Newsworldmarathi Mumbai : अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृध्दी होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनांमुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे.
खाजगी गुंतवणुकीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृध्दी होते आहे. याव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रयशक्ती वाढली आहे.
त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झाला आहे. परिणामी गुंतवणूक-रोजगार निर्मिती- वाढीव उत्पन्न- मागणी-गुंतवणूक असे विकासचक्र फिरते राहणार आहे.
नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार
मुंबई – नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. राज्याचे लॉजिस्टिक्स धोरण जाहीर करण्यात आले आहे. ५ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत वडाळा, खारघर यासह इतर ठिकाणी बीकेसीप्रमाणं व्यापारी केंद्र उभारणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
Recent Comments