Newsworld marathi : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून एडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सराव व्हावा यासाठी इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 2 दिवसीय सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. त्यामुळे आता 1 डिसेंबरला उभयसंघात 50-50 ओव्हरची मॅच होत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 40 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीला कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताने 50 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस जिंकला
Advertisements
RELATED ARTICLES