Newsworldmarathi Pune : सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पत्नी मोहिनी वाघ हिने सुरुवातीला फक्त पतीचे हातपाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र, हल्लेखोरांना जेव्हा कळले की सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची हत्या करण्याचा निर्णय घेतला, असे तपासात समोर आले आहे.
हत्येच्या या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवीन धक्कादायक तपशील उघड होत आहेत. सुरुवातीला हा खंडणीच्या वादातून घडलेला प्रकार असल्याचे समजले होते. मात्र, तपासादरम्यान मोहिनी वाघ व भाडेकरू अक्षय जावळकर यांचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यानंतर मोहिनीने पतीचा छळ सहन न होऊन त्याच्या हातपाय तोडण्यासाठी सुपारी दिल्याचे मान्य केले.
पण हल्लेखोरांनी सतीश वाघ यांचे आमदाराशी नाते असल्याचे समजताच, हा हल्ला हत्या करण्यापर्यंत नेला. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय व गुन्हेगारी स्वरूप अधिक स्पष्टपणे मिळत आहे.
पोलिस तपास अद्याप सुरू असून, हत्येच्या या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुरुवातीला सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र मारेकऱ्यांना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असे समजले. त्यानंतर त्यांनी त्यांचा खून केला. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करत होते. तसेच घर खर्चासाठी पैसेही देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला