Newsworldmarathi Mumbai : बिहार राज्यातून आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गत महिनाभरात अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार मुंबईच्या वाशीमध्ये घडला आहे. या घटनेतील पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विनोद भागेसिंग बिष्ट (वय-४६) याला बलात्कार आणि पॉक्सो कलमाखाली अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहार राज्यातील आहे, तर आरोपी विनोद बिष्ट हा उत्तराखंड राज्यातला आहे. आरोपी वाशी सेक्टर १० मधील जे.एन. २ वसाहतीत राहण्यास आहे. आरोपी विनोद बिष्ट हा भोजपुरी चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये काम करत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याची बिहार राज्यात राहणाऱ्या पीडित मुलीच्या आईसोबत ओळख झाली होती.
त्यावेळी त्याने पीडित मुलीच्या आईसोबत चर्चा करताना त्यांच्या मुलीला चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने मुलीला आरोपीकडे पाठवून दिले होते. त्यानंतर पीडित मुलगी मागील महिनाभरापासून आरोपीच्या घरी राहत होती. याच कालावधीत आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. न्यायालयाने आरोपीची २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


Recent Comments