Newsworld marathi Pune : पुण्यातील सारसबागचा गणपती बघायला दुरवरुन लोक येतात. हे सुद्धा एक लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळ आहे. सारसबागच्या गणपतीला तळ्यातला गणपती सुद्धा म्हटलं जातं. हिवाळ्यामध्ये या गणपतीची खास चर्चा रंगते कारण हिवाळा सुरू झाला आणि जोरदार थंडी सुरू झाली की या गणपती बाप्पाला स्वेटर घातले जाते. दरवर्षी या गणपतीचे स्वेटरमधील फोटो व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे.
Advertisements