उद्यानात वॉकिंग ट्रॅक व व्यायाम साहित्य उपलब्ध करणार : बाप्पु मानकर
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील भाजपाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅक, व्यायामासाठी आवश्यक साहित्य तसेच प्रशिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपाचे अधिकृत उमेदवार बाप्पु मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित यांनी वर्तक बाग, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, सारस बाग, महाराणा प्रताप उद्यान व साठे उद्यान या ठिकाणी व्यायामप्रेमी नागरिकांशी संवाद साधला.
या वेळी नागरिकांशी चर्चा करताना राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले, ‘आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व व्यायामप्रेमी नागरिकांसाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकची उभारणी करणार आहोत. व्यायामासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी मा. नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्री खडके, मतदार संघ अध्यक्ष अमित कंक, बिपिन बोरावके, मनीष जाधव, किरण जगदाळे, कुणाल आहेर, धनंजय डिंबळे व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ मधील पदयात्रेला म्हाळुंगेवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
Newsworldmarathi pune: पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आज म्हाळुंगे गावांत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हाळुंगेवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदयात्रेचा शुभारंभ झाला. म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी टोकाचे आग्रही असून, सर्वानुमते तो लवकरच मंजूर होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रत्येक ठिकाणी भरभरुन समर्थन मिळत आहे. महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भैरवनाथांच्या आशीर्वाद घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली. या रॅलीचा शुभारंभ ना. पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे, यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा चौफेर विकास, राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गतिमान आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती; मतदारांचा भरभरुन आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पार्टीने अनेक निवडणुकीत आजवर यश मिळवले आहे. २०१७-२०२१ काळात पुणे महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प उभे राहिले. मेट्रो, नदीसुधार, समानपाणी पुरवठा असे एक ना अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने पुण्याचे चित्र आज बदलले आहे.
ते पुढे म्हणाले की, म्हाळुंगे गावच्या विकास आराखड्यासाठी टोकाचे आग्रही असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. तसेच, नागरिकांच्या मतांचा देखील यात समावेश करावा, असे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वानुमते हा विकास आराखडा मंजूर होईल, आणि गावचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ना. पाटील पुढे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणुकीत एकूण ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली. पण कोणतीही तक्रार न करता, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करत आहेत. प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर विद्यमान नगरसेविका होत्या, त्यांनाही उमेदवारी देता आली नाही. पण कोणतीही तक्रार न करता स्वप्नालीताई आणि प्रल्हाद सायकर पक्षाचा आदेश मान्य करुन काम करत आहेत. याशिवाय अनेक कार्यकर्त्यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. पण नाईलाजाने त्यांनाही उमेदवारी नाकारावी लागली. ते कार्यकर्ते देखील आज भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत.
प्रभाग क्रमांक ९ मधून नव्या कर्तृत्ववान नेतृत्वाला संधी देण्यासाठी, एका व्यक्तीला उमेदवारी नाकारावी लागल्यानंतर, आभाळ कोसळल्याप्रमाणे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. माननीय देवेंद्रजींवरही टीका टिप्पणी करत आहेत. वास्तविक, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रहित सर्वप्रथम असते. देशाला सामर्थ्यवान, सुरक्षित, समृद्ध बनवण्यासाठी भाजपा कार्यकर्ते झटत असतात. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा भाजपा हा म्हणूनच वेगळा पक्ष आहे. तेव्हा विरोधकांना पराभवाची जाणीव झाली असल्याने आज ते टीका टिप्पणी करत आहेत. प्रभाग क्रमांक ९ मधून लहू बालवडकर हे महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचे ‘विकसित पुणे संकल्पपत्र’ जाहीर: पुणे विकसित व स्वच्छ बनवण्याचा भाजपचा प्रयत्न; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन
Newsworldmarathi Pune: पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून शहराला अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा “विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र” मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, रविंद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आदी उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, पुणे हे सर्वसमावेशक राहण्यासाठी योग्य शहर बनत असून देशातील एक महत्त्वाचे शहर म्हणून पुणे विकसित होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत बाणेर–बालेवाडी भागाचा समावेश करून तेथे मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत काम करण्याची संधी पुणेकरांनी भाजपला दिली आणि दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. पुणेकरांना आता जुना कारभारी नको आहे हे त्यांनी २०१७ च्या निवडणुकीत दाखवून दिले आहे.
पुण्यात सध्या ३२ किमी मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किमीपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. मागील तीन वर्षांत साडेदहा कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बसना मंजुरी देण्यात आली असून पुढील काळात साडेचार हजार ई-बस शहरात धावतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित प्रवास उपलब्ध होणार आहे.
पुणे विमानतळाच्या विस्तारास प्राधान्य देण्यात येत असून ४४ किमी नदीकाठ सुधार प्रकल्प वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहराचा वारसा जपतानाच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपच्या जाहीरनाम्यात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ, करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण, सांस्कृतिक व आर्थिक विकास यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पुणे शहराला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‘एम्स’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास आदी महत्त्वाकांक्षी संकल्पनांचा यात समावेश आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील, असा विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला.
भविष्यातील पिढी घडवण्यासाठी शिक्षणालाच प्रथम प्राधान्य; अर्चना तुषार पाटील यांनी मांडला विकासाचा ‘रोडमॅप’
Newsworldmarathi pune : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ ‘क’ (काशेवाडी, डायस प्लॉट) च्या लोकप्रिय उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी प्रचारादरम्यान आपल्या ठोस कामगिरीचा आलेख नागरिकांसमोर मांडला. पायाभूत सुविधांसोबत, त्यांनी समाजातील भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.
प्रचारफेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना अर्चना पाटील म्हणाल्या की, “माझा भर हा केवळ तात्पुरत्या समस्या सोडवण्यावर नसून, येथील मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यावर आहे.” याच दूरदृष्टीतून त्यांनी प्रभागात सावित्रीबाई फुले प्रशालेत अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त अशी नवीन ‘ई-लर्निंग’ शाळेची इमारत उभारली आहे. यामुळे प्रभागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणे शक्य झाले आहे.
केवळ इमारती उभारून न थांबता, आर्थिक परिस्थितीमुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये यासाठी सौ. पाटील यांच्या वतीने प्रभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नियमित मोफत शालेय साहित्याचे वाटप केले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य राहावे यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्रात लहान मुलांसाठी मोफत ट्यूशन (शिकवणी) वर्ग चालवले जातात, ज्याचा लाभ अनेक गरजू कुटुंबांना होत आहे.
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी त्यांनी ‘पुणे पुस्तक महोत्सवाचे’ भव्य आयोजन केले होते, ज्यात प्रभागातील शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील या भरीव कामगिरीमुळे सौ. अर्चना तुषार पाटील यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे
नागरिकांचा हाकेला तत्काळ प्रतिसाद देणारा ‘आपला माणूस’; २५ वर्षे विश्वासाचं नातं जपणारे गणेश बिडकर
Newsworldmarathi Pune: सक्रिय राजकारणात पदार्पण करून गणेश बिडकर यांना २५ वर्षे पूर्ण झाली. महापालिकेत नगरसेवक ते सभागृहनेता अशी पदे भूषवूनही त्यांनी नेहमी सामान्य कार्यकर्ता हीच ओळख जपली आहे.
प्रभागातील कोणतेही काम असो, नागरिकांनी आवाज दिला की ते आपल्या घरातील सदस्याप्रमाणे लगेच धावून जातात. त्यामुळे वडिलांपासून जपलेली नात्यांची नाळ आजही भक्कम आहे. त्यांच्या या साधेपणामुळेच आपला माणूस म्हणून प्रभागात त्यांची ओळख असून त्यांना नागरिकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे.
प्रभाग २४ (कसबा पेठ परिसर) मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार असलेले बिडकर २००२ मध्ये पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. दुसऱ्या टर्मनंतर २०११-१२ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद मिळाले. महापालिकेत सत्ता नसतानाही मुत्सद्दीपणामुळे पद मिळून प्रभागातील विकासाला गती दिली.
या काळात श्री नागेश्वर आणि त्रिशुंड गणपती मंदिराचा जीर्णोद्धार, कमला नेहरू रुग्णालयाच्या कामांना गती दिली. नागरिकांचा प्रशासनाशी संवाद साधणारा दुवा म्हणून सातत्याने निधी मिळवून प्रभागातील कामे मार्गी लावली.
मेट्रो, ‘जायका’ प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली. २०२०-२२ दरम्यान सभागृहनेता म्हणून चोवीस तास पाणीपुरवठा, नदी पुनरुज्जीवन, कचरा व्यवस्थापन, मेट्रोसारख्या मोठ्या प्रकल्पांना गती दिली. समाजाशी असलेली बांधिलकी, विकासाचा असलेला ध्यास आणि पक्षाशी असलेली एकनिष्ठा यामुळेच त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये गटनेतेपद पक्षाने बहाल केले होते.
स्थायी समिती अध्यक्षपद न मिळाल्यानेच अमोल बालवडकरांनी पक्ष सोडला , भारतीय जनता पार्टीचा पत्रकार परिषदेत खुलासा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ०९ हे केंद्रस्थानी आले असताना, अमोल बालवडकर यांच्या पक्षत्यागामागील खरी कारणे उघड करणारी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विकासाचे मुद्दे पुढे करत केलेले आरोप हे केवळ मुखवटा असून, पदांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अपूर्ण राहिल्यानेच हा पक्षत्याग झाला, असा गंभीर आणि थेट आरोप भाजपाने केला.
महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच अमोल बालवडकर यांनी पक्ष सोडला, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री. अमोल बालवडकर यांनी केलेल्या बिनबुडाच्या, तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत. असे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ०९ मधील अधिकृत उमेदवारी आणि नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रभाग क्रमांक ०९ चे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. लहू गजानन बालवडकर व श्री. गणेश कळमकर, तसेच भाजपाचे पदाधिकारी श्री. प्रकाश बालवडकर आणि श्री. राहुल कोकाटे या पदाधिकाऱ्यांनी अमोल बालवडकर यांनी केलेल्या आरोपांचा सविस्तर व तथ्यात्मक खंडन केले.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अमोल बालवडकर यांनी जाणीवपूर्वक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांचे आरोप पूर्णतः खोटे व बिनबुडाचे आहेत. “महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देण्यात यावे, अशी वैयक्तिक अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळेच त्यांनी पक्ष सोडला,” असा आरोप यावेळी करण्यात आला.
तसेच गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत अमोल बालवडकर कोणत्याही पक्षकार्यक्रमात सहभागी नव्हते व पूर्णतः राजकीयदृष्ट्या अनुपस्थित होते, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. “आज विकासाबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी स्वतः आजवर कोणते प्रकल्प राबवले, हे जनतेसमोर मांडावे तसेच भविष्यातील नियोजनही स्पष्ट करावे,” असे आवाहन भाजपाने केले.
“पक्षात अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांनी पक्ष सोडलेला नाही. कारण भारतीय जनता पार्टी हा पदांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे,” असे स्पष्ट मत भाजपाच्या नेत्यांनी व्यक्त केले.
विधानसभेपासूनच अमोल बालवडकर यांची पक्ष सोडण्याची तयारी होती आणि पक्षावर दबाव टाकण्याचा हुकुमशाही पद्धतीचा प्रयत्न त्यांनी केला, असा आरोपही यावेळी करण्यात आला. “त्यांच्या आव्हानाला आम्ही प्रचाराचा नारळ फोडून, विकासाच्या कामातून उत्तर देत आहोत,” असे भाजपाच्या उमेदवारांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ०९ मधील मतदारांनी विकासालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून, विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवान भोरेची चमकदार कामगिरी; ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान
Newsworldmarathi Pune: दिल्ली येथे पार पडलेल्या ६८व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी स्पर्धेत युवा नेमबाज युवान भोरे याने दमदार आणि उल्लेखनीय कामगिरी करत नेमबाजी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डबल ट्रॅप या प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत युवानने ‘निष्णात नेमबाज’ होण्याचा मान पटकावला असून, त्याच्या या यशामुळे क्रीडाविश्वात त्याचे कौतुक होत आहे.
युवान भोरे हा अमनोरा येथील पवार पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असून तो शाळेचा स्पोर्ट्स कॅप्टन म्हणूनही जबाबदारी सांभाळतो. मे २०२५ मध्ये नेमबाजी खेळात पदार्पण करून अल्पावधीतच त्याने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले आहे. केवळ काही महिन्यांतच त्याने सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे.
याआधी मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या शॉटगन शोडाऊन चॅलेंज टूर्नामेंटमध्ये युवानने सुवर्णपदक पटकावत आपली गुणवत्ता दाखवून दिली होती. त्याची ही यशस्वी वाटचाल अनेक नवोदित खेळाडूंना प्रेरणादायी ठरत आहे.
नेमबाजी क्षेत्रातील युवानचा प्रवास जे. बी. कुसळे फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तेजस कुसळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेते आणि वर्ल्ड चॅम्पियन अंकुर मित्तल सर** यांचेही त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच युवानच्या यशामागे त्याचे मामा प्रचीत इंगवले यांचे विशेष योगदान आहे. स्वतः गोल्ड मेडलिस्ट असलेल्या प्रचीत इंगवले यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहन यामुळेच युवानने हे उल्लेखनीय यश साध्य केले आहे.
लहू बालवडकरांच्या वाढदिवशी ‘विकासाचा धमाका’; महसूल मंत्री बावनकुळेंकडून प्रभाग ०९ साठी भव्य विकास आराखड्याची घोषणा
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीने विकासाच्या अजेंड्यावरून आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळी खेळल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेला भव्य विकास आराखडा हा केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता, प्रभागातील राजकीय समीकरणे बदलणारा ठोस राजकीय संदेश ठरला आहे.
राजकारणात प्रतीकात्मक कार्यक्रमांना विशेष महत्त्व असते. वाढदिवशी विकास आराखड्याची घोषणा करणे म्हणजे ‘व्यक्तीपूजा नव्हे, विकासपूजा’ असा स्पष्ट संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. महाळुंगे टी.पी. स्कीम, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो, मुळशी धरणातून पाणीपुरवठा आणि पुणे–कात्रज सिमेंट काँक्रीट सर्व्हिस रोड यांसारख्या घोषणांनी प्रभागातील ज्वलंत प्रश्नांवर थेट बोट ठेवण्यात आले आहे.
घोषणा नाहीत, तर दीर्घकालीन नियोजन
या विकास आराखड्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ आश्वासनांपुरता मर्यादित नाही. महाळुंगे टी.पी. स्कीमसारखा प्रकल्प नियोजनबद्ध शहरी विकासाशी थेट जोडलेला आहे, तर मेट्रो आणि पाणीपुरवठा हे प्रभागातील लोकसंख्या वाढ आणि आयटी हबच्या गरजांचा विचार करून मांडलेले दीर्घकालीन उपाय आहेत. त्यामुळे ‘भविष्याचा विचार करणारा आराखडा’ अशी या घोषणांची प्रतिमा तयार झाली आहे.
बाणेर येथील माऊली गार्डनमध्ये झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महसूल मंत्री बावनकुळे यांची उपस्थिती लाभणे हे केवळ औपचारिक नव्हते. ही उपस्थिती म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा लहू बालवडकर यांच्यावर असलेला विश्वास आणि प्रभाग ०९ साठीचा स्पष्ट राजकीय संदेश होता. कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती आणि उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम प्रभावी शक्तिप्रदर्शन ठरला.
लहू बालवडकर यांनी या संधीचा वापर केवळ कृतज्ञता व्यक्त करण्यापुरता न ठेवता, विकासासाठीची आपली भूमिका आणि जबाबदारी स्पष्टपणे मांडली. “हा सन्मान वैयक्तिक नसून नागरिकांसाठी आहे” हा संदेश देत त्यांनी ‘नेतृत्वाचा परिपक्व चेहरा’ समोर आणला. निवडणुकीत मतदार अशाच विश्वासार्ह नेतृत्वाकडे झुकतात, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर प्रभाग ०९ मध्ये विरोधकांकडे विकासाचा ठोस अजेंडा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. अंतर्गत मतभेद आणि विस्कळीत प्रचारात अडकलेल्या विरोधी पक्षांसमोर भाजपने विकासाचा स्पष्ट नकाशा मांडत आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
लहू बालवडकरांच्या वाढदिवशी जाहीर झालेला विकास आराखडा हा केवळ एक कार्यक्रम नसून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीतील भाजपची रणनीती स्पष्ट करणारा राजकीय टर्निंग पॉइंट ठरत आहे. विकास, संघटनात्मक ताकद आणि वरिष्ठ नेतृत्वाचा पाठिंबा या त्रिसूत्रीच्या जोरावर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजप निर्णायक आघाडी घेत असल्याचे संकेत या घटनेतून स्पष्टपणे दिसून येतात.
विरोधकांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा : मंत्री चंद्रकांत पाटील
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेत २०१७ ते २०२१ काळात पाचच वर्षे भाजपचे सरकार होते. पण महाराष्ट्राची आणि महापालिकेच्या स्थापनेपासून विरोधी पक्षाचीच सत्ता होती, त्यामुळे विरोधकांनी ६० वर्षांचा हिशोब द्यावा, असा घणाघात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारच्या काळात पुणे शहरात अनेक विकास कामे झाल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चौक सभा आज झाली. यावेळी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भाजप मध्य मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, प्रभाग क्रमांक ३१ चे भाजप उमेदवार पृथ्वीराज सुतार, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव, दिनेश माथवड यांच्यासह भाजपचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले की, पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष २०१७ ते २०२१ या पाच वर्षाच्या काळातच भाजप सत्तेत होता. या काळात मेट्रोसह, समान पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात बसेसची उपलब्धता, नदीसुधार प्रकल्प, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रमुख चौकांत उड्डाणपूल असे एक ना अनेक प्रकल्प राबवले. कोथरुड मध्ये घरापासून ते मेट्रो स्थानकापर्यंत जाण्यासाठी बसेसची देखील व्यवस्था केली आहे.
ते पुढे म्हणाले की, आज विरोधक भाजपवर टीका करत आहेत की, भाजपच्या काळात विकास झालेला नाही. वास्तविक, महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आणि पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून ६० वर्षे महापालिकेत तुमचीच सत्ता होती. तुमच्या काळात पुण्याची स्थिती काय होती, ज्यामुळे २०१४ पासून पुणेकरांनी तुम्हाला सातत्याने नाकारले आहे. तुमच्या काळात मंजूर झालेला आणि उभारलेला विद्यापीठ चौकात उभारलेला उड्डाणपूल पाडण्याची नामुष्की तुमच्यावर ओढावली. हे तुमचे पुणे शहराच्या विकासाचे नियोजन आहे का? असा घणाघात ना. पाटील यावेळी केला.
भाजपलाच मतदान करुन भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यावर परमहंसनगर आणि गुजरात कॅालनीमधील नागरिकांनी भाजपालाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राणी भोसले यांची संकल्पना ठरली दिशादर्शक; ‘लाईट हाऊस’मुळे शेकडो तरुणांना रोजगाराची नवी संधी
Newsworldmarathi Pune: वस्तीभागातील तरुण-तरुणींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारा ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम आज अनेकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ३८ मधील भाजप नेत्या व माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या पुढाकारातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अप्पर डेपो परिसरात लाईट हाऊस प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून, त्याचा थेट फायदा वस्तीभागातील तरुणांना होत आहे.
आर्थिक अडचणींमुळे शिक्षण अपूर्ण राहिलेल्या अनेक तरुणांमध्ये कला, कौशल्य आणि काम करण्याची प्रबळ जिद्द असते. हीच बाब ओळखून राणी भोसले यांनी तरुणांच्या कौशल्यांना दिशा देण्यासाठी लाईट हाऊस प्रकल्पासाठी प्रयत्न केले. अप्पर डेपो येथील या केंद्रामुळे प्रभाग ३८ तसेच आसपासच्या भागातील तरुण-तरुणींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
या प्रकल्पांतर्गत १८ ते ३० वयोगटातील तरुणांना सघन प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणपूर्व करिअर टेस्ट घेऊन त्यांच्या आवडीनुसार योग्य कोर्सची निवड केली जाते. टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, नर्सिंग असिस्टंट, जिम ट्रेनर, कुकिंग, ग्राफिक डिझाईन व विविध सॉफ्टवेअर कोर्सेसचे प्रशिक्षण येथे दिले जाते.
या उपक्रमामुळे अनेक तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या असून, काहींनी स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. विशेष म्हणजे तरुणांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाचे कार्य या प्रकल्पातून घडत आहे. राणी भोसले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला अप्पर डेपो येथील लाईट हाऊस प्रकल्प प्रभाग ३८ साठी विकासाचा मजबूत आधार ठरत आहे.

