Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आजी-माजी महिला पदाधिकाऱ्यांनी मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला नेत्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवत संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
महिला काँग्रेसने या अमानवी कृत्याचा निषेध करताना न्यायाची मागणी केली. गृहखात्याला या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये आरोपींना त्वरित अटक आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांसोबत सहानुभूती व्यक्त करण्यात आली. महिला पदाधिकाऱ्यांनी हत्येच्या विरोधात कडक शब्दांत आपला संताप व्यक्त केला आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
संतोष देशमुख हत्येतील सर्व दोषींना लवकरात लवकर अटक करावी. न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. राज्यातील गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी गृहखात्याने ठोस पावले उचलावी अन्यथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन छेडल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या माजी उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिला आहे.