Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या हुजूरपागा कात्रज शिशुमंदिर शाळेत फुले प्रकल्पाअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करण्यात आला. गुलाब, सुगंधी चाफा,मोगरा, कमळ,जास्वंद,नाजूक निशिगंध,शेवंती,अबोली, गोकर्ण, सूर्यफूल अशा विविध प्रकारच्या फुलांची ओळख छानच मिळाली.
विद्यार्थीनींना फुलांची माहिती कळावी म्हणून फुल विक्रेते व्यावसायिक पालक विकी पवार यांनी फुलांची ओळख करून दिली, मुलींना प्रत्यक्ष फुलांचे तोरण, बुके,वेणी बनवून दाखवले,सर्व मुलींना गजरा देण्यात आला, शिशुरंजन व छोट्या गटातील मुलींनी फुलांचा पेहराव करून माहिती सांगितली. मोठ्या गटाच्या विद्यार्थीनींनी फुलांचे उपयोग सांगितले, या उपक्रमाची संकल्पना नम्रता मेहेंदळे यांची होती तसेच सर्व शिक्षिका-शिक्षिकेतरांनी सहकार्य केले.