Newsworldmarathi pune : दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाने घेतलेली दखल आणि आरोग्य विभागाचा अहवाल सादर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये बैठक बोलवण्यात आली आहे.
रूपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, आरोग्य उपसंचालक व पोलिस आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत संबंधित राज्याच्या वतीनेची समिती नेमण्यात आलेली आहे या समितीने तयार केलेला अहवाल यावेळी सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवला आहे त्यात जबाबावर देखील चर्चा केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे.
Newsworldmarathi Pune : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती मृत्यू प्रकरणी आज महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली. यावेळी सविस्तर प्रकरणाची माहिती घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
चाकणकर म्हणाल्या, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची घटना घडली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसत आहेत. आरोग्य सुविधा ही मूलभूत अशी गरज आहे नागरिकांना धर्मादाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देण अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना रुग्णाला त्यांनी उपचार देण्यासाठी टाळाटाळ केली. यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्ण आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेली चर्चा ही गोपनीय असते पण रुग्णालयाने स्वतःला वाचवण्यासाठी अहवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध केला आहे. आणि त्यामध्ये रुग्णच्या बऱ्याचश्या गोपनीय गोष्टी जाहीर केले आहे. हे अत्यंत चुकीचा आहे हा अहवाल रुग्णालयाने समिती समोर मांडायला पाहिजे होता. याबद्दल त्यांना कडक शब्दात समज देणार आहे. असे ही रुपाली चकणकर म्हणाल्या.
आज राज्य महिला आयोगाच्या वतीने पोलीस आयुक्तालयांमध्ये बैठक बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये राज्याच्या वतीने जी समिती केली आहे त्याचा अहवाल पोलिस आयुक्तालयात सादर केला जाणार आहे. शिवाय पोलिसांनी जो जबाब नोंदवलं आहे त्यावर सुद्धा चर्चा केली जाणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.
Newsworldmarathi pune : रामायणातील काही दुर्लक्षित व्यक्तिरेखांवर आधारित ‘रामपर्व’ या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि व्यक्ताव्यक्त, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी ६:३० वाजता गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात होणार आहे.
रामायण हा भारतीयांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
प्रत्येक हिंदू माणसाच्या मनात प्रभू रामाचे अढळ स्थान आहे. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी पूर्ण झाल्यानंतर समस्त भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रामायणात अशा काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग आहेत ज्यावर कदाचित काव्य रचले गेलेले नाही. हाच दुवा धरून त्या व्यक्तिरेखा आणि प्रसंगावर आधारित काही काव्यरचना कवी अमित गोखले (पार्थ) यांनी रचल्या आहेत.
गीतरामायणातील अविट गोडी असलेल्या रचनांप्रमाणेच ‘रामपर्व’ कार्यक्रमातील रचनांना संगीतकार हेमंत आठवले आणि जान्हवी गोखले यांनी संगीतबद्ध केले असून ते रचना सादर करणार आहेत. शुभदा आठवले, केदार तळणीकर, अवधूत धायगुडे, वेधा पोळ साथसंगत करणार आहेत.
आपल्या मनात खोलवर रुजलेल्या या विषयाला एका वेगळ्या संहितेत बांधून रसिकांसमोर नवनिर्मितीचा आनंद ‘रामपर्व’द्वारे प्रकट करण्याचा मानस आहे, असे कार्यक्रमाचे संयोजक हेमंत आठवले यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.
Newsworldmarathi Pune: “आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील, या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी करायला हवा,” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. हा घरचा, गावकऱ्यांनी केलेला सत्कार भावस्पर्शी असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या सभापतिपदी निवड झाल्याबद्दल प्रा. राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. विधान परिषद आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या पुढाकारातून कोंढवा बु. ग्रामस्थ, कर्जत-जामखेड, करमाळा रहिवाशी संघाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. इस्कॉन मंदिर सभागृहात आयोजित सोहळ्यात योगेशअण्णा टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा कदम, वृषाली कामठे, नगरसेवक अनिल येवले, सतीश मरकड, तुषार कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, इस्कॉन मंदिराचे संजय भोसले, स्थानिक पदाधिकारी विरशेन जगताप आदी उपस्थित होते.
प्रा. राम शिंदे म्हणाले, “निवडणुकीत पराभूत होऊनही पक्षाने या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली. हा मोठा बहुमान आहे. सभागृह चालवताना लोकांचे प्रश्न मांडत असलेल्या सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. माझ्यासह योगेश टिळेकर हेही विधानसभेला पराभूत झाले, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस व पक्ष नेतृत्वाने आम्हाला जनतेसाठी काम करण्याची संधी दिली. मनात स्वच्छ, निर्मळ आणि लोकांप्रती संवेदना जागृत असतील, तर न्याय मिळतोच.”
“आम्हाला दोघांनाही कट कारस्थान करून पराभूत केले. मात्र मागे न सरकण्याची आमची भूमिका आहे. लोकांमध्ये राहणारा माणूस असल्याने पक्षाने आमचा सन्मान ठेवला. योगेश टिळेकर यांनी सभागृहात पोटतिडकीने आपल्या भागातील, तसेच राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न, लक्षवेधी मांडल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच दालनात बैठका लावल्या असून, १५ ते २० दिवसात समान पाणीपुरवठा आणि कात्रज-कोंढवा रस्त्याचा प्रश्न सुटेल. माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही. विधेयकात काही तरतुदी बदलाव्या लागल्या, तर चर्चा करून त्यात सुधारणा केली जाईल.”
योगेशअण्णा टिळेकर म्हणाले, सामान्य कुटुंबातील आपला माणूस विधान परिषदेचा सभापती झाला, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांची सेवा करताना तुमचे प्रश्न जोरकसपणे मांडू शकतो, कारण तिथे शिंदे साहेब आता सभापती म्हणून बसले आहेत. त्यांच्या कार्यातून नेहमीच शिकत आलो आहे. अहमदनगरचे अहिल्यानगर होण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. राजमाता अहिल्याबाई यांचा आदर्श घेऊन शिंदे साहेब काम करत आहेत. चोंडीचा विकास करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे. शिंदे, होळकर परिवाराचा वारसा यशस्वीपणे चालवत आहेत. संघटनेने, नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकला. आप्तस्वकीयांचा हा सत्कार आपल्याला ऊर्जा देणारा ठरेल. देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांची जोडी महाराष्ट्राला दिशा देईल. आपल्या पाठिंब्याने कात्रज, कोंढवा भागातील प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो.”
संजय भोसले, भूषण नहाटा यांनी मनोगते व्यक्त केली. गोकुळ बरकडे यांनी प्रास्ताविक केले. अमर हजारे यांनी सूत्रसंचालन केले. वीरशेन जगताप यांनी आभार मानले. मानपत्र वाचन अश्विनी कामठे यांनी केले.
Newsworldmarathi Team : पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले या त्यांच्या सामाजिक कार्य आणि सोशल मीडियावरील सक्रियतेमुळे चर्चेत आहेत. वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी कारेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून येण्याचा मान मिळवला. निर्मला नवले यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व यामुळे त्या अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत. त्यांच्याशी आमच्या न्यूजवर्ल्ड मराठीच्या टीम ने केलेली ही खास बातचीत
Oplus_131072
राजकारणात सुरुवात कशी झाली?
“मी आयटी इंजीनिअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. माझे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते. त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली. त्यामुळे समाजसेवेची आवड मला पहिल्यापासूनच होती. परंतु, लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली. माझ्या सरपंचपदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले, त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले. ते नेमही म्हणतात समजासेवा ही एक जबाबदारी नाही, तर ती एक लोकांसाठी संधी आहे. तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल? त्या दृष्टीने काम कर”, असंही निर्मला नवले म्हणाल्या.
Oplus_131072
आयटी इंजीनिअर असतानाही राजकारणात एन्ट्री का केली?
मी हा विचार कधीच केला नव्हता. एक इंजीनिअर म्हणून चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि काम करायचं, असाच निर्णय होता. परंतु, हे वेगळं फिल्ड आहे. मला लोकांसाठी काम करायची आवड पहिल्यापासूनच होती. मी या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही
Oplus_131072
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंग कडे तुम्ही कसं बघता?
समाजामध्ये काम करत असताना विरोध हा होत असतो. आणि जे लोक वाईट कमेंट करतात त्यातून त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते. त्यांचं कर्तुत्व काय असतं हे कोणालाच माहीत नसतं त्यामुळे मी त्या गोष्टींचा जास्त विचार करत नाही.
सामाजिक कार्य करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा असतो?
राजकारणाबद्दल एक भीती मनात होती पण मी माझे विचार घरच्यांना आणि माझे पती शुभम यांना सांगितले. मला राजकारणामध्ये काम करायचा आहे आणि यामुळे घरच्यांनी मला सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि पहिल्यांदा सरपंच पदाचा फॉर्म मी घरच्यांसोबतच भरला.
Oplus_131072
ग्रामपंचायतमध्ये काम करताना कामाचा अनुभव कसा आहे?
ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना हा सगळा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. माझ्या माहेरी आणि सासरी कोणताही राजकीय वारसा नसल्यामुळे मी कधीही राजकीय सभा किंवा कुठली मीटिंग बघितली नव्हती. पण खूप गोष्टी समजून घेऊन मी खूप गोष्टी मला यातून शिकायला मिळाल्या. सरपंच म्हणून अनेक ठिकाणी जावं लागतं योजना मंजूर करून आणाव्या लागतात ह्या गोष्टी मी नव्याने शिकले. माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावांमध्ये अनेक विकास कामे केली.
Oplus_131072
सरपंच म्हणून काम करत असताना कोणती अशी गोष्ट आहे जी मनाला खूप आनंद देते?
कारेगाव ग्रामपंचायतमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या होती. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मी नळ पाणीपुरवठा योजना राबवून गावा मधील पाण्याची समस्या सोडवली याचा मला खूप आनंद वाटतो. तसेच एआय टेक्नॉलॉजी चा वापर करून मी गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आणि स्पीकर देखील लावले आहेत तर त्या स्पीकर वरती रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसा लावली जाते आणि यामुळे ग्रामस्थांना खूप चांगलं वाटतं.
आमदार खासदारकी पेक्षा गावातलं राजकारण वेगळं असतं याचा कसा अनुभव आहे?
काम करताना अनेक गाडी अडचणी येतात पण मी त्याकडे एक संधी म्हणून पाहते. मी कोणताही काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार स्मरणात ठेवून काम करते. योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची ताकत असेल तर यश हे नक्की मिळते.
Oplus_131072
महिलांनी राजकारणात यावं का त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
महिलांनी राजकारणात येणं हे खूप महत्त्वाचा आहे आणि महिलांनी महिलांसाठी राजकारणात आलं पाहिजे. कारण महिलांना महिलांच्या समस्या या अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात त्या सोडवण्यासाठी महिला चांगले प्रयत्न करू शकतात. महिलाही घर उत्तम प्रकारे सांभाळते त्यामुळे ते देशही चांगल्या प्रकारे चालू शकते असं मला वाटतं त्यामुळे महिलांनी राजकारणात आलं पाहिजे.
Newsworldmarathi Pune : धर्म, जात, पंथ यांच्या सीमा ओलांडून भारतासह 108 देशांमधील नागरिक विश्वशांती आणि विश्वकल्याणाठी विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त नवकार महामंत्राचे सामूहिक पठण करणार आहेत. करोडो लोकांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 7:02 ते 9:36 या कालावधीत करण्यात आले आहे, अशी माहिती जितोचे चेअरमन इंद्रकुमार छाजेड, चिफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल, सेक्रेटरी लक्ष्मीकांत खाबिया, प्रविण चोरबेले, अभिजित डुंगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अनिल भंसाळी, ॲड. विशाल शिंगवी उपस्थित होते. दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सहभाग असणार आहे.
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) माध्यमातून पुणे येथील एस. पी. कॉलेज ग्राउंड, टिळक रोड येथे विश्व नवकार महामंत्र दिवसा निमित्त नवकार महामंत्राचा जप केला जाणार आहे. पुणे येथे आयोजित उपक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नामदार चंद्रकांत पाटील, नामदार माधुरी मिसाळ तसेच पुण्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्याच्या काळात संपूर्ण जगात अशांती, हिंसा आणि अराजक माजलेले दिसते. यातूनच सर्वत्र नकारात्मक उर्जेचा प्रभावही वाढत आहे. अशा अस्थिर काळात मनाला शांती देणारा प्रभावी महामंत्र म्हणजे नवकार मंत्र. या मंत्राच्या एकाच वेळी जगभरात होणाऱ्या स्मरण आणि पठणाने सकारात्मक उर्जेची निर्मिती होऊन प्रत्येक प्राणिमात्रात शांती, अहिंसा, सदाचाराची भावना रुजवली जाईल.
68 अक्षरांच्या या मंत्राचे पठण शरणागत भावाने एकाच वेळी करोडोंच्या संख्येने केले गेल्यास विश्वशांती आणि विश्वकल्याण होण्यास नक्कीच मदत होईल हे लक्षात घेऊन या अद्वितिय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे इंद्रकुमार छाजेड यांनी सांगितले.
विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे माहात्म्य जाणून देश-विदेशातील अनेक धार्मिक गुरू, राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर त्या त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या साठी 100पेक्षा अधिक अनुष्ठान असणार असून सहा हजारांपेक्षा अधिक ठिकाणांहून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दिनेश ओसवाल यांनी दिली.
नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने संपूर्ण विश्वात शांतता प्रस्थापित होण्यास, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे. नवकार महामंत्राच्या सामूहिक पठणाने जागतिक विक्रम प्रस्थापित होईल. नवकार महामंत्र पठण कुठल्याही जाती, धर्म, व्यक्तीशी निगडित नसून याद्वारे ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ गुणांना वंदन केले जाते, असे लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले.
सामूहिक नवकार महामंत्र पठणाच्या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि विश्वशांती व विश्वकल्याणासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन प्रविण चोरबेले यांनी केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी 15 हजारांहून अधिक पुणेकरांनी नाव नोंदणी केली आहे.
पुणे: पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे एका गर्भवती महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यांच्या पत्नीबाबत ही प्रकार घडला असून, उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयाने प्रथम दहा लाख रुपये जमा करा, तरच दाखल करून उपचार सुरू केले जातील अशी भूमिका घेतली. दरम्यान प्रकरणी राज्यभरात संतापाची लाट उससली यह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आमदारां अमित गोरखे आणि भिसे कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भिसे कुटुंबाने भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज भिसेकुटुंबीयांनी माझी भेट घेतलेली आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याबाबत मी त्यांना आश्वस्त केले आहे. मी तयार केलेली कमिटी या ठिकाणी आलेली आहे. मी या प्रकरणात सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालणार आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “भविष्यात पुन्हा असे प्रकरण घडू नये म्हणून नियमावली करणे आवश्यक आहे. दिनानाथ मंगेशकर रूग्णालय हे स्वर्गीय लतादिदी आणि मंगेशकर कुटुंबाने खूप मेहनतीतून उभारलेले आहे. नावाजलेले रूग्णालय आहे. तिथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. त्यामुळे सगळे चूक आहे असे म्हणून चालणार नाही. मात्र काल घडलेला प्रकार हा असंवेदनशीलच होता.”
Newsworldmarathi Pune: आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत, गौतमी पाटीलच्या नृत्याने सजलेलं “कृष्ण मुरारी” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच तिने या गाण्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या गाण्यात ती गोपिकेच्या भूमिकेत दिसत असून श्री कृष्णाची आराधना करताना दिसत आहे.
“कृष्ण मुरारी” या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. कृष्ण मुरारी या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात करण्यात आले आहे. परंतु हे गाणं पाहताना वृंदावनात असल्याचा भास होतो.
गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी व गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. त्यामुळे मी साईरत्न एंटरटेन्मेंट आणि निर्माते संदेश गाडेकर व सुरेश गाडेकर यांचे मनापासून आभार मानते. माझी कृष्णावर नितांत श्रद्धा आहे. मी दररोज कृष्णाची भक्तीभावाने आराधना करते. हे गाणं चित्रीत करताना मला खूप मज्जा आली. मला खूप सुंदर कमेंट्स येत आहेत हे पाहून अस वाटतंय प्रेक्षकांना हे गाणं आवडत आहे. माझ्यावर प्रेक्षकांचे असेच प्रेम कायम राहो हीच सदिच्छा!.”
Newsworldmarathi Pune: एका महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळ व व्यवस्थापनाने आत्मचिंतन करत इमर्जन्सी विभागातील धोरणात महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
यापुढे रुग्णालयात इमर्जन्सी कक्षात दाखल होणाऱ्या कोणत्याही रुग्णांकडून, डिलिव्हरीसाठी येणाऱ्या महिलांकडून, तसेच बालरोग विभागात येणाऱ्या रुग्णांकडून डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाही, असा ठराव करण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली. त्यांनी काल घडलेल्या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करत, तो दीनानाथ रुग्णालयाच्या इतिहासातील एक अत्यंत दु:खद व सुन्न करणारा दिवस असल्याचं म्हटलं आहे.
डॉ. केळकर म्हणाले “घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे उघड होईलच, मात्र या निमित्ताने सुरू झालेला असंवेदनशीलतेचा वाद संपवण्याची ही सुरुवात आहे. नागरिकांनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी.”
Newsworldmarathi Pune : पुण्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी ही एक महत्वाचे पावले आहेत. दिल्ली आणि चंदीगडप्रमाणेच आता पुणे महापालिकेनेही फॉग कॅनॉन मशिनच्या मदतीने हवेतील धूळ आणि प्रदूषक कण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनद्वारे पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाते, ज्यामुळे हवेत तरंगणारे धुलीकण जमिनीवर बसतात आणि हवा अधिक शुद्ध होते.
पुणे शहरात हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या *नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP)* अंतर्गत शहरात फॉग कॅनॉन मशिनद्वारे पाण्याची फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेने अलीकडेच पाच फॉग कॅनॉन मशिन खरेदी केली असून, शहरातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक मशिन वापरले जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी करून नागरिकांना स्वच्छ व आरोग्यदायी हवा उपलब्ध करून देणे.
दिल्ली, चंदीगड, मीरा भाईंदर, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये यापूर्वीच हे मशिन प्रभावीपणे वापरले गेले असून, पुण्यातही त्याच धर्तीवर हा उपक्रम राबवला जात आहे.
महापालिकेच्या आवारामध्ये नुकतेच फॉग कॅनॉन मशिनचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
फॉग कॅनॉन मशीनसाठी एका ट्रकवर ६ हजार लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस नोझल असलेले उच्च दाबाचे पंप बसविण्यात आले आहेत. या नोझलद्वारे पाण्याचे अतिसुक्ष्म कण बाहेर फेकले जातात. त्यामुळे हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुलीकणांचे हवेतील प्रमाण कमी करण्यास मदत होते.
शहरातील महापालिका भवन ते वारजे (कर्वे रस्ता), स्वारगेट-कात्रज-कोंढवा (सातारा रोड), स्वारगेट शेवाळेवाडी (सोलापूर रोड), संगमवाडी-येरवडा-केसनंद फाटा, दांडेकर पूल ते धायरी फाटा (सिंहगड रोड) या रस्त्यांवर फवारणी केली जाणार आहे. पुणे शहरातील वाढते वायूप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (NCAP) अंतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.