Newsworldmarathi Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास भेट दिलेल्या घटनेस २०२७ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने त्या दृष्टीने याठिकाणी प्रलंबित स्मारकाचे काम तात्काळ सुरु करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. तसेच शंभर कोटींचे नियोजीत भिमाकोरेगाव स्मारक माझ्याच कार्यकाळात पुर्ण होईल यासाठी माझा प्रयत्न राहील.” असा विश्वास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री मा. ना. संजय शिरसाठ व्यक्त केला.
१ जानेवारी रोजी होणारा शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या सुविधांची प्रत्यक्षपाहणी करण्यासाठी संजय शिरसाठ यांनी जिल्हाधिकारी व संपुर्ण प्रशासकीय समिती समवेत भिमाकोरेगाव विजयस्तंभास अभिवादन करुन भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित समाजबांधव संघटना प्रतिनीधी यांचेशी संवाद साधला.
भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी याठीकाणी येणार्या अनुयायांना कायम स्वरुपी सुविधा मिळुन स्मारकाच्या प्रलंबित कामास गती मिळावी अशी मागणी केली होती.
पेरणे गांवच्या सरपंच उषाताई वाळके यांनी नागरीकांच्या वतिने मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी डॉ. सिध्दार्थ धेंडे , शैलेंद्र मोरे , यशवंत नडघम , निलेश आल्हाट इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.