Newsworld Pune : आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी “आनंदाची सहल” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने हडपसर मतदारसंघातील महाराष्ट्र फेलोशिप ऑफ डीफ, पुणे या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांना अभ्यासात्मक व प्रेरणादायी स्थळांना भेटी देण्याची संधी मिळावी या उद्देशाने “आनंदाची सहल” उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. विविध वयोगटातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या सहलीत सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सामाजिक जाणीवेचा अनुभव मिळाला तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरला असून, अशा प्रयत्नांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षण व सामाजिक सहभागामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल असे मत नाना भानगिरे यांनी सांगितले.