Newsworldmarathi Pune : पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे इयत्ता सहावी साठी अथर्व सतिश नवले याची निवड झाली आहे.
भिगवण (ता. इंदापूर) येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण येथे इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अथर्व सतिश नवले याची पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे येथे इयत्ता सहावी साठी निवड झाली आहे. अथर्वने आपल्या अभ्यासातील गुणवत्ता, मेहनत आणि कौशल्य यामुळे ही यशस्वी घौडदौड केली आहे.
अथर्वच्या या उल्लेखनीय यशामागे शिक्षक सचिन गायकवाड व सुरेश माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अथर्वच्या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, केंद्रप्रमुख मनीषा दुर्गे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी गाडे आणि मुख्याध्यापक हनुमंत पानसरे यांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अथर्वच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे हे फलित असून, शाळेचा आणि परिसराचा गौरव वाढवणारे आहे.
Newsworldmarathi Mumbai: लंडनवरुन मुंबईला प्रवासी विमान घेऊन जाणारे व्हर्जिन अटलांटिक विमान (व्हीएस३५८) मध्ये एका प्रवाशाच्या वैद्यकीय आणीबाणीमुळे अचानक तुर्कीतील दियाबाकीर विमानतळावर इमर्जन्सी अवघडरित्या लँडिग करावी लागली. मात्र, दियाबाकीर विमानतळ हे लष्करी विमानतळ आकाराने छोटे असल्याने हार्ड लँडिंग होउन गियरमध्ये समस्या निर्माण झाली. तसेच या विमानतळावर सुविधांची कमतरता व संर्पक साधनांच्या मर्यादा होत्या.
त्याचप्रमाणे संबंधित विमानतळ हे इतर देशांतर्गत/ आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या तुलनेत लहान असल्याने त्याठिकाणी लहान व्यवसायिक विमानांचे आणि लष्करी विमानांचेच उड्डाण होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी भारतीय प्रवासी ३० तास अडकून पडले होते. त्यातील काही प्रवाशांच्या ओळखीच्या लोकांनी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संर्पक साधून मदतीची मागणी केली. मोहोळ यांनी संवेदनशीलतेने हे प्रकरण हाताळत अडकलेल्या प्रवाशांशी, संबंधित अधिकाऱ्यांशी हवाई खात्या मार्फत बाेलणे करत व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स यांच्याशी देखील चर्चा केली.
त्यानंतर वेगवान हालचाली करत विविध यंत्रणाशी संर्पक करत प्रवाशांना दिलासा देत त्यांना मुंबईला परतण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करून विमान उपलब्ध झाल्याने प्रवाशांना तातडीने मायदेशी येण्यासाठी दिलासा मिळाला आहे.
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांनी दियाबाकीर विमानतळावर अडकलेले प्रवासी, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठी हवाई मंत्रालय मधील एक विशेष पथक नियुक्त केले. तसेच चांगल्या समन्वयासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची तसेच तुर्की मधील भारतीय राजदूताची देखील मदत घेतली. त्यामुळे एकत्रित प्रयत्नातून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी महारष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय यांनी देखील माेहाेळ यांच्याशी चर्चा केली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विनंतीनुसार, प्रवाशांना सँडविच, फळे व अल्पाेपहार देण्यात आले, र्गभवती महिलांची विशेष काळजी घेतली, लहान मुलांना आवश्यक साधने उपल्बध केली, वैद्यकीय सेवा उपलब्ध केली. व्हर्जिन अटलांटिकने लँडिग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न केला परंतु साेडवण्यात अपयश आले. कारण, संबंधित एअरलाइन्सने लंडनहून तुर्कीच्या दिशेने नवीन प्रवासी वाहतूक विमान पाठवले परंतु तुर्की सरकार व लष्कराने सदर विमानास लॅँडिग परवानगी नाकारली. त्यामुळे सदर विमानाला पुन्हा मार्गस्थ व्हावे लागले. सध्या र्व्हिजन अटलांटिक संबंधित विमानातील लँडिंग गियरची समस्या साेडविण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय हवाई खात्याचे पाठपुराव्याने तुर्की सरकारच्या नियमांनुसार प्रवाशांना हाॅटेल मध्ये रहाण्याची साेय व नियमित प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा देण्यात आला. तसेच प्रवाशांना दुसऱ्या विमानतळावर नेऊन पर्यायी विमानाने घेऊन जाण्याकरिता प्रयत्न करण्याचा मार्ग देखील सूचित करण्यात आला. दरम्यान, माेहाेळ यांनी परिस्थितीवर देखरेख ठेवत अधिकारी व एअरलाइन्स यांच्या संर्पकात राहून नियमित घडामोडींची माहिती घेत राहिले आणि तांत्रिक मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहिले. सदर प्रवाशांचे तुर्कीवरुन मुंबईच्या दिशेने व्हर्जिन अटलांटिकच्या विशेष विमानाने उड्डाण झाले असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ते मुंबई विमानतळावर सुखरुप उतरणार आहे.
मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता
याबाबत मुंबईतील उच्च न्यायालयात कामकाज करणारे ॲड .सत्यम सुराणा यांनी सांगितले की, लंडनवरून मुंबईला येणाऱ्या संबंधित विमानात माझा एक मित्र प्रवास करत होता. त्यांनी अचानक तुर्कीत अडकून पडल्याची मला माहिती दिल्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधत त्यांना माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मला तात्काळ निरोप आला, त्यांनी संपर्क साधत सविस्तर घटना जाणून घेतली .हवाई मंत्रालयातील दोन अधिकारी सातत्याने वेगवेगळे यंत्रणांशी संपर्क करण्यासाठी नेमण्यात आले. वेगवान हालचाली केल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकला आहे. या माध्यमातून केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची कार्यतत्परता दिसून आली आहे.
Newsworldmarathi Team : आता गरमी खूप वाढली आहे, कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ रोमांचक शेवटाकडे वाटचाल करत आहे. सर्वोच्च 5 सेलिब्रिटी स्पर्धक येथील किचनमधील वातावरण तापवण्यासाठी सज्ज आहेत. यातील प्रत्येक स्पर्धकाने ‘मास्टरशेफ’चा किताब जिंकण्यासाठी स्वतःची पात्रता सिद्ध करण्यासाठी कंबर कसली आहे. हे पाच स्पर्धक आहेत- तेजस्वी प्रकाश, निक्की तांबोळी, फैझल शेख, गौरव खन्ना आणि राजीव अदातिया. एका जोरदार शोडाऊन साठी सज्ज व्हा. या फिनाले आठवड्यात पाककला कौशल्य, जीवघेणी स्पर्धा आणि संस्मरणीय क्षण यांचे मिश्रण प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे!
निक्की तांबोळी म्हणते, “मला स्वतःचा खूप अभिमान वाटतो, कारण हा माझा पहिलाच प्रतिभा-आधारित रियालिटी शो आहे. टॉप 5 मध्ये पोहोचणे ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण आता परीक्षक आणि शेफ यांची अपेक्षा आणखीनच वाढलेली असेल. पण टॉप 5 मध्ये आल्यानंतर माझ्यातील जिंकण्याची आग देखील जास्त चेतली आहे आणि पूर्ण योगदान देण्यासाठी मी सज्ज आहे. सध्या तर मला आकाश ठेंगणं झालं आहे. आता शेवटची काही पावले टाकायची आहेत, जी मी पूर्ण आत्मविश्वासाने टाकणार आहे.” राजीव अदातिया म्हणतो, “टॉप 5 मध्ये येण्याचा आनंद काही औरच आहे. ही एक लक्षणीय सिद्धी आहे. टॉप 5 मध्ये येणं हाच मुळात मोठा विजय आहे. मी अंतिम फेरीत पोहोचलो याबद्दल मला स्वतःचा अभिमान वाटतो.”
स्पर्धा आता अटीतटीची झाली आहे आणि सेलिब्रिटी मास्टरशेफ हा प्रतिष्ठित किताब हस्तगत करण्यासाठी सगळे स्पर्धक उत्कृष्ट कामगिरी करण्यास सज्ज आहेत. दृढ निर्धार, अद्भुत प्रतिभा आणि ध्यासाने वेडे झालेले हे स्पर्धक आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी सरसावले आहेत आणि प्रेक्षकांचीही उत्कंठा वाढली आहे. निर्णायक लढाई आता सुरू होणार आहे. तेथे पोहोचण्याचा प्रत्येक क्षण रोमांच, आश्चर्य वाढवणारा असणार आहे. स्पर्धकांचे अविस्मरणीय परफॉर्मन्स प्रेक्षकांना बघायला मिळतील.
सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये नाट्य, अटीतटीची स्पर्धा आणि आश्चर्यकारक ट्विस्ट यांचा आस्वाद घेण्यास सज्ज व्हा. हा अविस्मरणीय अनुभव घ्या, सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर!
Newsworldmarathi Delhi: टाइम्स नाऊ समिट २०२५ च्या समारोपात गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या बहुप्रतिक्षित सत्राने या समिटचा उत्कर्षबिंदू गाठला. यात त्यांनी देशाच्या धोरणात्मक दृष्टीकोनावर आणि जागतिक स्तरावरच्या स्थानाबाबत सखोल मते मांडली.
अमित शाह म्हणाले, “मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) ही lघटनात्मक प्रक्रिया आहे आणि मी खात्री देतो की त्यामुळे कोणालाही ०.००१% देखील त्रास होणार नाही. जातीगणनेबाबत राहुल गांधी जे काही ऐकतात ते न विचारता स्वीकारतात, त्यांना वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. संसदेत भाषणाच्या वेळेवर बंधन असते, पण जेव्हा राहुल गांधींना बोलायला संधी मिळाली, तेव्हा ते व्हिएतनाममध्ये होते. लोकांनी स्वतः विचार करावा—संधी गुणवत्ता आणि पात्रतेवर द्यायची का धर्माच्या आधारावर?”
राहुल गांधींच्या नागरिकत्व प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले, “मी केवळ विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांच्यावर चिखलफेक करणार नाही. कायदेशीर प्रक्रिया होईल आणि गरज भासल्यास हा विषय न्यायालयात जाईल.”
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत, शाह म्हणाले, “राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी परिस्थिती योग्य असावी लागते. मणिपूरमध्ये दोन समुदायांतील संघर्ष हा नवीन नाही. तो ४-५ वर्षांच्या चक्रात सतत घडत आला आहे. मात्र, आज परिस्थिती सुधारली आहे आणि ती अजून सुधारत राहील.”
ते पुढे म्हणाले, “भारताने तीन मोठ्या समस्यांचा सामना केला आहे, ज्यामुळे देशाची मोठी आर्थिक हानी झाली: डाव्या विचारसरणीचे उग्रवादी (Left-Wing Extremism), नक्षलप्रभावित क्षेत्रे, ईशान्य भारत आणि काश्मीर. ही देशाच्या प्रगतीला अडथळा आणणारी जखम होती. पण आता शांतता प्रस्थापित करणे हे गृहमंत्रालयाचे प्राधान्य आहे.”
“काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच ४० वर्षांत कोणतेही पुनर्व मतदान, गोळीबार किंवा अश्रूधुराशिवाय निवडणूक पार पडली. हा खरा बदल आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी घुसखोरांना केवळ मतबँक राजकारणासाठी प्रोत्साहन देत आहेत. हा विषय आम्हाला नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिगत हितसंबंधांशी संबंधित आहे.”
वक्फ दुरुस्ती विधेयकावर, शाह म्हणाले, “दिल्लीतील १०० हून अधिक प्रमुख मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करण्यात आल्या, ज्यामध्ये प्रयागराज येथील चंद्रशेखर आझाद गार्डनचाही समावेश आहे. याला विरोध होऊ शकत नाही, कारण मागासवर्गीयांना घाबरवण्याचा हा प्रयत्न नाही, तर अफवा पसरवल्या जात आहेत. हे विधेयक मागील घटनांवर प्रभाव टाकणारे नाही—आम्ही आधीपासून अस्तित्वात असलेल्या मशिदी कशा काढू शकतो? या संदर्भात प्रश्न असतील, तर ते संसदेत मांडावेत.”
तमिळनाडूत भाजप सरकार स्थापन होईल, असे सांगताना ते म्हणाले, “AIADMK संदर्भात चर्चा सुरू आहे, मात्र द्रमुकने (DMK) स्टॅलिन यांच्या काळात शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. तामिळनाडूमध्ये तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षण तामिळ भाषेत पहिल्या क्रमांकावर यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बाबत त्यांनी स्पष्ट केले, “RSS ही एक संघटना आहे जी शिस्त, सुसंघटित विचार आणि राष्ट्रप्रेमावर आधारित आहे. समाजाच्या विकासासाठी संघाने नेहमीच योगदान दिले आहे—शिक्षण, राष्ट्रनिर्मिती आणि सर्वांगीण विकास यासाठी संघाने सातत्याने काम केले आहे.”
Newsworldmarathi Pune : तनिषा आणि सुशांत च्या आयुष्यात आठ वर्षांनंतर गुड न्यूज झाली होती. मात्र हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आठ वर्षानंतर न मातृत्वाच्या उंबरठ्यावर असलेल्या तनिषाचा असा दुर्दैवी अंत होणं, हे केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी विचार करण्यासारखं आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती तनिषा भिसे यांना १० लाख रुपयांची आगाऊ रक्कम न भरल्यामुळे दाखल करण्यास नकार दिला, असा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्या पतीने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेले, जिथे त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने तनिषा यांचे निधन झाले.
तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. सुशांत भिसे यांनी सांगितले की, रुग्णालयाने १० लाख रुपये आगाऊ भरण्याची मागणी केली होती. त्यांनी तत्काळ २.५ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, परंतु रुग्णालयाने उपचार नाकारले. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले, जिथे तनिषा यांचे निधन झाले.
तनिषा आणि सुशांत दोघेही कर्वेनगरमध्ये राहत होते. दोघांची ओळख मित्र- मैत्रिणींच्या माध्यमातून झाली. या दोघांचा आठ वर्षांपासून प्रेमाचा संसार फुलला होता. या सुखी संसांरात तब्बल आठ वर्षांनी गुड न्यूज आली. पण केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्यासापोटी हे सुख मात्र तनिषा -सुशांतला लाभलं नाही.
विशेष बाब म्हणजे अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे रुग्णालयात पत्नीला दाखल करून घेत नाहीत. म्हटल्यावर त्यांनी दीनानाथ रुग्णालयाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून रामेश्वर नाईक यांनी फोन केला. तरीही रुग्णालय प्रशासनाने त्यांचे काहीही न ऐकता पैसे भरले तरच उपचाराला सुरवाक केली जाईल. असे सांगितले. अखेर सुशांत मोनालीला घेऊन दुसऱ्या रुग्णालयात घेऊन गेला. तिथे भरती केलं आणि मोनालीने २ गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला, आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे तिला आपला जीव गमावला. या घटनेबाबत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. तसेच प्रशासनाने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, सध्या तनिषा ने जन्म दिलेल्या २ चिमुरड्या मुलींवर व्हेंटिलेटवर उपचार सुरु असून एका बाळाला नुकतंच व्हेंटिलेटवरुन काढलं आहे. दोन्ही बाळांची स्थिती स्थिर आहे. मोनालीच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निषेध व्यक्त करत दोषी आढळ्यास कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या दुर्दैवी घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?..
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं श्रीमती तनिषा भिसे या भगिनीचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल शासनानं घेतली आहे. आरोग्य विभागानं तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग असलेल्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना ही चौकशी तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
रुग्णालय प्रशासनानं त्यांचं म्हणणं मांडलं असलं तरी, संबंधित सर्व घटकांचा विचार करून योग्य ती कारवाई केली जाईल. या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनानं समजून घेतल्या असून चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Newsworldmarathi pune: आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे गर्भवती पत्नीच्या मृत्यूसाठी रुग्णालयाच्या आडमुठ्या धोरणांला जबाबदार धरण्यात येणार आहे. राज्यात या प्रकरणावर संतापाची लाट असणे स्वाभाविक आहे. याबाबत आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी चौकशीचे आदेश दिल्याने लवकरच काही कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, हे केवळ चौकशीपुरते मर्यादित राहणार की आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळपणाला आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना केली जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
Newsworldmarathi Pune : कुलदीप आंबेकर यांची ही कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातून येऊन, कठोर परिश्रम आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी एक वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीवर ब्रिस्टॉल विद्यापीठात ‘शिक्षण धोरण आणि आंतरराष्ट्रीय विकास’ या विषयात एम.एस्सी. करण्यासाठी त्यांची निवड होणे ही त्यांच्या कर्तृत्वाची पावती आहे.
कुलदीप आंबेकर यांचे कार्य खरोखरच समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शहरात टिकून राहणे, योग्य मार्गदर्शन मिळवणे आणि शिक्षणाचा खर्च भागवणे ही मोठी आव्हाने असतात. अशा परिस्थितीत स्टुडंट हेल्पींग हँड सारख्या उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते.
Oplus_131072
त्यांनी केलेली फूड स्कॉलरशिप, शासकीय शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, आणि विशेषतः करोना काळातील मदतकार्य खूपच स्तुत्य आहे. अशा व्यक्तींच्या योगदानामुळेच ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करण्यास मदत होते.
कुलदीप आंबेकर यांची दृष्टीकेवळ वैयक्तिक उन्नतीपर्यंत मर्यादित न राहता, समाजातील शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा घडवण्यावर केंद्रित आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ब्रिस्टॉल विद्यापीठातील त्यांचा अभ्यासक्रम त्यांना शिक्षण धोरणांची रचना, अंमलबजावणी आणि मूल्यमापन यासंदर्भात सखोल समज विकसित करण्याची संधी मिळाली आहे.
Oplus_131072
त्यांनी शिक्षणातील असमानता कमी करण्याचा निर्धार केला आहे, याचा अर्थ भविष्यात ते ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्तींची अंमलबजावणी, आणि धोरणात्मक सुधारणा यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
कुलदीप आंबेकर यांची विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी खरोखरच प्रेरणादायी आहे. परदेशातील शिक्षण केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न वापरता, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत, ही गोष्ट महत्त्वाची आहे.
त्यांनी धोरणात्मक सुधारणा, उत्तम शिक्षण संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम प्रथा शिकून त्या आपल्या समाजात रुजवण्याचा निर्धार केला आहे. यातून ग्रामीण आणि उपेक्षित विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण होऊ शकतात.
त्यांच्या यशामागे त्यांचे आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि आधार हे देखील मोठे घटक आहेत, जे अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकतात. आता पुढे ते महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीत सुधारून अनेक विद्यार्थी घडले पाहिजेत असा मानस कुलदीप चा आहे.
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र राज्य विधानसभेत सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकातील तरतुदी प्रसारमाध्यमे, पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हे विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून गुरूवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे, सरचिटणीस मीनाक्षी गुरव, खजिनदार शिवाजी शिंदे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे यांच्यासह आदी पत्रकार यावेळी उपस्थित होते. विधेयकमागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना निवेदन देण्यात आले.
या विधेयकामुळे पत्रकारांना त्यांचे व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्याच्या आणि महत्त्वाच्या विषयांवर निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे बातम्या देण्याच्या हक्कावर होणाऱ्या परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारची माध्यम निरीक्षण केंद्र स्थापन करण्याची योजनाही पत्रकारांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या अधिकारात हस्तक्षेप करणारी आहे. अशा प्रयत्नातून पत्रकारांच्या कामावर पाळत ठेवणे आणि सेन्सॉरशिप लावणे, अशी पावले उचलली जातील की काय?, असा प्रश्न उपस्थित होतो. या सुरक्षा विधेयकातील तरतुदींवर आमचा आक्षेप आहे. सरकारने या तरतुदींमध्ये त्वरित बदल करावा किंवा हे विधेयक मागे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
विधेयकावर नेमका काय आक्षेप आहे…?
– विधेयकामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या नागरी स्वातंत्र्यावर आणि भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना आणि सभा स्वातंत्र्य आणि गोपनीयतेच्या हक्कावर प्रतिकूल परिणाम होईल.
– सरकारला केवळ ‘बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेल्या संघटनांचे सदस्य असल्याच्या आरोपावरून संघटनांवर बंदी घालण्याचे आणि संशयितांची मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार दिले आहेत.
– सरकारला प्रश्न विचारता येणार नाही, असे अधोरेखित होत आहे.
– कोणत्याही स्वरूपात किंवा पद्धतीने सरकारचा असंतोष किंवा टीका व्यक्त करणे बेकायदेशीर ठरवले जाईल.
– जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्तांना बेकायदेशीर कृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट क्षेत्र किंवा इमारतीची निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. त्यानंतर हे अधिकारी मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात.
Newsworldmarathi Pune : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्याने दोन अनाथ मुलींना पुण्यात नोकरीला लावतो असे सांगून पुण्यात आणले. तुमचा शिक्षणाचा खर्च करतो असे सांगत स्वतःच्या फ्लॅटवर ठेवले आणि दोघींवर बलात्कार केल्याची धकादायक बातमी समोर आली आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने याप्रकरणी त्याला 5 दिवसांची पोलील कोठडी सुनावली आहे.
शंतनू याने दोन अनाथ मुलींना काही महिन्यापूर्वी पुण्यात आणले होते. शिक्षणाचा खर्च, नोकरी याचे आमिष त्या मुलींना दाखवले. आणि स्वतःच्या फ्लॅटवर ठेवले. या दोन्ही मुलींवर त्याने बलात्कार केला. मुलींनी धाडस दाखवत समर्थ पोलीस स्टेशनं मध्ये घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शंतनू वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी दिली.