दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यामध्ये पडणार मंत्रिपदाची माळ

Newsworld marathi Mumbai : अजित पवारांचे निकटवर्तीय इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या गळ्यामध्ये मंत्रीपदाची माळ आहे. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात अजित पवारांच्या गटांमध्ये 41 आमदार निवडून आले आहेत त्यामध्ये केवळ एकमेव धनगर समाजाचे आमदार म्हणून दत्तात्रय भरणे निवडून आल्याने त्यांना संधी मिळणार आहे.महायुतीचा सरकारमध्ये देखील अजित पवार यांनी भरणे यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यांना पीडब्ल्यूडी मिनिस्टर केले होते. याचबरोबर त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवली होती. भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक मारली आहे. त्यामुळे त्यांनाही संधी दिली जाणार आहे याच बरोबर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचेतील संघर्ष कधीही लपून राहिलेला नाही. दत्तात्रय भरणे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदापूरमध्ये तीन तीन सभा घेतल्या होत्या मात्र तरी देखील भरणे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याने त्यांना ही संधी दिली जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisements

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांचं स्वामी चरणी साकडं

0

Newsworld marathi Pune : भाजप प्रदेश सचिव देविदास राठोड व भावना फाउंडेशनचे संस्थापक सुनिल राठोड व सहकाऱ्यांनी महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी पुणे येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांची आरती करत साकडे घातले. यावेळी भाजप सचिव, देविदास राठोड, भावना फाउंडेशन चे संस्थापक व व्यावसायिक सुनिल राठोड, सुरज शिंदे, लक्ष्मण चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements

पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघातात दोनजण गंभीर जखमी

0

Newsworld marathi Pune : मुंबईवरून मूळगावी कोल्हापूरकडे जाणाऱ्या कारला पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने धडक दिल्याने कार मधील दोनजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातात साडेतीन वर्षाची मुलीसह तिचे वडील किरकोळ जखमी झाले आहे. पुणे सातारा महामार्गावर चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. घटनास्थळी राजगड पोलिसांनी धाव घेतली असून परिस्थिती हाताळण्याचे काम सुरू आहे. सर्जेराव सखाराम पाटील वय ६०, ( पत्नी ) बायक्का सर्जेराव पाटील व ५०, ( मुलगा ) प्रवीण सखाराम पाटील वय ३५, ( नात ) इरा पाटील वय साडेतीन वर्ष (सर्व रा. दरेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) अशी कारमध्ये जखमी असलेल्यांची नावे असून ही घटना पुणे – सातारा महामार्गावर देगाव फाटा ( ता. भोर ) येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सर्जेराव पाटील व त्यांची पत्नी बायका पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Advertisements

मतदानासाठी ‘एमआयटी एटीडी’ची जनजागृती

0

Newsworld marathi Pune : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन, आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ व विद्यार्थी कल्याण विभागाच्या(एनएसएस) वतीने नुकतेच मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मतदानाच्या या जनजागृतीसाठी विद्यापीठाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पुणे रेल्वे स्थानक तसेच शहरातील विविध चौकांत हातात मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स घेवून जनजागृती केली.विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला लोकांनीही उत्फुर्तपणे प्रतिसाद देत, आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सुट्टीचा आनंद न घेता आवर्जून मतदान करण्याचे वचन दिले. या उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.रजनिश कौर सचदेव यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तर प्रा. विशाल पाटील व प्रा.अमन कांबळे यांच्या पुढाकाराने या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

एक कप कॉफी तुम्हाला कोणते फायदे देऊ शकते?

0

News world : Mumbai- एक कप कॉफी तुम्हाला दिवसभरात किती आरोग्यदायी फायदे देते? तसे नसेल तर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की सकाळी एक कप कॉफी तुम्हाला कोणते फायदे देऊ शकते. सकाळच्या वेळी कॉफी पिण्याचे तोटे तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील, पण आम्ही तुम्हाला कॉफीच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत.सकाळी उठल्यानंतर एक कप अप्रतिम कॉफी किंवा चहा मिळाला तर दिवस चांगला होतो. इतकंच नाही तर ऑफिसच्या कामात व्यस्त असताना संध्याकाळीही सहकाऱ्यांसोबत कॉफी किंवा चहा पिणं लोकांना आवडतं. यामुळे मूड फ्रेश होतो. झटपट ऊर्जा देण्यासाठी हे दोन्ही हॉट ड्रिंक्सप्रभावी आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, 1 भरपूर एनर्जी टिकून राहते. कॉफीमुळे आपली भूक नियंत्रित होते. त्यामुळे तुम्ही सकाळी ब्लॅक कॉफी किंवा नॉर्मल कॉफीचे सेवन करू शकता. सकाळी नाश्त्यासोबत एक कप कॉफी अवश्य प्यावी. कारण यामुळे दिवसभर शरीरात भरपूर ऊर्जा मिळते. मॉर्निंग कॉफी तुम्हाला दिवसभर उर्जावान ठेवण्यास मदत करते. इतकंच नाही तर ते प्यायल्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही2. वजन कमी करणेजर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सकाळी एक कप कॉफी प्यायल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते आणि लठ्ठपणापासून सुटका मिळू शकते. कॉफीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड आढळते, जे शरीरात लठ्ठपणाचे गुणधर्म वाढण्यापासून प्रतिबंधित करते. जर आपण ब्लॅक कॉफी प्यायली तर ते अधिक फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात कॅफिनचे प्रमाण जास्त असते.3. मेंदू मजबूतसकाळी कॉफी प्यायल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते. दिवसभरात एक कप कॉफीमुळे तुमचे लक्ष आणि एकाग्रता सुधारते. मूड प्रसन्न ठेवण्यासाठीही कॉफी उपयुक्त ठरते.आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की, कॉफीच्या सेवनाने आपला मेंदू मजबूत होतो. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे आपल्या मेंदूचे कार्य सुधारतात.

Advertisements

पोलिसात भरती झाली, कुटुंब गहिवरून गेलं; पण शिवशाही बस अपघाताने आनंद हिरावला, जागेवरच दुर्दैवी मृत्यू

0

Gondia shivshahi bus accident : पोलिसांत भरती होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी जीव तोडून मेहनत घेत असतात. अशीच मेहनत गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मित सुर्यवंशी यांनी घेतली होती. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत भरती झालेल्या स्मिता सुर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते. मात्र, सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही. गोंदिया येथे झालेल्या शिवशाहीच्या बस अपघातात महिला पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Advertisements

पुणे शहरात ७५ वी संविधान रॅली संपन्न

0

सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत ७५ वी संविधान रॅली आयोजित करण्यात आली.भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करून कॅम्प येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ. दिवसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रॅलीची सुरुवात करण्यात आली. नवीन जिल्हा परिषद – ब्ल्यू नाईल हॉटेल चौक – पोलीस आयुक्त कार्यालय चौक – समाजकल्याण आयुक्तालय – एसबीआय बँक चौक – बंडगार्डन पोलीस ठाणे चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ससून रुग्णालयासमोर यामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा येथे संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी विद्यार्थी मोठे बॅनर्स, घोषवाक्य फलक घेऊन रॅलीत सहभागी झाले. बार्टी कार्यालयामार्फत चित्ररथाची व्यवस्था करण्यात आली. येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांची शासकीय निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा परिधान करुन समाजाला समानता-बंधुता व एकात्मतेचे दर्शन घडविले. यावेळी बार्टीच्या उपायुक्त वृषाली शिंदे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, राधाकिसन देवडे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता डॉ. आम्रपाली मोहिते आदी उपस्थित होते.

Advertisements

रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण कमी करण्याकरीता उपाययोजना करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

0

रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण लक्षात घेता घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.डॉ. दिवसे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. हिंजवडी परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यात यावीत. १ डिसेंबर २०२४ पासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करावी. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करावी. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, महाविद्यालये तसेच शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी वापरताना हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन सर्व संबधितांनी करावे, इतरांनाही हेल्मेट वापरण्याबाबत प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले.

Advertisements

माऊलींच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

0

माऊलींच्या मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीपाहूनी समाधीचा सोहळा । दाटला इंद्रायणीचा गळा॥बाळ सिद्ध पाहता चिमुकला। कुणी गहिवरे कुणी हळहळे ।भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला॥ चोखा गोरा आणि सावता ।निवृत्ती हा उभा एकटा । सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला॥माऊली माऊली नामाच्या गजरात,पुष्पवृष्टी,घंटानाद करत आज गुरुवार (दि.२८) रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात पार पडला.         श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात पहाटे तीन वाजता प्रमुख विश्‍वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक झाला. सकाळी सात ते नऊ वाजता हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्यातर्फे कीर्तन झाले. नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन झाले.          कीर्तनात केशव नामदास महाराज यांनी आळंदी तीर्थक्षेत्राचा महिमा, माऊलींचे चरित्र, समाधीचा प्रसंग आदी विषय सांगितले. समाधी सोहळ्याचा प्रसंग सांगताना नामदास महाराज यांच्यासह श्रोत्यांचे डोळे पाणावले.          यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, विजय शिवतारे, खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज कबीरबुवा, मानकरी साहिल कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, डि.डि.भोसले पाटील, राम गावडे, रोहीदास तापकीर, संजय घुंडरे, अजित वडगावकर, राहुल चव्हाण, वैजयंता कांबळे, पुष्पा कुऱ्हाडे, सागर रानवडे, महेश कुऱ्हाडे, अमोल घुंडरे, अमोल वीरकर, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सागर कुऱ्हाडे, संतोष भोसले, विष्णू वाघमारे तसेच वारकरी भाविक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.            समाधी सोहळ्यानिमित्त माऊली मंदिरात आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. कार्तिकी वारीत काळात अभिषेक, आरती, नैवेद्य असे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन खुले ठेवण्यात आले होते. तसेच लाखो भाविकांनी महाद्वारातून मुख दर्शन घेतले. समाधी सोहळ्यानिमित्त मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

Advertisements

Hello world!

0

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Advertisements