Newsworldmarathi Pune परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येची सखोल चौकशी करा तसेच यामागील मुख्य सूत्रधारास अटक करा अशी आग्रही मागणी मातंग एकता आंदोलनाचे नेते व माजी मंत्री रमेश बागवे यांनी केली आहे. Bआज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.
येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय घ्यावा अन्यथा मातंग समाज राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल असा इशारा बागवे यांनी दिला. या दोन्ही घटनेचा राज्यशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून यातील संबंधित आरोपीवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी असे यावेळी मातंग समाजाच्या विविध कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली .
मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावे. संबंधित परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक व पोलिस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पाठीमागे जे मुख्य सूत्रधार आहेत ते बीड जिल्ह्यातील एक गुंड व राजकीय पाठबळ असलेल्या व्यक्तीवर दबावापोटी गुन्हा दाखल होत नाही तरी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले होते. यावेळी अंकल सोनवणे,अरुण गायकवाड, रमेश सकट,
विठ्ठल थोरात,मिलिंद अहिरे, दयानंद अडागळे,राजश्री अडसूळ,रवी पाटोळे, सुरेखा खंडाळे व पुणे शहरातील व जिल्ह्यातील मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते .