Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधातील मोहीम तीव्र करताना पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.