Homeमहाराष्ट्रत्यांनी लोकशाहीचा गळा घोटला : चव्हाण

त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला : चव्हाण

Newsworld Mumbai : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण निर्णय न घेऊन त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. प्रत्येकाच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याचा कायदा बदलला. तक्रार करायची कोणाकडे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही”, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
या देशातील लोकशाही सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण काम करतोय. त्या लोकशाहीला गंभीर धोका निर्माण झालाय. विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. आणीबाणीबद्दल अनेक वेळा काँग्रेसने माफी मागितली आहे. या निवडणुकीत विरोधात वातावरण नव्हतं. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होणार होता. निकाल लागल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाबा आढाव यांनी आंदोलन केलं. या देशात लोकशाही नांदतेय हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
“माझा 2019 चा ईव्हीएमबद्दलचा माझा जुना व्हिडीओ दाखवला जातोय. ईव्हीएम मशीनमध्ये ट्रान्समीटर आणि रिसिव्हर नाही अशी माझी माहिती आहे. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम हॅक करता येणार नाही ,असं माझं मत त्यावेळी होतं. जगात अशी मशीन कुठेही निवडणुकीसाठी वापरली जात नाही. माझी मागणी अशी आहे, 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर केलं नाही तर संशय वाढणार आहे”, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले
पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, तो झाला नाही”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसेच “लोकशाहीचा जर खून झाला तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही.

Advertisements
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments