त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र सक्षम होईल : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

0
Newsworldmarathi Pune : सहकाराला शास्त्रशुद्ध पद्धतीने दिशा देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. देशातील ८ लाख सहकारी संस्थात आज ४० लाख लोक काम करत आहे तर, ८० लाख सदस्य सहकार विभागाशी निगडित आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याकरिता उत्तम प्रशासन, अनियमितता टाळण्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र व्याप्ती वाढेल आणि उद्योग, रोजगार संधी नव्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षात सहकार क्षेत्राला १७ लाख प्रशिक्षित मनुष्यबळ गरज आहे, त्यामुळे त्रिभुवन सहकार विद्यापीठाची गरज होती. हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर काम करेल आणि सहकार अधिक सक्षम होईल. संसद अधियनियम अंतर्गत हे विद्यापीठ चालणार असून यात संशोधन आणि विकास यावर देखील भर दिला जाणार आहे असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, सहकार विषयात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहे. नुकतेच संसद अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहात सहकार मंत्रालया माध्यमातून देशातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याता निर्णय झाला आहे. यामागील उद्देश, विद्यापीठ गरज काय, देशभरात त्यांचे काम कसे असेल याबाबत माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे. देश कृषी प्रधान असून ५० टक्क्यांपेक्षा अधिक जनता सहकार क्षेत्राशी जोडलेली आहे. देशातील ३० कोटी जनता वेगवेगळया मार्गाने सहकार क्षेत्राशी संबंधित आहे. साडेतीन वर्षापूर्वी सहकार मंत्रालय स्थापन झाले आणि त्याची जबाबदारी सहकारमध्ये भरीव योगदान असलेल्या अमित शाह यांना दिली गेली. त्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय सहकार क्षेत्रासाठी झाले. ग्रामीण भागातील पॅक्स यांना ताकद देण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता जिल्हा बँकेकडून जी आर्थिक रक्कम येत ती शेतकऱ्यांना छोट्या कर्ज स्वरूपात पूर्वी वाटप केली जात होती पण, आता पॅक्सला २५ विविध उद्योग दिले गेले आहे. देशात मोठ्या प्रमाणात पॅक्स कार्यरत आहे. ३२ राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेश यांनी ही मॉडेल स्वीकारले आणि त्यांना मोठा आर्थिक निधी मदत देखील दिली गेली आहे. सहकारातून समृद्धीकडे जाण्यासाठी अनेक गोष्टी पूर्तता करण्यात आली आहे. शहरी नागरी बँकांच्या सशक्तीकरण आणि त्यांचे आर्थिक बळकटीसाठी पुढाकार घेण्यात आला. तीन मोठ्या संस्था देखील स्थापन करून शेती समृद्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. चौकट ‘वैकुंठ मेहता’ असणार सहकार विद्यापाठीचा महत्त्वाचा भाग ! त्रिभुवन सहकार विद्यापीठासाठी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था महत्वपूर्ण भाग राहणार आहे, कारण या संस्थेचे सहकार क्षेत्रासाठी असणारे योगदान मोठे आहे. त्यामुळे ही संस्था विद्यापीठाचा अविभाज्य घटक असणार आहे. मोहोळ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील १५ हजार सेवा सोसायट्यांना दिलासा… नियमाप्रमाणे सेवा सोसायट्यांना आयकर भरावा लागत नाही. पण त्यासाठी त्यांना आयकर रिटर्न भरावा लागतो. देशात एक लाख सेवा सोसायट्या (पॅक्स) आहे. त्यापैकी अनेक पॅक्स यांना आयकर विभाग बाबत नोटीस आली होती. महाराष्ट्रामध्ये १५ हजार पॅक्स यांना आयकर रिटर्न वेळेत न भरल्याने २० टक्के आयकर लागू झाला होता. पण याबाबत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याशी समन्वय साधून याला स्थिगिती मिळवली आहे. पॅक्स यांना सक्षम अधिकारी यांच्यासमोर प्रक्रिया पूर्ण केल्यास संबंधित आयकर लागू होणार नाही, अशी माहिती यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

आळंदी देवाची येथे हिमालयीन समर्पण ध्यानयोग महाशिबिराचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune : हिमालयीन समर्पण ध्यान महाशिबिराचे आयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० एप्रिल ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत मुंबई मराठा फ्रुटवाला धर्मशाळा ग्राउंड, आळंदी देवाची, पुणे येथे होणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढलेला तणाव, दुःख आणि त्या दुःखाला दूर करण्यासाठी बाह्य उपायांचा शोध यातच मनुष्य अडकला आहे. परंतु, दुःख दूर करण्याचा उपाय बाहेर नसून आपल्या आतच आहे. व्यक्तिने आपल्या जीवनात ध्यान जोडल्यास तो शांती प्राप्त करू शकतो आणि यातूनच शांतिमय विश्वाची निर्मिती केली जाऊ शकते. ध्यानयोग केल्याने शरीरभाव कमी होऊन आत्मभाव वाढण्यास मदत होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात शांती आणि आत्मसाक्षात्काराच्या शोधात असलेले असंख्य साधक ‘हिमालयीन समर्पण ध्यानयोग’ च्या मार्गाने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या आत्मधर्माची, विश्वधर्माची आणि ध्यानाची प्रत्यक्ष अनुभूती या निःशुल्क शिबिरामध्ये आपल्याला जिवंत सद्गुरूंच्या सानिध्यात प्राप्त होऊ शकते. सद्‌गुरु श्री शिवकृपानंद स्वामीजी एक आत्मसाक्षात्कारी ऋषी आहेत ज्यांनी १६ वर्षे हिमालयात ध्यान साधना करून अनेक कैवल्य कुंभक योगी , जैन मुनी आणि हिमालयीन गुरूं कडून दिव्य आत्मज्ञान आत्मसात केले. हिमालयातील हा अनुभूती प्रधान, अमूल्य ८०० वर्ष जुना समर्पण ध्यानयोग संस्कार भारतासहित जगातील ७२ देशातील लोकांनी आपलासा केला आहे . श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आत्मानुभूती बाबत, विश्वधर्म, आत्मधर्म बाबत जे सांगितले त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा सुयोग या अद्वितीय तीन दिवसीय निःशुल्क हिमालयीन समर्पण ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून घडणार आहे. शिवाय शिविराच्या निमित्ताने, शिविरस्थळीच एक विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे- आळंदी ते आळंदी (गुरु अनेक गुरु तत्व एक) प्रदर्शनीची मुख्य आकर्षणं: •संत ज्ञानेश्वर महाराज व परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी यांनी सांगितलेल्या आध्यात्मिक विषयांचे सुंदर समन्वय व सचित्र सादरीकरण •परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या हिमालयातील आध्यात्मिक प्रवासाची झलक •वेळ: सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरू आपण सर्वांनी या प्रदर्शनीस अवश्य भेट द्यावी, असे मनःपूर्वक आमंत्रण.

शरद पवार आणि अजित पवारांच्या साक्षीने जय पवार यांचा आज साखरपुडा

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धाकट्या मुलगा जय पवार यांचा आज, 10 एप्रिल रोजी पुण्यात साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा खासगी स्वरूपाचा असून, त्यात पवार कुटुंबातील सदस्यांसोबत काही मोजकेच नातेवाईक आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. जय पवार यांचं ऋतुजा पाटील यांच्यासोबत लग्न ठरलेलं असून, ऋतुजा या सोशल मीडिया कंपनी चालवणारे प्रवीण पाटील यांच्या मुलगी आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी साखरपुड्यापूर्वी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने, हे नातं केवळ कुटुंबापुरतंच न राहता, एकप्रकारे राजकीय सौहार्दाचंही प्रतीक बनत आहे. जय पवार सुरुवातीला राजकारणापासून दूर राहिले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर त्यांनी सक्रियता वाढवली आहे. त्यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्यानंतर, घरच्याच राजकीय भूमिकेमुळे जय पवार यांनाही पुढे यावं लागलं. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोही पवार कुटुंबाच्या एकत्र येण्याची खूण मानले जात आहेत. विशेषतः अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राजकीय अंतर लक्षात घेतलं, तर या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येत असल्याची बातमी राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरतेय. कोण आहे ऋतुजा पाटील? जय पवार यांचा साखरपुडा फलटण येथील प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत ठरला आहे. ऋतुजा या एक सोशल मीडिया कंपनी सांभाळतात आणि उच्चशिक्षित आहेत. त्यांची बहीण प्रसिद्ध केसरी ट्रॅव्हल्सच्या पाटील कुटुंबातल्या घरात सून म्हणून आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. आता हे नातं अधिकृत होत असून दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत.

सत्य घटनेवर आधारित ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे : अभिनेत्री संस्कृती बालगुडे

0
Newsworldmarathi pune: मराठी चित्रपटकर्मींना जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडण्यात ’करेज’ या चित्रपटाने निश्चितच पुढचे पाऊल टाकले आहे. जे आपल्या मराठी चित्रपटांना प्रेरणा देईल. असा विश्वास अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी व्यक्त केला. ’करेज’ चित्रपटातील केंद्रीय भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा विशेष सन्मान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी लेखक समीक्षक राज काझी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्या बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे यावेळी मंचावर उपस्थित होते.  हॉलिवूडच नव्हे तर जगात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ’वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओज’मध्ये ’करेज’ या चित्रपटाचा लॉस एंजेलिस येथे एका खास शो नुकताच पार पडला. चित्रपट इंगजी असला तरी निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मराठी असल्याने याचा प्रातिनिधिक सन्मान म्हणून महामंडळातर्फे या संवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात दुख: असते आणि प्रत्येकाचे वेगळे असते आपण त्याला  कसे सामोरे जातो हे अत्यंत महत्वाचे असते, असे भान या चित्रपटाने दिले असे नमूद करत एक चांगली कलाकृती, वेगळा सामाजिक संदेश देणारा आणि सत्य घटनेवर आधारित असणारा ‘करेज’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे असे आवाहन अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांनी केले.  पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मराठी माणसांनी इंग्रजीत केलेल्या या चित्रपटांचे जगभर कौतुक होत आहे. सध्या हा चित्रपट जगभरातील विविध फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शित केला जात आहे. चित्रपटाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा एक सामाजिक विषय असला तरी यात एक ह्रदयास्पर्शी प्रेमकथा दडलेली आहे. राजराणी शर्मा  यांनी पतीला किडनी देताना केलेला संघर्षमय प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.  मेघराज राजेभोसले म्हणाले, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सातत्याने नवनवीन संकल्पना राबवत असते, काही नवीन करू पाहणाऱ्या चित्रकर्मीच्या पाठीशी उभे राहते आणि त्यांना प्रोत्साहन देत असते. आम्हाला अभिमान आहे की ‘करेज’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ यांनी एक जागतिक दर्जाचा चित्रपट निर्माण केला आहे. संस्कृती बालगुडे या आपल्या पुण्यातील आहेत, महामंडळाशी संलग्न आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

जितो आयोजित सामूहिक नवकार महामंत्र पठणात 11 हजार पुणेकरांचा सहभाग

0
Newsworldmarath Pune : विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे विभागातर्फे आज (दि. 9) विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतासह 108 देशांमधील नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. सकाळी सात वाजून दोन मिनिटांनी सुरू झालेला हा सोहळा नऊ वाजून 36 मिनिटांनी संपला. जात-धर्म-पंथाच्या सीमारेषा ओलांडून पुणे व परिसरातून जवळपास अकरा हजार स्त्री-पुरुषांनी नवकार महामंत्राचे पठण केले. देशातच नव्हे तर जगात शांतता नांदावी, सुखसमृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या ग्राउंडवर आज भव्य-दिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. प. पू. आ. लब्धीप्रभ सुरीश्वरजी, प. पू. जयप्रभ विजयजी मसा, प. पू. आ. विरागसागर सुरीश्वरजी महाराजा आदि ठाणा, प. पू. पन्यास तत्वरत्न विजयजी, प. पू. उपाध्याय गौतममुनीजी, प. पू. सा. सिद्धीपूर्णा श्रीजी म. सा. आदि ठाणा, प. पू. सा. चारुयशाश्री म.सा., प. पू. अर्हद ज्योतीजी म. सा., प. पू. सौम्याज्योतीजी म. सा., प. पू. गुरूछायाजी म. सा., प. पू. चारुप्रज्ञाजी मा साहब आदि ठाणा, प. पू. वैभवमुनीजी म. सा. यांची प्रवित्र उपस्थिती होती. पारंपरिक वेश परिधान करून, विश्वकल्याणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन स्त्री-पुरुष या सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. तरुणांची संख्याही लक्षवेधी होती. नवकार मंत्राच्या सामूहिक पठणादरम्यान वंदे नवकारम्‌‍ जय जिनेंद्र या घोषणेने वातावणात चैतन्य निर्माण झाले. सुरुवाती दर्डा परिवारातर्फे शंखनाद करण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या उपक्रमात सहभाग होता. नवकार महामंत्राच्या पठणानंतर मंत्राच्या महात्म्याचे वर्णन करून उपस्थितांना संबोधन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, हा मंत्र देश-विदेशासह अनेक ठिकाणी एकाचवेळी पठण केला जात आहे त्यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा अभूतपूर्व आहे. हा केवळ मंत्र नसून आस्थेचे केंद्र, जीवनाचे मूळ स्वरूप आहे. नवकार मंत्राची नऊ तत्त्वे सांगून या उपक्रमानिमित्त नागरिकांनी नऊ संकल्प करावेत अशी अपेक्षा व्यक्त करताना पाणी बचत, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन, स्वच्छता, स्वदेशीचा स्वीकार, देशदर्शन, सेंद्रिय शेती, आरोग्यपूर्ण जीवनपद्धती, योग आणि क्रीडा यांचे महत्त्व, गरिबांना मदत या नऊ सूत्रांचा प्रत्येक नागरिकाने अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. युवा कलाकार विश्व विशाल चोरडिया याने नवकार मंत्राचे पठण केले. त्यास शिव विशाल चोरडिया याने तबलासाथ केली. विनित घेमावत यांनी नवकार महामंत्राची महिती सांगणाऱ्या भक्तीरचना सादर केल्या. सचिन इंगळे आणि सहकाऱ्यांनी सहवादनातून नवकार महामंत्र सादर केला. केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती. पुणेकरांशी संवाद साधताना जय जिनेंद्र असा जयघोष करून ते म्हणाले, हा एक मंगलमय धार्मिक सोहळा असून यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. 68 अक्षरांच्या या मंत्राचा महिमा अपरंपरा असून यात ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुरूंना वंदन केले आहे. विश्वकल्याणासाठी पुणेकर जातीभेद विसरून मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. स्वागतपर प्रास्ताविकात दिनेश ओसवाल म्हणाले, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रकुमार छाजेड म्हणाले, पुण्यासह भारतातीलच नव्हे तर जगातील अनेक शहरांमधून नवकार मंत्राचे एकाच वेळेला पठण होत आहे, यातून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत आहे, जी विश्वशांती व विश्व कल्याणाला पोषक ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल, विशाल चोरडिया, अचल जैन दिलीप विनाकीया,रुपेश कोठारी,विशाल शिंगवी, अजय मेहता यांनी प्रयत्न केले.

जेव्हा उड्डाण मंत्रीच थेट पायलट होतात…

0
Newsworldmarathi Pune : देशाच्या नागरी विमान वाहतूक खात्याचा कारभार दिल्लीपासून सांभाळणारे आणि पुण्यातील गल्लीबोळातील कार्यकर्त्यांमध्ये सहज मिसळणारे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वतः पायलट होऊन थेट विमानच चालवून उपस्थितांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. मोहोळ यांनी प्रशिक्षणार्थी पायलटकडून विमानाच्या यंत्रणेची सविस्तर माहिती घेतली आणि काही वेळातच “तयार है हम!” या आत्मविश्वासात भरून थेट विमान चालवले. आकाशात झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता आणि आत्मविश्वास याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. मंत्री मोहोळ यांनी विमान आकाशात टेक ऑफ करताच विमानातील उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हा प्रसंग पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी होता — कारण एखादा मंत्री केवळ फाईलांपुरता मर्यादित न राहता, क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यास उत्सुक असल्याचे दर्शन त्यातून घडले. दिल्लीतील कारभार सांभाळत असताना मोहोळ यांनी पुण्यावरील लक्ष थोडे ही कमी केलेले नाही. उलट पुणेकरांसाठी काय करता येईल याचा विचार ते नेहमी करताना दिसतात. बाणेर येथील ‘यो स्काईज एव्हीएशन’ प्रशिक्षण इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘एअरबस A320’ फ्लाइट सिम्युलेटरचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विमान चालविण्याचा अनुभव घेतला. हे इन्स्टिट्यूट हवाई क्षेत्रात ज्यांना करिअर करायचे आहे, अशांसाठी ही संस्था प्रशिक्षण देणार आहे. या प्रसंगी ‘यो स्काईज’चे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट यांनी सिम्युलेटरविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृष्णकुमार गोयल, विजय भंडारी, प्रवीण बढेकर, राजेंद्र जैन, राजेंद्र मुथा, मोतीलाल सांकला, .सनी सांकला, श्री. सुनील नहार, उमेश जोशी, डॉ. रवी चिटणीस, डॉ. मनोज तरांबळे, यो स्काईजचे संस्थापक संचालक स्क्वॉड्रन लीडर (नि.) अजय परांजपे आणि संचालिका कॅप्टन तृप्ती कर्नावट आदींसह मान्यवर उपस्थित होते.

नवकार महामंत्र जप जनजागृतीसाठी जितोच्या वतीने दुचाकी रॅली

0
Newsworldmarathi Pune: जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहराच्या विविध भागांतून एकाच वेळी निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. नवकार महामंत्र सामूहिक जप सोहळ्याबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ९ एप्रिल रोजी सकाळी ७:०२ ते ९:३६ या वेळेत एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड, पुणे येथे नवकार महामंत्राचा सामूहिक जप करण्यात येणार आहे. भारतासह १०८ देशांतील नागरिक या दिवशी एकत्रितपणे नवकार महामंत्र पठण करीत विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करणार आहेत. दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असून, ते स्वतः नवकार महामंत्राचा जप करतील आणि नंतर देशवासियांना संबोधित करतील. पुण्यातील कार्यक्रमस्थळी पंतप्रधानांचे भाषण थेट प्रक्षेपणाद्वारे दाखविण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन जितो पुणेच्या वतीने करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया आणि मीडिया कोऑर्डिनेटर अभिजित डुंगरवाल यांनी केले आहे.

आर एम डी फाऊंडेशनद्वारा श्री तुळजा भवानी मंदिरासाठी प्याऊ जलप्रकल्प

0
Newsworldmarathi Pune : श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातून दरवर्षी करोडो भाविक येतात . त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी ,शुद्ध व थंड पिण्याचे पाणी बाराही महिने भाविकांना कायम मिळावे यासाठी रसिकलाल एम धारीवाल फाऊंडेशन द्वारा “प्याऊ -जल प्रकल्प ” लोकार्पण करतांना मला अतिशय आनंद होत आहे , या निमित्ताने रुपये २६. ५० लक्ष निधीचा ,२००० लिटर क्षमतेचा आर ओ प्लांट उभारण्यात आला आहे व मंदिराच्या चारही मजल्यावर सर्वच ठिकाणी थंड व शुद्ध पाणी भाविकांना उपलब्ध होणार आहे आणि आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आई भवानी मातेच्या चरणी हा प्रकल्प सेवाभावाने मी अर्पण करते अशी भावना फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई आर धारीवाल यांनी व्यक्त केली . आर एम डी फाऊंडेशनद्वारा संपूर्ण भारतभर प्याऊ -शुद्ध व थंड पिण्याचे पाणी विविध ठिकाणी जसे शासकीय रुग्णालये ,शाळा महाविद्यालय , सार्वजनिक उद्यानं , बाजारपेठा तसेच धार्मिक ठिकाणी उपलब्ध करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली . श्री राणा जगजीत सिंह पाटील आमदार तथा विश्वस्त सदस्य यांनी मंदिरास “प्याऊ जल प्रकल्प “ उभारून आर एम डी फाऊंडेशन द्वारे भाविकांची शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली याबाबत देवस्थानच्या व भाविकांच्या वतीने शोभाताई यांचा साडी, श्रीफळ , व भवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला व आभार मानले . कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी धाराशिव ,तहसीलदार ,कमांडंट श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय , देवस्थानाचे जनसंपर्क अधिकारी , प्राचार्य श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय, प्रदीप राठी, आकाश राठी अध्यक्ष लातूर अर्बन बँक , चंदकरण लड्डा , आर एम डी फाउंडेशन द्वारा माढा सोलापूर येथे माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून लवकरच लोकार्पण होत असलेले शोभाताई धारीवाल शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे महेश डोके व श्री धनराज शिंदे पदाधिकारी व इतर मान्यवर तथा भाविकगण मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मोठी बातमी! दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रूत घैसासांचा राजीनामा

0
Newsworldmarathi Pune : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपला पदाचा राजीनामा दिला आहे. रुग्णालय प्रशासनाच्या प्रतिमेला सुरुंग लागणाऱ्या घटनांमुळे आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता त्यांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तनिषा भिसे या रुग्णाच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादानंतरच ही घटना घडल्याने, या प्रकरणाला अधिक गती मिळाली आहे. डॉ. घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाला अधिकृतरित्या राजीनामा सुपूर्त केला असून, या राजीनाम्याची माहिती समोर येताच वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे या अल्पवयीन रुग्णाच्या उपचारासाठी डॉ. घैसास यांनी अमानत रक्कम (deposit) भरावी लागेल, अशी अट घातल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला होता. या आरोपानंतर सोशल मीडियावर रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी अशा वर्तणुकीचा निषेध करत रुग्णालय व्यवस्थापनाकडून कारवाईची मागणी केली.

इक्रम खान कुटुंबाची तिसरी पिढी साजरी करते रामनवमी उत्सव

0
Newsworldmarathi Pune : रामनवमी उत्सव देशभरात विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला .पुण्यातील रामवाडी येथील रामनवमी उत्सव मात्र इक्रम खान यांच्यामुळे चर्चेत आला आहे .इक्रम खान हे दरवर्षी रामनवमी उत्सवात सहभागी होऊन वर्षानुवर्षे साजरी करीत आहेत .इक्रम खान यांचे आजोबा व मुसा खान त्यांनतर त्यांचे वडील इसा खान हे दरवर्षी रामवाडी येथील राम मंदिराच्या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन सर्व प्रकारच्या मदतीने या उत्सवाचा प्रमुख भाग बनत आहेत .तीच परंपरा पूना गोल्फ क्लब चे कप्तान आणि उद्योजक इक्रम खान यांनी पुढे चालवली आहे . सध्या देशाला सर्वधर्म समभावाच्या विचाराची गरज असताना खान कुटुंबाने मात्र १९३२ सालापासून रामनवमी उत्सव साजरा करून आणि त्यात हिरारीने सहभाग घेऊन समाजापुढे फार मोठा आदर्श निर्माण केल्याची भावना स्थानिक रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे .खान कुटुंबाच्या या कार्याचे समाजातील सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे .आणि अशीच अपेक्षा सर्व धर्मातील बांधवाकडून व्यक्त केली जात आहे .यावेळी विजय गलांडे ,तोलेस्वर देवकर प्रमोद देवकर,संतोष देवकर सह राम मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते .