Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात निमंत्रित करण्यात न आलेले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून कोल्हापुरातील क्रिकेट मैदानासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. कोल्हापुरात क्रिकेटच्या मैदानासाठी आम्हाला महसूल विभागाकडून ३० एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबई, नागपूर, पुण्यानंतर कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे.


Recent Comments