सत्तेचा सारीपाट
महाराष्ट्रात चालू आहे लोकसभेपासून सत्तेचा सारीपाट
लोकसभेत महाविकास आघाडीने जातीयवादाच्या माध्यमातून लावली महायुतीची वाट
म्हणूनच म्हणतो महाराष्ट्रात चालू आहे सत्तेचा सारीपाट
विधानसभेच्या निवडणुकीमध्येलाडक्या बहिणीने दिली महायुतीला साथ म्हणूनच महायुतीतील पक्षाचे झाले बळकट हात
म्हणूनच म्हणतो महाराष्ट्रामध्ये चालू आहे सत्तेचा सारीपाठ
महायुतीला मिळाले न भतो न भविष्यती बहुमत दहा दिवस होऊन गेले तरी मुख्यमंत्रीपदासाठी नाही होत त्यांचे एक मत
म्हणूनच म्हणतो महाराष्ट्रात चालू आहे सत्तेचा सारीपाठ
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकमेकाची घेत नाहीत गाठ, निवडणूक लढले एकत्रपण आता त्यांचे जुळत नाही मुख्यमंत्रीपदासाठी सूत्र
ओबीसी दलित एकवटला आणि महाविकास आघाडीची लावली वाटतरी पण महाविकास आघाडी ईव्हीएम वरील आरोपाचा घालते घाट
म्हणूनच म्हणतो महाराष्ट्रात चालू आहेसत्तेचा सारीपाट
कवी प्राचार्य डॉ खुशाल मुंढे