Newsworld Marathi Pune : Crime Pune शिक्रापूरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. गिलबिले यांची मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत. दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.
Advertisements