Homeक्राईमबीडमध्ये गुन्हेगारीचा कळस! महिला वकिलाला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून पाईपने अमानुष मारहाण

बीडमध्ये गुन्हेगारीचा कळस! महिला वकिलाला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून पाईपने अमानुष मारहाण

Newsworldmarathi Beed : बीड – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना अक्षरशः ऊत आला असून, आता अंबाजोगाईतील एका महिला वकिलांवर झालेल्या अमानुष मारहाणीने खळबळ उडवली आहे. ज्ञानेश्वरी अंजान असं या वकिल महिलेचं नाव असून, त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांना पाईपने जबर मारहाण केली. इतकी की रक्त साकळलं आणि त्यांच्या अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, त्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे.

ज्ञानेश्वरी अंजान यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. मारहाण का करण्यात आली, यामागे नेमकं कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

नेमकं काय घडलं? महिला वकिलने सांगितला घटनेचा थरार

अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. पीडित वकील महिलेने माध्यमांसमोर मांडली आहे. वकिल महिलेला मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे या पीडित महिलेने मंदिरावरील लाऊड स्पीकर आणि घरासमोर असलेल्या गिरणीमुळं ध्वनीचा होत असल्याने आवाज कमी करण्याची विनंती सरपंचाकडे केली. पण त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दिल्याने सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी आले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली.

हे प्रकरण तेवढ्यावर मिटले नाही. आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या मारहाणीमुळे तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण जात आहे

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments