Newsworld marathi Mumbai : गुरुवारी नव्या सरकारचा 5 डिसेबर रोजी शपथविधी होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. स्पष्ट बहुमत असून देखील अजूनही नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाहीये. नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार यासंदर्भात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते. अखेर आता तारीख समोर आली आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ यश मिळालं. तब्बल 230 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर दुसरीकडे या निकालामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. जरी नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असली तरी देखील अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अजूनही कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यापूर्वीच शपथवीधी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.