Newsworldmarathi Nagpur नाराजीच्या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ यांनी जहाँ नही चैना, वहाँ नही रहना असं सूचक विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. छगन भुजबळ आता काही मोठा निर्णय घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छगन भुजबळ यांनी म्हटलं की, अजित पवार जेव्हा शरद पवार यांना सोडून बाहेर पडले तेव्हा सर्व म्हणत आहेत तर मी तुमच्यासोबत राहीन असं म्हणाले. पण मी अजित पवार यांच्यासोबत राहूनही पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दरम्यान, त्यांनी एक सूचक विधान केल्यानं खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या मंत्रिपदाचाही आधीच राजीनामा दिला होता. त्यावेळी राजीनामा दिल्यानंतरही आमदार माझ्याविरोधात बोलले असल्याचं भुजबळ म्हणाले.