Homeभारत'ती' पत्रकार गिरवतेय सेंद्रिय शेतीचे धडे

‘ती’ पत्रकार गिरवतेय सेंद्रिय शेतीचे धडे

Newsworldmarathi Team : तरुणी अनेकदा ग्रामीण भागातून शहराकडे आकर्षित होतात, उत्तम नोकऱ्या मिळवतात आणि शहरी जीवनशैलीत स्थायिक होतात. मात्र, हे सगळं ऐश्वर्य सोडून पुन्हा गावाकडे जाऊन नव्या सुरुवातीचा निर्णय घेणे खूप धाडसी ठरते. अशा निर्णयाला साहस, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते, आणि हे सगळं सुषमा नेहरकर-शिंदे यांनी दाखवून दिलं आहे. सुषमा ही एक अपवाद ठरली आहे, कारण तिने शहरी ऐशआरामाचे जीवन सोडून आपल्या गावाकडे परत जाऊन सेंद्रिय शेतीची सुरुवात केली. आज तिच्या मेहनतीमुळे ती केवळ शेतकरी नाही तर सेंद्रिय उत्पादनांचा एक विश्वासार्ह ब्रँड बनली आहे.

Advertisements
Oplus_131072

न्यूजवर्ल्ड मराठीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये जाणून घेऊया सुषमा नेहरकर हिच्या या प्रवासाविषयी, ज्या प्रवासाने अनेक तरुण-तरुणींना प्रेरणा दिली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवन यांच्यातील दरी कमी करत सुषमाने एक नवीन अध्याय सुरू केला आहे.

सुषमा नेहरकर-शिंदे यांची प्रेरणादायी कथा समाजासाठी नवा दिशादर्शक ठरत आहे. त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठी कारकीर्द गाजवून, उत्तम पगाराची नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे फक्त स्वतःची आवड नव्हे तर समाजाला आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे वळवण्याचा उद्देश होता. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी शुद्ध, पौष्टिक आणि नैसर्गिक उत्पादनांचा पुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मोहाच्या फुलांचे लाडू, रानातील लोणची यांसारख्या उत्पादनांमध्ये त्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर करून लोकांना आरोग्यदायी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

Oplus_131072

सामाजिक, राजकीय आणि शासकीय विषयांवर लेखन करत असताना, शेतीची आवड जोपासण्याचा विचार त्यांनी कायम ठेवला. पत्रकारितेत अनेक पुरस्कार प्राप्त करूनही त्यांनी केवळ आपल्या आवडीतून प्रेरित होऊन शेतीमध्ये कार्य करण्याचा मार्ग निवडला.उत्तम पगाराची नोकरी सोडून शेतीत राबणे आणि त्यातून स्वतःचा ब्रँड निर्माण करणे ही सोपी गोष्ट नाही, परंतु सुषमा यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या मेहनतीमुळे सेंद्रिय शेतीत यश मिळवून त्यांनी एक प्रेरणादायी उदाहरण प्रस्थापित केले आहे.

आज गलेलठ्ठ पगार असलेले शासकीय अधिकारी आणि आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित इंजिनिअर्सदेखील सेंद्रिय पदार्थांना अधिक पसंती देत आहेत. सुषमाने हीच गरज आणि बाजारातील संधी ओळखत आपल्या सेंद्रिय उत्पादनांना एक वेगळा ब्रँड म्हणून उभे केले आहे. या मध्ये ती भात, डाळ, अनेक गावरान भाज्यांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहे. सेंद्रिय आणि शुद्ध उत्पादनांसाठी लोकांकडून मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर, तिने करवंदाचे व रानातील कैऱ्याचे लोणचे तयार केले. ही लोणची भीमाशंकर आणि आंबोली परिसरातील शुद्ध, नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करण्यात आली आहेत. या लोणच्यांमध्ये तीळ तेल वापरले असून नागरिकांच्या आरोग्याचा खास विचार केला आहे. शिवाय यात जंगलातील व शेतातील नैसर्गिक व पौष्टिक घटकांचा समावेश आहे. उत्पादनांमध्ये कोणत्याही भेसळ करण्यात आलेली नाही यांची शुद्धता जपण्याचा सुषमाने पूर्ण प्रयत्न केला आहे.

सुषमा सांगते…. माझा उद्देश लोकांना ताज्या, नैसर्गिक, व पौष्टिक पदार्थांची चव अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देणे आहे. या छोट्याशा प्रयत्नाद्वारे, नागरिकांना आरोग्यदायी आणि विशिष्ट चव देण्याचा प्रयत्न करत आहे. मोहाच्या फुलांचे लाडू हे एक वेगळे उत्पादन काढून नागरिकांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सुषमा सांगते. या मोहाच्या फुलाच्या लाडू मध्ये नाचणी सत्व, गुळ, तूप, काजू व बदाम, डिंक इ साहित्य वापरून तयार करण्यात आले आहेत. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आणि नैसर्गिक घटकांनी भरलेले एक आयुर्वेदिक औषधीय अन्न आहे. हे लाडू फक्त चविष्टच नाहीत, तर विविध आरोग्य समस्यांवर उपायकारक ठरतात.
प्रेग्नंट महिलांसाठी: हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवते. शरीराला आवश्यक पोषण देऊन गरोदरपणातील आरोग्य सुधारते. डिलीव्हरीनंतरच्या काळात कॅल्शियमची पातळी वाढवते.कंबरदुखी कमी करण्यात मदत करते. बाळाच्या आईला दूध वाढण्यासाठी रामबाण उपाय आहे. सर्वसामान्य आरोग्यासाठी रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. अर्थराइटिस आणि डायबिटीससाठी फायदेशीर आहे. पचन सुधारते आणि भूक वाढवते. रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

आमचा उद्देश फक्त लाडू विकणे नाही, तर लोकांना त्यांच्या आरोग्यासाठी चांगल्या आणि शुद्ध उत्पादनांचा अनुभव देणे आहे. मोहाच्या फुलांच्या लाडूंमध्ये आपणाला केवळ चवच नाही, तर आरोग्यासाठी उपयुक्त पोषणमूल्येही मिळतात. आरोग्यदायी आणि शुद्ध पदार्थांचा हा प्रयत्न अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, हा आमचा ध्यास आहे.

सुषमा नेरकर- शिंदे सध्या निसर्गातील विविध घटकांचा सखोल अभ्यास करत असून, माणसाच्या आरोग्यासाठी त्यांचा कसा उपयोग करता येईल, यावर काम करत आहे. सेंद्रिय शेती व नैसर्गिक उत्पादनांमध्ये यशस्वी ठरलेल्या सुषमा, आता आपल्या दैनंदिन आहार व जीवनशैलीत उपयोगी ठरतील अशा अधिक नैसर्गिक व आरोग्यदायी गोष्टी घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा उद्देश फक्त व्यवसाय करणे नसून, समाजाला निसर्गाच्या जवळ नेणे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. लवकरच त्या आणखी नैसर्गिक उत्पादनांसह लोकांसाठी एक नवा आदर्श उभा करतील, अशी खात्री आहे. सुषमा नेरकर यांची कथा ही धाडस, इच्छाशक्ती आणि आवड जोपासण्याचा उत्तम उदाहरण आहे. शहरी भागातील ऐशआरामाचे जीवन सोडून ग्रामीण भागातील सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय खूपच प्रेरणादायी आहे.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments