Homeपुणेहुजूरपागा प्रशालेत विज्ञान मंडळाची स्थापना

हुजूरपागा प्रशालेत विज्ञान मंडळाची स्थापना

Newsworldmarathi Pune: दरवर्षी प्रमाणे यंदाही एच.एच. सी. पी. हायस्कूल, हुजूरपागा, लक्ष्मी रोड, पुणे येथे मंगळवार दिनांक २९ जुलै २०२५ रोजी विज्ञानमंडळ उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे *मा. डॉ.अरविंद नातू,वरिष्ठ संशोधक* (आयसर संस्था) यांचा सत्कार म.ग.ए. संस्थेच्या कोषाध्यक्षा मा. डॉ.सुषमा केसकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास विज्ञानमंडळातील सहभागी विद्यार्थिनी व इयत्ता ९वीच्या विदयार्थीनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थीनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या केले. रासायनिक अभिक्रियेवर आधारित प्रयोगाद्वारे विज्ञान सेल्फी बनवून विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. ही सायन्स सेल्फी फ्रेम केवळ चेहऱ्याचीच नाही तर आपल्या ज्ञानाची, सर्जनशीलतेची आणि आत्मविश्वासाची फ्रेम आहे. या चौकटीत उभे राहताना आपण विज्ञानाशी जोडले जातो या नवकल्पनेतून विज्ञान मंडळाचे उद्‌घाटन करण्यात आले.

निसर्गातील घडामोडींमध्ये विज्ञानाचे गूढ लपलेले आहे. डोळे उघडा निसर्ग कडे बघा प्रश्न विचारा आणि संशोधक व्हा असे मोलाचे मार्गदर्शन नातू सरांनी विद्यार्थिनींना केले.

यावेळी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोषध्यक्षा मा. डॉ. सुषमा केसकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका, केतकी पेंढारकर, उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड, पर्यवेक्षक साधना घोडके, श्रीयुत राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे उपस्थित होते. विज्ञान पर्यवेक्षिका श्रीमती जमदाडे प्रतिभा आणि सर्व विज्ञान शिक्षक, वि‌द्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments