रोज सकाळी आपल्याला अनेक जण Morning Walk करताना दिसतात. मात्र आपण अनेकदा आळस करतो अथवा सकाळच्या घाईत वेळ काढणं शक्य होत नाही. हे जरी खरं असलं तरीही सकाळी स्वतःच्या निरोगी आरोग्यासाठी अर्धा तास काढायला हवा. सकाळीच उपाशीपोटी चालण्याचे अनेक फायदे आहेत.
1) चालल्यामुळे शरीराला योग्य व्यायाम मिळतो. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते. याशिवाय मेंदू तरतरीत राहिल्याने आणि सकाळी उठून चालल्यामुळे अधिक चांगल्या पद्धतीने दिवसभर क्रिएटिव्हिटीसह काम पूर्ण होते. तुम्ही सकाळी चालण्याचा व्यायाम सुरू केला तर यामुळे शरीरातील डोपामाईन नावाचे हार्मोन रिलीज होते, जे तणाव कमी करण्याचे काम करते.
2) तसंच तुम्हाला नैराश्य येत असेल तर ते कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. शरीरातून निघणारे सेरोटोनिन हार्मोन हे तुमची झोप अधिक गडद बनवून तुमचा मूड चांगला राखण्यास मदत करते.उपाशीपोटी चालण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. तर हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास फायदा होतो. तसंच सांधेदुखीची समस्या दूर ठेवण्यास मदत होते.
3) मजबूत करण्यासाठी, मेंदूचे कार्य अधिक चांगले करण्यासाठी चालण्याचा शरीराला फायदा मिळतो. त्यामुळे रोज सकाळी उपाशीपोटी किमान अर्धा तास चालावे. १ तास चालण्यासाठी वेळ काढल्यास, अधिक उत्तम ठरते.