Homeपुणेगोरक्षस्मृती फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

गोरक्षस्मृती फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Newsworldmarathi Pune : कात्रज परिसरातील गुजर निंबाळकरवाडी येथील गोरक्षस्मृती फाउंडेशनचे अध्यक्ष, माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या कार्य अहवालाचा अंतर्भाव असलेल्या ‘दिनदर्शिका : २०२५’चे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या दिनदर्शिकेचे नागरिकांना मोफत वाटप केले जाणार आहे.

Advertisements

मोहोळ म्हणाले, ‘राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यंकोजी खोपडे यांची समाजाप्रति असलेली बांधिलकी त्यांच्या कार्यकर्तृत्वातून दिसते. समाजातील सर्व घटकांची तळमळीने सेवा करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून, विविध उपक्रमांच्या माध्यामातून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.’ खोपडे म्हणाले, ‘कात्रजसह नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील मूलभूत सुविधा व विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून दिला जाईल. दक्षिण पुण्यात भाजपचे संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

गोरक्षस्मृती फाउंडेशन व व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षभरातील नागरी प्रश्नांची सोडवणूक, विकास प्रकल्पांचा पाठपुरावा, सामाजिक व धार्मकि उपक्रमाची माहिती या दिनदर्शकित देण्यात आली आहे. या वेळी सतीश कटके, मयूर लिंबोरे, कैलास त्रिवेदी, कैलास मोहोळ, किरण झेंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments