हुजूरपागा प्रशालेत स्वराज्यसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा दिमाखात संपन्न
Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या एच.एच.सी.पी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हुजूरपागा येथे सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी व मावळत्या मंत्रिमंडळाचा निरोप समारंभ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार रोहित पवार तर अध्यक्षस्थानी म.ग.ए. संस्थेच्या सचिव रेखाताई पळशीकर होत्या.
प्रशालेत १९६५ पासून सुरू असलेल्या *स्वराज्यसभा* या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी गुप्त मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड केली जाते. यावर्षीची निवडणूक ४ जुलै रोजी पार पडली होती. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींचे शालेय मंत्रिमंडळ गठीत करून खातेवाटप करण्यात आले. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती केतकी पेंढारकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी शाळेतील या लोकशाही उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना संविधान, मतदानाचा अधिकार, समानता आणि महिलांच्या राजकीय सहभागाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभव, मेहनत, पालक व शिक्षकांचा आदर यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला संस्थेच्या सहसचिव अरुणा भांबरे, सभासद मा. डॉ. सुनिल जगताप, लक्ष्मीकांत मुंदडा, अलका काळे, मार्था गायकवाड, प्रमुख विश्वस्त उषा वाघ यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पेंढारकर यांनी केले. अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड यांनी तर पाहुण्यांची ओळख रविंद्र तनपुरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी वीर यांनी केले.
स्वराज्यसभा प्रमुख श्रीमती जयश्री सोळंके, पर्यवेक्षक साधना घोडके, राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
हुजूरपागा प्रशालेत विज्ञान मंडळाची स्थापना
Newsworldmarathi Pune: दरवर्षी प्रमाणे यंदाही एच.एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे येथे मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी विज्ञानमंडळ उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे *मा. डॉ.अरविंद नातू,वरिष्ठ संशोधक* (आयसर संस्था) यांचा सत्कार म.ग.ए. संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. डॉ.सुषमा केसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विज्ञानमंडळातील सहभागी विद्यार्थिनी व इयत्ता ९वीच्या विदयार्थीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थीनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या केले. रासायनिक अभिक्रियेवर आधारित प्रयोगाद्वारे विज्ञान सेल्फी बनवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. ही सायन्स सेल्फी फ्रेम केवळ चेहऱ्याचीच नाही तर आपल्या ज्ञानाची, सर्जनशीलतेची आणि आत्मविश्वासाची फ्रेम आहे. या चौकटीत उभे राहताना आपण विज्ञानाशी जोडले जातो या नवकल्पनेतून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
निसर्गातील घडामोडींमध्ये विज्ञानाचे गूढ लपलेले आहे. डोळे उघडा निसर्ग कडे बघा प्रश्न विचारा आणि संशोधक व्हा असे मोलाचे मार्गदर्शन नातू सरांनी विद्यार्थिनींना केले.
यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोषध्यक्षा मा. डॉ. सुषमा केसकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, केतकी पेंढारकर, उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड, पर्यवेक्षक साधना घोडके, श्रीयुत राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे उपस्थित होते. विज्ञान पर्यवेक्षिका श्रीमती जमदाडे प्रतिभा आणि सर्व विज्ञान शिक्षक, विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसारखे काम करावे : अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांचे आवाहन
Newsworldmarathi Pune: संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’
वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’’– पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.
आज पुण्यात पूरस्थितीची शक्यता; शहराला सावधानतेचा इशारा
Newsworldmarathi Pune: शहराला पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला आणि वरसगाव धरणातून रविवारी रात्री ७ नंतर एकूण २८,९०० क्यूसॅक वेगाने विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहू लागली असून, पाणी रस्त्यांवर आले आहे. भिडेपूल रविवारी दुपारीच पाण्याखाली गेला आहे.
शहरासह चारही धरण क्षेत्रात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव ही चारही धरणे ९१ टक्क्यांहून अधिक भरली आहेत. यामुळे जलसंपदा विभागाने रविवारी रात्री मोठा विसर्ग सुरू केला. खडकवासलातून १८,३०० क्यूसॅक आणि वरसगावहून ९,५०० क्यूसॅक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रविवारी रात्री १२ पासून पुन्हा संततधार सुरु झाली असून, पावसाने सोमवार सकाळीपर्यंत उघडpeek घेतलेले नाही.
सूर्यदर्शन नाही, गारठा वाढला: रविवारी दिवसभर पावसाच्या रिपाटपातमुळे शहरात गारठा वाढला आहे. संपूर्ण शहरात थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत.
भिडेपूल यंदा उशिरा पाण्याखाली: दरवर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाण्याखाली जाणारा भिडेपूल यंदा जुलैच्या अखेरीस पाण्याखाली गेला आहे.
नदीपात्रावर पोलीस बंदोबस्त गरजेचा: रविवारी नदीपात्रातून पाणी रस्त्यावर आले असतानाही अनेक नागरिकांनी वाहने चालवली. आज परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची गरज आहे. नागरिकांनी नदीकिनाऱ्यांवर गर्दी करू नये, असा इशाराही जलसंपदा विभागाने दिला आहे.
अजित पवारांच्या वाढदिवसनिमित्त राष्ट्रवादी गडकिल्ले सेलतर्फे आरोग्य शिबिर
Newsworldmarathi Pune: रक्तदाब, रक्तशर्करा, कोलेस्ट्रॉल, किडनी आणि थायरॉईड मोफत तपासणी शिबिराचा लाभ दत्तनगर, टेल्को कॉलनी चौक, जांभूळवाडी रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांनी घेतला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या संकल्पनेतून कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर, जना स्मॉल फायनान्स बॅंक व देशसेवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल चे
प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जना स्मॉल फायनान्स चे विभागीय प्रमुख कमल गांधी, आकाश मंत्री , पंकज पवार, नरेंद्र पारखे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे समीर धुमाळ, मनोजकुमार भोसले, शंकर चिकने, वल्लभ कोकाटे, मनीष कोंडे,कुणाल शेलार, विनायक धोत्रे हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोनशे नागरिक ,ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रक्तदाब, रक्तशर्करा व कोलेस्ट्रॉल, किडनी फंक्शन आणि थायरॉईड तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल: रामहरी रुपनवर
Newsworldmarathi Pune: अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली च्या वतीने सावित्रीबाई फुले सभागृह पुणे येथे अहिल्यादेवी होळकर यांच्यात्रि शताब्दी जयंती निमित्ताने कर्तृत्ववान ९० महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
पुढे म्हणाले की, लोककल्याणकारी अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही युद्ध टाळून शांतता कायम ठेवली राज्यसमृद्ध झाले पाहिजे अशी ही कर्तृत्ववान महिला यांनी महिला सक्षमीकरण धार्मिक विचार रोजगार निर्मिती सतत लोकहितेचा विचार करणारी एकमेव अद्वितीय स्त्री म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय महिलांना साक्षर करण्यासाठी अथक प्रयत्न जगातील सर्वात मोठी महिलांची फौज उभी करणारी स्त्री म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय प्राणी पक्षी यांची काळजी .अखंड देशांमध्ये समाज उपयोगी कामे केली नेतृत्व गुण व ज्ञानलालसा मुत्सद्दीपणा व झुंज घेण्याचा खंबीरपणा अहिल्यादेवी होळकर यांच्याकडे होता.
अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने कराड येथे १४६ महिलांना मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार ने सन्मानित केले व पुणे येथे ९० महिलांना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महिलांचा गौरव करणारी एकमेव अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांचे कार्यकर्तुकास्पद आहे, असे रामहरी रुपनवर यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. नितीन वाघमोडे (आयकर आयुक्त, पुणे), डॉ. प्रा. महेश थोरवे (संचालक, एमआयटी), बाळासाहेब कर्णवर पाटील (चेअरमन, श्री सद्गुरु साखर कारखाना) यांचीही भाषणे झाली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण काकडे, सुनील शेंडगे, बी.डी. मोटे, अशोकराव पवार, शेषराव शेंडगे, मुकुंद कुचेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले व आभार प्रा महावीर काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा शितल काकडे, नथुराम डोईफोडे, राजगड बाबुराव शेडगे,सुनील शेंडगे, दिनेश शिंदे, वसंतराव हिरवे, अशोकराव शिंदे, हरिभाऊ लबडे, इंद्रजित ताटे, अजित ताटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी एम. डी. दडस, संजय नायकवडी, संजय कवितके, नवनाथ देवकाते, शंकर दातीर, संतोष पांढरे, अरुणा दडस, भाऊसाहेब आखाडे, नानासाहेब मरगळे तुकाराम कोकरे नवल राजकाळे सोमनाथ ओव्हाळ संदीप शेंडगे प्रशांत शेंडगे इत्यादी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय
Newsworldmarathi Pune: ‘पुनीत बालन ग्रुप’च्यावतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शहरात सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून सौ. शोभा रसिकशेठ धारिवाल यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या या अभ्यासिका व ग्रंथालयाचे भूमिपूजन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना हक्काची अभ्यासिका व ग्रंथालय उपलब्ध होणार आहे.
शिक्षण, क्रिडा, वैद्यकीय, अध्यात्मिक आदी विविध क्षेत्रात ‘पुनीत बालन ग्रुप’चे कार्य हे उल्लेखनीय असे आहे. त्यांच्या या कामाचे क्षेत्र केवळ पुणे शहरापुरते मर्यादित नाही तर या कामाचा विस्तार काश्मिरपर्यंत झालेला बघायला मिळतो. पुणे हे तर राज्यातील शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. याठिकाणी शिक्षणाच्या दृष्टीने राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात. परंतु अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासिका व ग्रंथालयाचे भरमसाठ शुल्क भरणे शक्य होत नाही.
या विद्यार्थ्यांनाही चांगले शिकून मोठे होण्याचे स्वप्न साकार करता यावे या दृष्टीने ‘पुनीत बालन ग्रुप’ने पुढाकार घेतला आणि पुण्यात अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट मंदिर परिसरात ७ हजार ५०० चौ. फुट इतकी प्रशस्त अशी दुमजली अभ्यासिका व ग्रंथालय बांधण्यात येणार असून या बांधकामाचे भूमिपूजन श्री. पुनीत दादा बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट शिरीष केंभावी, श्री वृध्देश्वर-सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंतराव बहिरट-पाटील, सचिव सुधीर दुर्गे, खजिनदार शशिकांत भोसले, विश्वस्त संजय सातपुते आणि वृद्धेश्वर चौपाटीचे लाला गायकवाड उपस्थित होते.
विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी बौद्धिक परिस्थिती मात्र गरीब नसते. पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना या अभ्यासिका व ग्रंथालयात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या वाटेवर अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून एक दिवा लावण्याची संधी आम्हाला मिळाली. यातूनच देशाची आणि समाजाची अधिक चांगली सेवा करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास आहे.पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
श्री साई मित्र मंडळात यंदा ‘महिलाराज’; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निर्णय
Newsworldmarathi Pune: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे यंदाचे ३०० वे वर्ष आहे. विविध कार्यक्रमातून, उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. एकीकडे गणेशोत्सवाला यंदा महाराष्ट्र सरकारने राज्यउत्सव म्हणून मान्यता द्यायचा निर्णय घेतला असताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या साई मित्र मंडळाने यंदाच्यावर्षी मंडळाचा सर्व कारभाराची दोरी महिलांच्या हातात देण्याचा औचित्यपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून यंदा महिलांच्या हाती कारभार देत मंडळ वेरुळ येथील कैलास मंदीर साकारणार आहे. या देखाव्याच्या कामाचे कळसपूजन चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी केंद्रीय मोहोळ यांनी ही घोषणा केली.
कोथरूड परिसरातील केंद्रीय मंत्री मोहोळ संस्थापक असलेले श्री साई मित्र मंडळ हे भव्य व देखण्या प्रतिकृती गणेशोत्सवात सादर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. यंदाच्यावर्षी ३० वा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, अशीच भव्य, आकर्षक आणि कलात्मक प्रतिकृती सादर करताना मंडळाची धुरा महिलांच्या हातात त्यांनी दिली आहे. यंदाच्या उत्सवाचे सर्व संयोजन महिलाभगिनी करणार आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून पुरूष कार्यकर्ते काम करणार आहेत.
भारतीय शिल्पकारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पाषाणात कैलास लेणीची केलेली निर्मिती हे जगभरासाठी आश्चर्य ठरले आहे. ही लेणी बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दरवर्षी वेरूळला भेट देतात. या कैलास लेणी संकुलातील ‘कैलास मंदिराची’ प्रतिकृती मंडळाच्यावतीने यंदा करण्यात येणार आहे. या सजावटीच्या कामाच्या कळस पूजनाचा शुभारंभ यावेळी प्रसिद्ध मूर्ती आणि मंदिर अभ्यासक गणेश धालपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गेल्यावर्षी आयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती मंडळाने केली होती.
याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘गणेश मंडळांचा मुख्य कारभार पुरूष मंडळींच्याच हातात असतो. मंडळातील महिला भगिनी काम करतातच, मात्र त्यांना खुले व्यासपीठ मिळत नाही. मात्र हे चित्र बदलायचे असून यंदाचे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वे वर्षे आपण साजरे करत आहोत. त्यानिमित्ताने आमच्या मंडळातील महिला भगिनी अनोखी आदरांजली वाहतील. अहिल्यादेवींच्या चरित्रापासून महिला वर्गाल स्फूर्ती मिळावी आणि त्यांचा सार्वजनिक कामातील माताभिगीनींचा आत्मविश्वास, सहभाग वाढवण्यासाठी आम्ही सर्वांनी ही निर्णय घेतला आहे’
चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक : नितीनभाई देसाई
Newsworldmarathi Pune: समाजाच्या सर्व स्तरांमध्ये फार गतीने बदल घडून येत आहेत. त्या बदलांच्या अनुषंगाने नवीन समस्यांना सामोरे जावे लागत असून नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. त्या समस्यांवर तोडगा काढून संधींचा फायदा घेण्यासाठी चाकोरीच्या पलीकडे जाऊन शिक्षणाचा विचार करणे आवश्यक आहे, असे मत दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे प्रेसिडेंट आणि प्रसिध्द उद्योजक नितीनभाई देसाई यांनी व्यक्त केले. दी पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी महोत्सवाचा प्रारंभ आज नितीनभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेशभाई शहा, व्हाईस चेअरमन जनकभाई शहा, विश्वस्त मोहनभाई गुजराथी, विश्वस्त जितेंद्रभाई मेहता, विश्वस्त किरीटभाई शहा, सचिव हेमंतभाई मणियार, सहसचिव विनोदभाई देडीया, सहसचिव संदीपभाई शहा, खजिनदार महेशभाई धारोड, सहसचिव दिलीपभाई जागड आणि सहसचिव प्रमोदभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना नितीन देसाई म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संवादाची दरी दिवसागणिक वाढत असून ती दरी कमी करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक संवादसेतू उभा राहिला पाहिजे. पारंपारिक शिक्षणाचे बोट न सोडता आधुनिकतेची कास धरत शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांशी वैयक्तिक नाते दृढ करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची कौशल्ये आणि क्षमता ओळखून अनुबंध निर्माण करीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला पाहिजे. संस्थेच्या नावात असलेल्या केळवणी या शब्दाचा अर्थ शिक्षण अधिक संवाद असा होतो. विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव किंवा ताण निर्माण न होऊ देता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देता आला पाहिजे.
यावेळी बोलताना श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे विश्वस्त मोहन गुजराथी म्हणाले की, संस्थेची शताब्दी हा केवळ एक टप्पा असून आगामी शतकाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले हे पहिले पाऊल आहे. या टप्प्यावर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने चिंतन आणि सिंहावलोकन होणे आवश्यक आहे. गेल्या शंभर वर्षात संस्थेने केलेल्या कार्याच्या आढावा घेत शंभर वर्ष पूर्ण केलेल्या इतर शिक्षण संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथे राबविण्यात येणाऱ्या आधुनिक उपक्रमांची अंमलबजावणी आपल्या संस्थेत करणे आवश्यक आहे. केवळ अर्थार्जनापुरती सक्षम पिढी न घडवता जगण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारे शिक्षण तसेच जीवनदायी शिक्षण देणे आवश्यक आहे. उद्याचा जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कार्यरत राहिले पाहिजे. संस्थेने भविष्याचा विचार करता एक थिंक टँक समुह निर्माण करून त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
यावेळी एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र गुरव, दी पूना गुजराथी केळवणी मंडळाचे सहसचिव प्रमोदभाई शहा, दी पूना गुजराथी केळवणी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता भिडे आणि अर्चना धारू आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी केले. सूत्रसंचालन अनुजा सेलोत यांनी केले. जनक शहा यांनी आभार मानले.
वीर जिवाजी महाले यांचे कार्य समाजाला आदर्श प्रेरणास्रोत : गणेश बिडकर
Newsworldmarthi Pune: प्रतापगडावरील रणसंग्रामाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले अनमोल योगदान देणारे शूरवीर जिवाजी महाले यांचे कार्य सर्व समाजाला आदर्श प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन पुढे मनपाचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केले.
बारा बलुतेदार समाज विकास संघ आणि सकल नाभिक समाज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. रास्ता पेठ येथील वीर शिवाजी महाले स्मारकाचे रंगकाम आणि प्रकाश योजनेचे काम लोकार्पण करण्याचा कार्यक्रम गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन करीत तसेच नारळ वाढवत संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी व्यासपीठावर माथेरानचे नगरसेवक आकाश चौधरी,सौ अनिता गणेश वाळुंजकर, प्रदेश सचिव राजेंद्र पंडित,प्रभारी शहराध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष उदय दैठणकर विनायक लांबे, प्रमुख व समान वेळेत हेमंत श्रीखंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान गणेश बिडकर व रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती व शाल,गुलाबपुष्प देऊन संपन्न झाला.
याप्रसंगी रामदास सूर्यवंशी यांनी वीर जिवाजी महाले,वीर भाई कोतवाल आणि वीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकासाठी पुणे मनपातर्फे भरीव निधी देण्याची मागणी केली. तसेच भोर येथील कारी येथे होणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. प्रतापगडावर होणाऱ्या स्मारकामध्ये वीर जिवाजी महाले यांचे स्वतंत्र दालन उभे करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उदय दैठणकर यांनी नाभिक व बारा बलुतेदार समाजाला आगामी निवडणुकीत संधी भाजपासह सर्व राजकीय पक्षांनी दिली पाहिजे कारण या समाजांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात आणल्याशिवाय त्या त्या समाजाचा विकास करताना त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल व त्यातून सर्वांगीण विकास साधला जाईल असे ते शेवटी म्हणाले.
पुणे मनपा विद्युत विभागाचे सुनील कांबळे यांचाही प्रकाश योजना सुरु केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय दैठणकर,हेमंत श्रीखंडे,राजेंद्र पंडित,सुनील शिंदे,परशुराम काशीद,विनायक गायकवाड,प्रशांत गायकवाड,सुजीत मगर,रवींद्र मावडीकर,राजू माटे,विनोद माटे,सुजीत पुजारी, प्रशांत वाणी,उदय तुपे, संदीप दळवी,सोहंम सूर्यवंशी,अमोल थोरात, किशोर पवार,बबनराव काशीद,बाळासाहेब भामरे,वसंत गाडेकर,गोविंद वाघमारे, अशोक चटपल्ली, तुकाराम दैठणकर,गणेश दैठणकर,रवींद्र राऊत,राजेश आढाव,निलेश चटपल्ली, हनुमंत यादव, सूर्यकांत भोसले,लियाकत महाजन,गणेश आहेर,रवींद्र ननावरे,चारुदत शिंदे,मेजर सईद अन्सारी, रमेश पायगुडे,अनिल जाधव,संजय पाचेरकर,दत्ताभाऊ पाकिरे,महेंद्र गायकवाड,बालाजी तिरमकदार,जितेंद्र जाधव,सुरेंद्र तावरे, रोहित यवतकर,नाना आढाव,आदित्य दैठणकर,अपेक्षा राऊत,विवेक नायडू,ओंकार जोशी,भाऊ पवार,नागेश कोकाटे, नितीन दैठणकर,राहुल आढाव,संदीप जांभळे,वसंत ढवळे, नेताजी काशीद,प्रवीण दैठणकर,श्याम काशीद,सौ.नीता दैठणकर,राजकुमार राव, नुरायन सलमानी,सौ.रोहिणी दैठणकर,सुरेश गायकवाड सौ.नीलम दैठणकर,दिलीप गवते,सौ. झेंडे,निलेश चातुर,सौ.रेश्मा दैठणकर,दिलीप शाह, सुरेश नाईक,सौ.केतकी दैठणकर,सचिन दळवी, प्रकाश राणे यांच्यासह अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले.यावेळी महिलांनी सुरवातीला औक्षण केले. महिलांची उपस्थिती मोठी होती.
कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय सुनील शिंदे अन त्यांचे स्वागत उदय दैठणकर,अध्यक्षीय मनोगत रामदास सूर्यवंशी व सुंदर सूत्रसंचालन रवींद्र राऊत तर आभार हेमंत श्रीखंडे यांनी मानले.

