Newsworldmarathi Pune : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या आणि पुणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. डॉ. होमी भाभा दवाखाना येथे रक्त व लघवी संकलन केंद्र आणि तपासणी सुविधा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे.
तसेच,दळवी हॉस्पिटल, वाकडेवाडी येथे औषध पुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दलही आवाज उठवला गेला. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी निना बोराडे यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनावेळी अॅड. स्वप्निल जोशी (अध्यक्ष), केतन ओरसे (कार्याध्यक्ष), आणि रमीज सय्यद हे उपस्थित होते. या विषयाकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष न दिल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला आहे.