Newsworld Pune : दादावाला ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन अभिजया लोकनृत्य स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद दि पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए. एस. डी. बी. दादावाला जुनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजया आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे आयोजन नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे करण्यात आले होते. या स्पर्धेद्वारे विविध शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकनृत्य कला सादर करण्याची संधी मिळाली. स्पर्धेचे उद्घाटन तथा पारितोषिक वितरण दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश भाई शाह, उपाध्यक्ष जनक भाई शाह, सचिव हेमंत भाई मणियार, सहसचिव प्रमोद भाई शाह, संदीप भाई शाह, दिलीप जगड, विनोद देडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राचार्या सोनल बारोट, उपप्राचार्य विश्वनाथ पाटोळे उपस्थित होते. आंतरशालेय इयत्ता 8वी ते 10 वी मधील गटात अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल प्रशालेला प्रथम पारितोषिक, विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक स्कूल प्रशालेला द्वितीय पारितोषिक, हुजूरपागा गर्ल्स हायस्कूल लक्ष्मी रोड प्रशालेला तृतीय पारितोषिक, तसेच आरसीएम गुजराती हायस्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
आंतर महाविद्यालयीन इयत्ता 11वी ते 12वीमधील गटात प्रथम पारितोषिक ए. एस. डी. बी. दादावाला कनिष्ठ महाविद्यालयाने, द्वितीय परितोषिक हुजूरपागा कात्रज महाविद्यालयाने, तृतीय पारितोषिक आर डी कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले, तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक एनसीएल कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले. या स्पर्धेचे आयोजन पर्यवेक्षिका माधुरी पाटील, अर्चना बारोट, सविता कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षिका शमा गद्रे यांनी केले. अर्चना काळे, उषा चव्हाण, अनुजा सेलोट, सौ. शिल्पा मुदगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.