Homeमुंबईसुप्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात कोट्यावधी फसवणूकीचा गुन्हा

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात कोट्यावधी फसवणूकीचा गुन्हा

Newsworldmarathi Mumbai : सुप्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदे आणि बॉलिवूड अभिनेते आलोकनाथ यांच्याविरुद्ध कोट्यवधींची फसवणूक झाल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियाणातील सोनीपतमध्ये ही एफआयआर नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं मराठी सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ माजली आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंदूरमध्ये नोंदणीकृत असलेल्या सोसायटीतील 50 लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेलेल्या कंपनीच्या प्रमोशनाशी संबंधीत आहे. गुंतवणुकीचं आवाहन करत कंपनीची जाहीरात केल्याचा दोन्ही अभिनेत्यांवर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कंपनीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून अभिनेता सोनू सूदनेही उपस्थिती लावली होती.

पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, गेल्या 6 वर्षापासून या कंपनीने लोकांकडून पैसे वसूल केले. कंपनीत फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) किंवा इतर मार्गांनी गुंतवणूक केल्यास लोकांना मोठ्या परताव्याची ग्वाही कंपनीकडून देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी महागड्या आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार आयोजित करण्यात आला होता. तसेच प्रोत्साहनांच्या नावाखाली बहु-स्तरीय मार्केटिंगच्या धर्तीवर एजंटदेखील तयार करण्यात आलं होते.

सुरुवातील लोकांना पैसे दिले पण जेव्हा कोट्यवधी रुपये जमा झाले तेव्हा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करु लागली. इतकेच नव्हेतर लोक जेव्हा पैसे मागू लागले तेव्हा कंपनीचे अधिकारी त्यांचे मोबाईल बंद करू लागले.

खरतरं कंपनीने 2023 मध्ये आपलं खरे रंग दाखवले. मोठमोठे दावे करून आणि आमिषं दाखवून अनेक वर्षे आपला खरा हेतू लपवला आणि जेव्हा हळूहळू लोकांनी कंपनीच्या सदस्यांवर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले.

खरतरं कंपनीने 2023 मध्ये आपलं खरे रंग दाखवले. मोठमोठे दावे करून आणि आमिषं दाखवून अनेक वर्षे आपला खरा हेतू लपवला आणि जेव्हा हळूहळू लोकांनी कंपनीच्या सदस्यांवर फसवणुकीचे आरोप करायला सुरुवात केली, तेव्हा कंपनीच्या मालकांनी त्यांच्या एजंट आणि गुंतवणूकदारांशी असलेले सर्व संबंध तोडले.

जेव्हा लोक कार्यालयात गेले आणि गोंधळ घालू लागले, तेव्हा त्यांना तिथेही कुलूप लावलं. सर्व अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे कोट्यवधी रुपये घेऊन पळून गेले. एजंट्सद्वारे चालवली जाणारी 250 हून अधिक सुविधा केंद्र होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीनं काम करत होते. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये तळपदे आणि आलोकनाथ यांच्याव्यतिरिक्त एकूण 11 जणांची नावं आहेत.

या मार्केटिंगमध्ये जर एखाद्या एजंटनं जास्त लोकांना जोडलं तर, त्याला बक्षिस म्हणून ट्रॉफी दिली जायची. या कंपनीला प्रमोट करण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी श्रेयस तळपदेलाही हायर केलं होते. या प्रकरणी पंजाब आमइ हरियाणा हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात 25 जानेवारीला कोर्टात सुनावणी होणार आहे

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments