरट्या युवा विचारवंताच्या, नाटक कंपन्या व लेखक सेलिब्रीटींना दिपून न जाता नीट झक मारली पाहिजे. आरं क्रिप्टो-फिप्टो जग कुठल्याकुठं चाललंय.. आपल्याला हाये ते इकून पुण्याकडं यावं वाटायलंय..अन पोराचं इकडं यगळंच गाणं वाजायलंय.. लेख वाचून कळवतो म्हणे.. दिर्घ लिहतो म्हणे..सिनेमा समिक्षा लिहतो म्हणे. तुम्हाला किंमत नसलेल्या व ज्यातली इॅकॉनॉमी संपलीये त्याच जागा घेण्याचा मोह वाटणं हे काही खरं आणि बरं नाही.
कुणाल तात्या गायकवाड यांच्या फेसबुकहून साभार …
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहे. अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा संपन्न झाला. अजित पवारांच्या पुण्याच्या फार्महाऊसला हा शाही साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंब, काही ठरावीक मित्रमंडळी उपस्थित होते.
Oplus_131072
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. या सोहळ्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय ज्यामध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते. पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा सोहळा संपन्न. सोहळ्याला फक्त विशेष आमंत्रितांनाच बोलवण्यात आलं होतं.
Oplus_131072
साखपुड्यानंतर सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे काही खास फोटो शेअर करत नव्या जोडप्याला शुभेच्छा आणि नव्या सूनेचं कुटुंबात स्वागत केलं आहे.
साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘जय मी तुझ्यासाठी प्रडंच आनंदी आहे… ऋतुजा तुझं स्वागत… दोघांनी देखील शुभेच्छा…’ सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Newsworldmarathi team : मानसिक ताण हा आधुनिक जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे, परंतु त्याचा शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, विशेषतः स्त्रियांमध्ये. स्त्रिया बर्याचदा अनेक भूमिका पार पाडतात—व्यावसायिक, काळजीवाहू, माता आणि गृहिणी, ज्यामुळे मानसिक ताण वाढतो. कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक दबाव हे ओझे वाढवतात, परिणामी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. हे परिणाम समजून घेणे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रभावी धोरणे स्वीकारणे हे एकूणच कल्याणासाठी महत्त्वाचे आहे.
तणावाचा शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो
जेव्हा मन तणावाखाली असते तेव्हा शरीर शारीरिक बदलांसह प्रतिसाद देते. कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या तणाव संप्रेरकांचे प्रकाशन, “लढा-किंवा-उड्डाण” प्रतिसादास चालना देते, जे दीर्घकाळापर्यंत, विविध शारीरिक कार्यांमध्ये व्यत्यय आणू शकते.
1. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या: तीव्र ताण रक्तदाब वाढवतो, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढवतो. उच्च पातळीच्या तणावाचा अनुभव घेणाऱ्या महिलांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येण्याची अधिक शक्यता असते.
2. हार्मोनल असंतुलन: तणाव मासिक पाळीमध्ये व्यत्यय आणू शकतो, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) ची लक्षणे वाढवू शकतो आणि गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होऊ शकतो. तीव्र ताणतणाव असलेल्या महिलांना लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव येऊ शकतो.
3. कमकुवत प्रतिकारशक्ती: सततचा ताण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे शरीर संक्रमण, ऍलर्जी आणि स्वयंप्रतिकार विकारांसाठी अधिक असुरक्षित बनते.
4. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर: तणाव आतड्याच्या आरोग्यावर परिणाम करतो, ज्यामुळे इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS), ऍसिड रिफ्लक्स आणि अल्सर सारख्या समस्या उद्भवतात.
5. मानसिक आरोग्य विकार: दीर्घकाळापर्यंत तणावाचा सामना करणाऱ्या महिलांमध्ये चिंता, नैराश्य आणि निद्रानाश सामान्य आहेत. भावनिक त्रासामुळे अति खाणे, मादक पदार्थांचे सेवन करणे किंवा सामाजिक जीवनातून माघार घेणे यासारख्या अस्वास्थ्यकर सामना करण्याची यंत्रणा देखील होऊ शकते.
6. वजन चढउतार: तणाव भूक आणि चयापचय प्रभावित करते, ज्यामुळे कमी भूक आणि पाचन त्रासांमुळे तणाव खाण्यामुळे किंवा वजन कमी झाल्यामुळे वजन वाढते.
7. त्वचा आणि केसांच्या समस्या: पुरळ, एक्जिमा, केस गळणे आणि अकाली राखाडी होणे हे हार्मोनल असंतुलनामुळे तणाव-प्रेरित असतात.
लेखक
डॉ. मिलिंद भोई
भाग – 1
Newsworldmarathi Pune :’पीएमआरडीए’ ने साडे तीन वर्षापूर्वी तयार केलेला व अमंलबजावणीसाठी प्रस्तावित ठेवण्यात आलेल्या डीपीला रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी निर्णय घेऊन डीपीला रद्द ठरविण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी भविष्यात तयार करण्यात येणारा ‘डीपी’ राजकीय हस्तक्षेप विरहीत व दलालांचा हस्तक्षेप विरहीत असावा अशी अपेक्षा सामान्यांकडून होत आहे.
पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचा डेव्हलपमेंट प्लॅनिंग अर्थात डीपी रद्द करण्याची परिस्थिती राज्य सरकारवर उद्भवली आहे. सुमारे साडे सहा हजार चौरस मीटर किलोमीटर क्षेत्रावर तयार करण्यात आलेला हा डीपी अक्षम्य चुका व पारदर्शकेचा आधारावर तयार करण्यात आला नसल्याचा ठपका ठेवत रद्द करण्याची परिस्थिती ओढवली आहे. हा डीपी रद्द करण्याचा धाडसी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी डीपीत सामाविष्ठ योजनेत अतिशय अन्यायकारक रचना सामान्यांवर लादल्याने डीपी रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढविली आहे.
गेली दहा वर्षापासून पुणे शहराभोवतीच्या नियोजनबध्द विकासासाठी ‘पीएमआरडीए’ ची स्थापना झाली असली तरी या प्राधिकरणामार्फत कुठलाच धोरणात्मक विकासाचा हेतू सामाविष्ठ गावांच्या विकासातून दिसत नाही.या प्राधिकरणाने साडेसहा हजार चौरस किलोमीटर भागाचा सामाविष्ठ केला असला तरी विकासाऐवजी पीएमआरडीए कडून कुठल्याही प्रकारची रचनात्मक सुविधा न मिळता उलट या सामाविष्ठ भागातून भरमसाठ कर आकारून रचनात्मक विकासाचा हेतू साध्य न करता उलट मनस्तापाचे केंद्र म्हणून पीएमआरडीएकडे बघण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.
‘पीएमआरडी’ च्या नियोजित हद्दीची रुपरेषा ठरल्यानंतर
या प्राधिकरणाची जबाबदारी निश्चित झाल्यानंतर नागरीकांना या व्यवस्थेद्ववारे चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊन सुलभ
विकसनशील परवाणग्या मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र प्राधिकरणाकडून सुंदर संकल्पना दृष्टीक्षेपात येण्याऐवजी या व्यवस्थेत क्लिष्ट प्रक्रिया, बांधकाम आराखडे मंजुरीसाठी मनस्ताप , अधिकाऱ्यांकडून परवानगीसाठी भरमसाट ‘अर्थिक’ पिळवणुकीची व्यवस्था तसेच अधिकाराचा बेलगामपणे वापर करुन सामान्य विकसकांना अर्थिक व्यवहारांसाठी छळ सुरू असल्याची चर्चा आहे. तर या प्राधिकरणाची अनधिकृत
बांधकाम धारकांना भिती दाखवून नोटिस पाठवून सटलमेंट क्रिया करुन ‘चोरुन सोडून संन्यासाला अटक ‘ अशा प्रकार या विभागाचा कारभाराचा अनुभव नागरीकांना आहे. त्यामुळे या प्राधिकरणाचाडीपी बदलला असला तरी ‘खादाड’
पणाला वेसण कोन घालणार अशी सामान्यांना अपेक्षा आहे.
प्राधिकरणाकडून तयार केलेला डीपी हा या सर्व विवादीत अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली तयार झाल्याने डीपी रद्द झाला तरी पुढील डीपी तयार होताना राजकीय व दलाली ही साखळी या डीपी पासून रोखण्याचे आव्हान असणार आहे. रद्द झालेल्या या डीपीत राजकीय व दलाल मंडळींनी अधिकारी हाताशी धरुन कोट्यवधींची उड्डाणे घेतल्याची उघड चर्चा दबक्या कारभारात आहे.
नव्याने तयार होणाऱ्या डीपीत नगरविकास विभागाच्या सर्व नियम व अटींचे तंतोतंत पालन करुन पारदर्शक व्यवस्था करणे अपेक्षित आहे. पुढील डीपीचे धोरण ठरविताना भौगोलिक, नैसर्गिक व स्थानिक परिस्थितीचे अवलोकन करुन डीपी तयार व्हावा अशी माफक अपेक्षा सामाविष्ठ गावांत आहे.
Newsworldmarathi Pune : भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटच्या मध्य प्रदेश येथील मुख्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंट मध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व सैनिकांकडून गेल्या 40 वर्षांपासून रेजिमेंटच्या मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भामध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावर याबाबत आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आज पाषाण येथील यशदा येथे नीती आयोगाच्या कार्यक्रमासाठी रामदास आठवले आले होते, यावेळी महार रेजिमेंट व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने आठवले यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले होते.
यावेळी बोलताना आठवले यांनी ” आपण बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारावा यासाठी आग्रही आहोत , यासंदर्भात राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांचेही मत सकारात्मक तयार करणार आहे. दरम्यान या प्रश्नावर गरज पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही सुद्धा भेट घेऊ असे स्पष्ट आश्वासन आठवले यांनी दिले.
रामदास आठवले यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राहुल डंबाळे यांच्या समवेत संतोष वानखेडे , बुद्धा चव्हाण , राहुल ससाने इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Newsworldmarathi Pune : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने आज (दि. 10) तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या 2624व्या जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या भव्य प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली.
“त्रिशला नंदन वीर की …. जय बोलो महावीर की,,, जय बोलो महावीर की” असा जयघोष करीत मंगलवाद्यांच्या सुरात शोभायात्रेची सुरुवात झाली.श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेस श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, श्री वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघ, श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, श्री दिगंबर जैन समाज आणि स्थानिक संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष अचल जैन, सचिव अनिल गेलडा, संपत जैन, समीर जैन, प्रचार प्रमुख सतीश शहा, विलास शहा, हरेश शहा, महावीर कटारिया, अल्पेश गोगरी यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
शोभायात्रेला सकाळी ७.३० वाजता गुरुवार पेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर येथून भगवान महावीर यांचा जयघोष करीत सुरुवात झाली. पारंपरिक वेषभूषेत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवित जैन बंधू-भगिनी उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. युवकांचा सहभाग मोठ्या संख्येने होता. शोभायात्रेत पुण्यातील विविध भागांमधून रथ सहभागी झाले होते त्याच प्रमाणे महिला मंडळांचाही सहभाग होता.
शोभायात्रा भांडी आळी, लालबहादूर शास्त्री चौक, बोहरी आळी, सोन्या मारुती मंदिर चौक, गणेश पेठ, गोविंद हवालई चौक, बुरडी पूल, पालखी विठोबा चौक, श्री शंखेश्वर पार्श्वनाथ मंदिर, रामोशी गेट, टिंबर मार्केट, मनमोहन पार्श्वनाथ मंदिर, सेव्हल लव्हज् चौक, अप्सरा चौक, प्रभात प्रेस, कटारिया हायस्कूल, लक्ष्मी विलास, मुकुंदनगर, सुजय गार्डन, शिवशंकर सभागृह, सातारा रोडमार्गे आदिनाथ स्थानक येथे दुपारी 12:30 वाजता पोहोचली. ढोल-ताशाच्या गजरात उत्साहाने आणि भावपूर्णतेने या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
आकर्षक फुलांच्या सजावटीने शोभायात्रेतील रथ सजविण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीस भगवान महावीर यांची प्रतिमा असलेला चांदीचा रथ होता. हा रथ भाविकांनी स्वत: ओढत नेला. भगवान महावीर यांच्या जन्माचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. महिलांनी महावीर जयंतीचे महत्त्व सांगणारे तसेच सामाजिक संदेश देणारे विविध फलक हाती घेऊन जनजागृती केली. सप्त अश्वांचा चंदेरी रथ, गजरथ, सिंहरथ यांच्यासह विविध बँड सहभागी झाले होते.
सोन्या मारुती चौकात भगवान महावीर आणि शोभायात्रेच्या अग्रभागी असलेले आचार्य विरागसागर सुरीश्वरजी महाराज आदि ठाणा यांचे दर्शन केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, ना. चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप,अभय छाजेड, अजय खेडेकर, प्रवीण चोरबेले आदींनी घेतले.
समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर घेण्यात आले. दुष्काळग्रस्त भागात पाण्याचे वाटप, पक्षांसाठी पाण्याची सोय करण्याकरीता मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. वडगाव धायरी येथील वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले. भवानी पेठेत नि:शुल्क आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
पोपटसेठ ओस्तवाल, राजेश शहा, सुनील कटारिया, नितीन जैन, निलेश शहा, भूपेंद्र शहा, भद्रेश बाफना, भरत सुराणा, संदीप भंडारी, अभय जैन या प्रसंगी उपस्थित होते.
अहिंसा रॅलीला प्रतिसाद भव्य दुचाकी अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात दादावाडी अहिंसा भवन येथे अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. जय जिनेन्द्र प्रतिष्ठान (नाजुश्री भवन) येथे रॅलीची सांगता झाली.
हो, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील हा शाब्दिक संघर्ष आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. सुप्रिया सुळे यांनी भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी आंदोलन छेडल्यावर अजित पवारांनी ‘खासदार निधीतून रस्ता करता येतो’ असं सूचक वक्तव्य करत टोला लगावला होता.
त्यावर प्रत्युत्तर देताना सुळे यांनी स्पष्ट केलं की, खासदार निधी ही मर्यादित रक्कम असते आणि त्यातून मोठे प्रकल्प पूर्ण करणं शक्य नसतं. त्यामुळे राज्य सरकारनेच हे काम हाती घ्यावं, अशी त्यांची भूमिका आहे.
आता सुळे यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार काय म्हणतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल, कारण हे संपूर्ण प्रकरण केवळ विकासकामांपुरतं मर्यादित न राहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांतील सूक्ष्म संघर्षाचं प्रतीक बनलं आहे.
अजित पवार म्हणाले, “मी गेली ३५ वर्षं राजकारण करतोय, पण ६०० मीटर रस्त्यासाठी उपोषण…?” हे विधान केवळ एक तक्रार नाही, तर एक प्रकारचं सूचक राजकीय संकेत आहे—की हे उपोषण केवळ रस्त्यासाठी नव्हतं, तर त्यामागं राजकीय हेतूही असू शकतो.
यावर सुप्रिया सुळे यांनीही संयम राखत स्पष्ट भूमिका मांडली—की खासदार निधी मर्यादित असतो आणि तो सगळ्या आवश्यक कामांसाठी पुरेसा नाही. शिवाय हा रस्ता स्थानिक भावनांशी जोडलेला आहे आणि जनतेच्या मागणीवरूनच ती कृती करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील संघर्ष आता थेट लोकांसमोर दिसू लागला आहे.
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित असून जैववैविध्य उद्यान आरक्षण बायो-डायर्व्हसिटी पार्क (बी.डी.पी.) हे आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेले आहे. तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यामध्ये देखील डोंगरमाथा-डोंगरउतार (हिलटॉप- हिलस्लोप झोन) हा वापर विभाग प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर हिल टॉप हिल स्लोप विभागात समाविष्ट असलेल्या जमिनी व बी.डी.पी. आरक्षणातील जमिनी या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असून आरक्षणातील जमिनींच्या मालकांकडून उक्त जमिनीवरील वापर विभाग / आरक्षण वगळून सदरहू जमिनी रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने शासनाकडे अनेक वर्षे पाठपुरावा करण्यात येत होता.
या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर माधुरी मिसाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार स्वतंत्र व्यक्तिगत प्रस्तावांवर निर्णय घेणे ऐवजी एकत्रित सर्वंकष निर्णय घेणेसाठी आणि पर्यावरणाचे संवर्धन व जतन करण्याच्या दृष्टीकोनातून राज्यातील सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्राच्या वेगवेगळ्या स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली एकत्र करुन एकच पर्यावरण पूरक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याकरिता रमानाथ झा,निवृत्त आय.ए.एस अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली अभ्यासगट गठीत केलेला आहे.
रमाकांत झा यांनी अनेक महानगरपालिकात आयुक्त म्हणून तसेच एमएमआरडीए आयुक्त आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थामध्ये नगर नियोजनात मोलाची कामगिरी बजावली आहे. सदर अभ्यासगटात त्यांचे सोबत आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे,महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे,सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, उपसंचालक, नगर रचना नागरी संशोधन घटक, पुणे यांचा समावेश आहे.