Newsworldmarathi Pune : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे.
Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यातून तसेच देशभरातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहे. काल रात्रीपासून मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. आज जवळपास ७ ते ८ लाख नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने जवळपास १० ते १२ हजार पोलिसांच्या बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे.
तसेच पुणे नगर मार्गावरील वाहतूक देखील वळवण्यात आली आहे. येथे येणाऱ्यांसाठी प्रशासनातर्फे ‘विजयस्तंभ सुविधा’ हे अॅप विकसित करण्यात आले आहे.कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ३१ डिसेंबरपासून मोठ्या प्रमाणात नागरिक कोरेगाव भीमा येथील पेरणे फाटा या ठिकाणी जमले आहे. आज सकाळपासून या ठिकाणी भीम अनुयायी येत असून विजयस्थंभा जवळ मोठी गर्दी झाली आहे.
या ठिकाणी देश व राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात. गेल्या काही वर्षांपासून येथे येणाऱ्या अनुयायांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी १० लाख अनुयायी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या नुसार जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.