Homeबातम्याभाजपचा हा ज्येष्ठ नेता अडकणार रिंकूसोबत विवाह बंधनात

भाजपचा हा ज्येष्ठ नेता अडकणार रिंकूसोबत विवाह बंधनात

Newsworldmarathi Delhi : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे आज (शुक्रवारी) न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत.

भाजप नेते दिलीप घोष त्यांच्या ज्वलंत भाषणांमुळे अनेकदा चर्चेत असतात.त्यांची वधू रिंकू मजुमदार आहे, दक्षिण कोलकाता येथील भाजप महिला मोर्चाच्या त्या नेत्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कोलकात्यातील न्यू टाउन येथे मॉर्निंग वॉक दरम्यान भेटले होते. भाजप नेते दिलीप घोष लग्न करणार आहेत आणि या बातमीने बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घोष एकटे पडले होते. त्याच कठीण काळात ज्या महिलेने त्यांना साथ दिली ती त्यांची जोडीदार आहे, असे वृत्तांमधून समोर आले आहे.

हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला असला तरी, राज्य भाजपचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणात गप्प राहिले आहेत.विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले नाही.

वृत्तानुसार, शुक्रवारी कोलकाता येथील दिलीप यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात त्यांचे लग्न होणार आहे. रिंकू मजुमदार त्याची वधू होणार आहे. ती भाजपचीही सदस्य आहे. दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. वृत्तानुसार, रिंकू यांनी पहिल्यांदा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाल्यानंतर त्या त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या, त्यांना साथ दिली. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments