Newsworldmarathi Pune: ‘श्री. शिवदुर्ग संवर्धन मोहिमे’ अंतर्गत गोखले नगर परिसरातील सुयोग मित्र मंडळ आणि विशाल मित्र मंडळ यांनी तिकोणा गडावर श्रमदान केले.
पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता, माती व दगडांमध्ये ताल रचणे आणि बुरुज व पायऱ्यांची साफसफाई अशा प्रकारची श्रमदानाची कामे करण्यात आली.
श्री. शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने सुरक्षिततेसाठी गडावर सौरऊर्जेवर कार्यान्वित होणारा सी. सी. टी. व्ही. पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर बसविण्यात आल्याची माहिती अध्यक्ष मुकेश पवार यांनी दिली.
मुकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश नेलगे, सचिन दगडे, निरंजन बहिरट, आकाश मारणे, आशिष माने, महेंद्र पवार, अविनाश देशमुख यांनी संयोजन केले.