Newsworldmarathi Pune : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये दिनांक 22 व 23 डिसेंबर2024 रोजी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी खो खो या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू; प्रशालेचे माजी विद्यार्थी संतोष पवार हे उपस्थित होते.
त्यांच्या समवेत प्रशालेच्या शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षिका अंजली गोरे व मंजुषा शेलूकर यांनी क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले.क्रीडा ज्योत प्रशालेतील राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावर उज्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंनी आणली क्रीडा स्पर्धांमध्ये लांब उडी,गोळा फेक,थ्रो बॉल,100 मीटर धावणे,50 मीटर धावणे, बुद्धिबळ असे वैयक्तिक खेळ तर लंगडी,कबड्डी,खो-खो यांचे अंतरवर्गीय सामने आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शेलार यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय संजय अहिरे यांनी करून दिला. महेश जोशी यांनी आभार मानले.