Homeआंतरराष्ट्रीयसुती साडी, खांद्यावर छोटीशी बॅग, कोट्यवधींची मालकीण पोहोचली कुंभमेळ्यात

सुती साडी, खांद्यावर छोटीशी बॅग, कोट्यवधींची मालकीण पोहोचली कुंभमेळ्यात

Newsworldmarathi Team: गेल्या आठवड्यापासून उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या कुंभमेळ्यामध्ये देशभरासह विदेशातील लाखो पर्यटकही सहभागी झाले आहेत. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात कोट्यवधींच्या संपत्तीच्या मालकीण असलेल्या सुधा मूर्ती यांचा साधा आणि विनम्र सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साधी साडी आणि छोटीशी बॅग घेऊन त्या कुंभमेळ्यात दाखल झाल्या.

Advertisements

गेल्या आठवड्यापासून ( 13 जानेवारी) उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या महाकुंभमेळ्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.एकूण 45 दिवस चालणाऱ्या या कुंभमेळयात देशभरासह विदेशातील लाखो लोकांनी हजेरी लावली असून येत्याकाळातही अनेक भाविक हजर राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील लवकरच या कुंभमेळ्यासाठी हजर राहणार आहेत. अशातच आता प्रसिद्ध लेखिका, कोट्यावधी लेखिका सुधा मूर्ती याही या कुंभमेळ्यासाठी हजर राहिल्या आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनही साधीशी साडी, खांद्यावर छोटीशी बॅग अशा साध्या पेहरावात त्याचा कुंभमेळ्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांचा साधा सोपो, कोणताही बडेजाव नसलेला अंदाज पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. यावेळी त्यांनी आपण 3 दिवस संगमावर स्नान करणार असल्याचं तसंच आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करणार असल्याचंही नमूद केलं.

या कुंभमेळ्यासाठी मी खूपच उत्साहित आहे, 144 वर्षांतून एकदाच हा योग येतो. मला खूप आनंद , उत्साह वाटतोय.मी तीन दिवस या कुंभमेळ्यासाठी आले असून संधि मिळाली तर गंगेत , संगमात मी जरूर डुबकी घेऊन, असे सुधा मूर्ती यांनी नमूद केलं. मला कुंभमेळ्यात सहभागी होता आलं, याचा आनंद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments