Homeबातम्या‘बदलापूरची’ पुनरावृत्ती...! कर्जतमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलींचे स्कूलबसमध्ये लैंगिक शोषण

‘बदलापूरची’ पुनरावृत्ती…! कर्जतमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलींचे स्कूलबसमध्ये लैंगिक शोषण

Newsworldmarathi karjat: कर्जतमधील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसमधील अटेंडण्टने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुली अवघ्या ५ वर्षांच्या आहेत.या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी करण दीपक पाटील (वय-२४, वडाप, ता. कर्जत) या आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक महिती अशी की, आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसायला सांगून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करायचा. त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाणसुद्धा करायचा. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

रात्रीच आरोपीला पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले होते. दरम्यान, तरुणाला कर्जत न्यायालयात दुपारी आणले असता, पालकांनी गाडीतून उतरणाऱ्या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालयाच्या आवारात लावला होता. यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार घडला होता, आणि आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments