नागपूर विधानभवन परिसरात महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्याविरोधात तीव्र आंदोलन केले. शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि काँग्रेसचे प्रमुख नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. मात्र, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची या आंदोलनातील अनुपस्थिती विशेषतः चर्चेचा विषय ठरली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहांच्या वक्तव्याला महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान ठरवून निषेध व्यक्त केला. Lअमित शहांनी केलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय तणाव वाढला आहे. महाविकास आघाडीने राज्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी एकत्र येत भाजपविरोधात लढा देण्याचे ठाम संकेत दिले.
जयंत पाटील यांची अनुपस्थिती का चर्चेत? जयंत पाटील हे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असून, त्यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फुटले आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, जयंत पाटील यांची अनुपस्थिती पक्षांतर्गत मतभेद किंवा वैयक्तिक कारणांमुळे असू शकते.
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्यांपैकी एक असून, त्यांच्या अनुपस्थितीने पक्षाच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनावेळी उपस्थित इतर महत्त्वाच्या नेत्यांनी मात्र आपापल्या भूमिकांवर ठाम राहत अमित शहांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
जयंत पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत अंतर्गत विसंवादाच्या शक्यतेवर चर्चा होत असून, आगामी काळात त्याची अधिक स्पष्टता होईल. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो, असे म्हणणाऱ्या जयंत पाटलांची जोरदार चर्चा सुरू झाली. जयंत पाटील काही निर्णय घेणार का? याची राजकीय चर्चा सुरू झाली.